शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kojagiri Purnima 2021 : कोजागरी पौर्णिमेला चांदीच्या वाटीतून दुधाचा नैवेद्य दाखवण्यामागचे शास्त्रीय कारण जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 18:34 IST

Sharad Purnima 2021 : सूर्यकिरणांप्रमाणे चंद्राची किरणेही शरीरास उपयुक्त असतात. म्हणून कोजागरीला नैवेद्य म्हणून ठेवलेले दूध प्राशन केल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते व सुदृढ आरोग्य लाभते. 

कोजागरी पौर्णिमेला चंद्राला दुध-साखरेचा नैवेद्य दाखवतात. त्यात चंद्राची किरणे पडली की ते दूध नैवेद्य म्हणून सर्वांना देतात. हे दूध मुख्यत्त्वे चांदीच्या वाटीतून देतात. यामागे कोणती कारणे आहेत ते जाणून घेऊ.  >>ज्योतिषांच्या मते, संपूर्ण वर्षात फक्त या दिवशी चंद्र सोळा कलांनी फुललेला असतो. त्यावेळेस त्याच्यातून निघणारी किरणे अमृतासमान असतात. ती किरणे दुधात मिसळल्यामुळे दुधाची पौष्टिकता अधिक वाढते. म्हणून कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध किंवा खीर ठेवतात.

>>असे मानले जाते की हे दूध किंवा खीर सेवन केल्याने कुंडलीतील चन्द्रदोष दूर होतात. म्हणून चंद्रकिरण मिश्रित दुधाचे या रात्री सेवन केले जाते. 

>>सूर्यकिरणांप्रमाणे चंद्राची किरणेही शरीरास उपयुक्त असतात. म्हणून कोजागरीला नैवेद्य म्हणून ठेवलेले दूध प्राशन केल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते व सुदृढ आरोग्य लाभते. 

>>शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या रात्री चंद्राच्या किरणांमध्ये औषधी गुणांचे प्रमाण सर्वाधिक असते. यासाठी शुभ्र किरणे शोषून घेण्याची क्षमता शुभ्र दुधात असल्यामुळे चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवतात. 

>>चंद्र, चांदणे, दूध, पोहे, साखर सर्वच पांढरे आहेत म्हणून कोजागरी पौर्णिमा हा धवलरंगी उत्सव म्हणून गणला जातो.

>>चन्द्रप्रकाश मानवी देशासाठी उपयुक्त असतो. विशेषतः तापट लोकांनी चन्द्र प्रकाशात सफर केली असता त्यांना आल्हाददायी वाटते आणि मन शांत होते. अशा शांत वेळी गरम दूध तना मनाला उभारी देते. 

>>काही जण दुधाऐवजी तांदुळाची खीरसुद्धा नैवेद्य म्हणून ठेवतात. ती देखील पौष्टिक असल्याने उत्सवाची लज्जत वाढवणारी ठरते. 

>>चांदी हा धातू शरीरासाठी फायदेशीर असतो. तसेच चन्द्र किरणे शोषून घेण्याची क्षमता त्यात अधिक असल्याने दूध किंवा खिरीचा नैवेद्य चांदीच्या वाटीतून दाखवला जातो. 

>>असे मानले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री आकाशातून अमृताचा वर्षाव होतो. चंद्रदेव त्याच्या अमृत किरणांनी पृथ्वीवर त्याच्या शीतलता आणि पोषण शक्तीचा अमृत वर्षाव करतात. तो आनंद लुटण्यासाठी मोकळ्या आकाशाखाली किंवा गच्चीत जमून एकत्रपणे हा उत्सव साजरा करायचा असतो. 

चंद्राला दाखवलेल्या दुधाच्या किंवा खिरीच्या नैवेद्याला नैवेद्यत्व प्राप्त झाल्याने त्याची लज्जत कैक पटींनी वाढते आणि त्याची गोडी उत्सवाचा आनंद द्विगुणित करते. म्हणून तुम्ही सुद्धा ही अनुभूती अवश्य घ्या आणि कुटुंब व मित्रपरिवारासमवेत कोजागरी साजरी करा!

Kojagiri Purnima 2021 : वर्षभरातला सर्वात मोठा चंद्र आजच्या दिवशी दिसतो; अधिक जाणून घ्या!

टॅग्स :kojagariकोजागिरी