शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून सुरू होणाऱ्या कार्तिक मासाचे आणि सणांचे महत्त्व जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 08:42 IST

कार्तिक मासात कार्तिक स्नान महत्त्वाचे असतेच, त्याबरोबर डोकावणाऱ्या सणांची माहिती करून घ्या...

चांद्रवर्षातील आठवा व शरद ऋतुतील दुसरा महिना म्हणजे कार्तिक मास. २ नोव्हेंबर पासून कार्तिक मासारंभ होत आहे. या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा पुढे मागे कृत्तिका नक्षत्राचा प्रभाव असल्यामुळे या महिन्याला कार्तिक म्हणतात. या मासाला उर्ज, बाहुल, कार्तिकिक अशीही नावे आहेत. या मासातच थंडीची सुरुवात होऊन रुक्ष वारे वाहू लागतात.

कार्तिकातील धर्मकृत्यांमध्ये कार्तिकस्नान व दीपदान यांना विशेष महत्त्व आहे. या मासात संपूर्ण महिनाभर पहाटे लवकर उठून केल्या जाणाऱ्या नित्यस्नानाला कार्तिक स्नान म्हणतात. 

आश्विन शुद्ध दशमी, एकादशी वा पौर्णिमेस स्नानास प्रारंभ करून कार्तिक पौर्णिमेस याची समाप्ती करतात. हे स्नान नदी वा जलाशयात केले जाते. पण शहरांच्या ठीकाणी शक्य नसेल तर घरीच हे व्रत अंगिकारता येते. हे प्रात: स्नान महिनाभर शक्य नसेल तर कार्तिकी शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत पाच दिवस तरी अवश्य करावे. 

कार्तिक मासातील मुख्य सण पाहू : 

१) बलिप्रतिपदा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा)२) भाऊबीज (यमद्वितीया)३) कार्तिकी एकादशी ४) तुलसीविवाह५) वैकुंठ चतुर्दशी६) ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी

या शिवायही अनेक महत्त्वाचे दिवस, उत्सव, तिथी या मासात येतात. त्यांची माहिती येत्या काळात घेऊच. कोरोना काळानंतर स्थगित झालेली कार्तिक वारी करण्यास सरकारने परवानगी दिली असल्यामुळे भक्तांच्या उत्साहाला उधाण येणार आहे. असा हा कार्तिक मास २ नोव्हेंबर ते १ डिसेंबर पर्यंत राहणार असून २ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष मास सुरू होणार आहे.