शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Numerology: तुमची जन्मतारीख ‘या’ ३ पैकी आहे? बुध शुभ करेल; धनदेव कुबेर-लक्ष्मीचे शुभाशिर्वाद, लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 08:23 IST

Numerology: या मूलांकाच्या व्यक्ती धाडसी, निर्भयी आणि मेहनती असून, स्वबळावर यश कमावतात, असे सांगितले जाते. तुमचा मूलांक कोणता? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्र हे फार विस्तारलेले शास्त्र असल्याची मान्यता आपल्याकडे आहे. भारतीय प्राचीन परंपरांमध्ये ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्र हे असे शास्त्र आहे, ज्याच्या अनेकविध शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येतात. नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. (Numerology)

ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात बुध स्वतःचे स्वामित्व असलेल्या म्हणजेच कन्या या स्वराशीतून तूळ राशीत विराजमान असणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत बुध तूळ राशीत असेल. यानंतर बुध ग्रह मंगळाचे स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीत प्रवेश करेल. बुध ग्रह उत्तम बुद्धी, तर्कक्षमता कारक असल्याचे सांगितले जाते. अंकशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४ आणि २३ या तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक ५ आहे. बुध हा मूलांक ५ चा स्वामी आहे. मूलांक ५ असलेल्या व्यक्तींवर धनदेवता कुबेरांची विशेष कृपा असते. या मूलांकाच्या व्यक्तींना कुबेर देवाचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. धनदेवता कुबेरमुळे पैशांची चणचण भासत नाही, आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते. धनलाभ होऊ शकतात, असे सांगितले जाते. 

संवाद कौशल्य खूप चांगले

मूलांक ५ असलेल्या व्यक्ती खूप आकर्षक असतात. बुध वाणीचा कारक मानला गेला आहे. त्यामुळे आपल्या बोलण्याने वाणीमुळे समोरची व्यक्ती या व्यक्तींचा प्रभाव पडतो. मूलांक ५ असलेल्या व्यक्तींची तर्क करण्याची क्षमता आणि संवाद कौशल्य खूप चांगले असते. यांचा जनसंपर्क, मित्र परिवार खूप मोठा असतो. कौटुंबिक जीवनही आनंदी असते, असे म्हटले जाते. 

धाडसी, निर्भयी आणि मेहनती

मूलांक ५ असलेल्या व्यक्तींचा स्वभाव मनमिळाऊ असतो. या मूलांकाचे लोक प्रतिभावान असतात. ते धाडसी, निर्भयी आणि मेहनती असतात. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला ते सामोरे जाण्यास तयार असतात आणि त्यात ते विजयही मिळवतात. ते कधीही हार मानत नाहीत आणि सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड देण्यासाठी नेहमी तयार असतात, असे मानले जाते. 

व्यापार, उद्योगात यश आणि प्रगती 

मूलांक ५ असलेले लोक नेहमीच आव्हानांना आव्हाने म्हणून स्वीकारतात आणि कोणत्याही परस्थितीत जिंकण्याचा प्रयत्न करतात. हे लोक नवीन योजनांवर काम करून नफा कमावतात. व्यवसायात जोखीम पत्करायला ते नेहमीच तयार असतात. हे लोक मनी माइंडेड आणि बिझनेस माइंडेड असतात. मूलांक ५ असलेल्या लोकांना व्यापार, उद्योगात चांगले यश मिळते. प्रगती साध्य करू शकतात. बँकिंग, शिक्षण, प्रशिक्षण या क्षेत्रात करिअर करू शकतात. या व्यक्तींना अर्थशास्त्र आणि संगीताचेही चांगले ज्ञान असते, असे सांगितले जाते. 

भाग्याचे धनी मानले जातात 

मूलांक ५ असलेल्या व्यक्ती भाग्याच्या धनी मानल्या जातात. ते बुद्धिमान आणि मेहनती असतात. अगदी लहान वयात ते मोठ्या हुद्यावर पोहोचतात. काम करून घेण्यात या व्यक्ती पटाईत असतात. त्यांना जीवनातील सर्व सुख प्राप्त होते. त्यांना पैशाची कधीच कमतरता नसते. ते पहिल्यापासूनच त्यांच्या भविष्याबद्दल विचार करत असतात. यासोबतच नेहमी पुढे जाण्याचा मार्ग शोधत असतात. कामात कोणाची ढवळाढवळ त्यांना आवडत नाही. कारण त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीने करायला आवडते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष