शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Numerology: ‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक मानले जातात सर्वांत भाग्यवान; मिळते अपार यश, प्रगती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 07:39 IST

Numerology: या व्यक्तींनी एखादी गोष्ट ठरवली की, त्यामध्ये आपले १०० टक्के देण्याचा नेहमी प्रयत्न करतात, असे सांगितले जाते.

भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात मानवी जीवनावरील अनेकविध गोष्टींवर भाष्य केले जाते. अंदाज वर्तवले जातात. ज्योतिषशास्त्र असे शास्त्र आहे, ज्याच्या अनेकविध शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येतात. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. 

एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो. ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८ आणि २७ तारखेला झालेला आहे, अशा व्यक्तींचा मूलांक ९ असतो. मूलांक ९ चे स्वामित्व मंगळ ग्रहाकडे आहे. मूलांक ९ असलेल्या व्यक्ती धैर्यवान, संयमी असल्याचे मानले जाते. या मूलांकाच्या व्यक्ती सर्वाधिक भाग्यवान असल्याचे सांगितले जाते. जर या मूलांकाच्या व्यक्तींनी एखाद्या कामात आपले १०० टक्के दिले तर त्यांना उच्च दर्जा मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. यामुळेच त्यांना अपार यश आणि प्रगती साध्य करता येऊ शकते.  माणुसकी, उदार आणि सहिष्णू व्यक्ती

मूलांक ९ असलेल्या व्यक्तींमध्ये माणुसकी असते आणि त्यांच्यात सहिष्णुता, उदारताही असते. या व्यक्तींना कला आणि गूढ शास्त्रांमध्ये चांगली रुची असते. या व्यक्ती जास्त पैसे खर्च करत नाहीत. त्यांची आर्थिक स्थिती आयुष्यात सामान्य राहते. हे लोक धर्मादाय इत्यादींमध्ये खूप पैसा खर्च करतात. त्यांच्याकडे कलात्मकता आणि नाट्य प्रतिभा, तसेच लेखन प्रतिभा असते. या मूलांकाचे लोक खूप आक्रमक आणि तापट असतात, असे म्हटले जाते. 

अध्यात्माची आवड, क्षमाशील व्यक्तिमत्त्व

मूलांक ९ असलेल्या व्यक्तींमध्ये आध्यात्मिक जीवन जगण्याची क्षमता आणि विशेषता असते. जन्मतःच त्यांचा देवाकडे कल असतो. हे लोक निःस्वार्थपणे लोकांची सेवा करतात आणि क्षमाशील असतात. या राशीचे लोक जास्त काळ कोणतीही गोष्ट मनामध्ये ठेवत नाहीत. त्यांच्यातील सर्वात चांगली गोष्ट ही आहे की ते त्यांच्या दु:खाचा जास्त काळ विचार करत नाहीत. या मूलांकाच्या व्यक्तींचे जीवन संघर्षमय असते. अनेक वेळा त्यांना त्यांच्या मेहनतीनुसार फळ मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या मनात असंतोषाची भावना निर्माण होते. मात्र, संयम बाळगून जीवनाला शिस्त लावून ते यशस्वी होऊ शकतात. यासाठी रोज ध्यानधारणा करणे उपयुक्त ठरू शकते, असा सल्ला दिला जातो. मात्र, सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, जन्मकुंडली किंवा अंकशास्त्राविषयी अधिक सविस्तर माहिती तज्ज्ञ व्यक्तींकडून घ्यावी.  

टॅग्स :Astrologyफलज्योतिषnumerologyसंख्याशास्त्र