शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Numerology: ‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक पैसे कमावण्यात असतात एक्सपर्ट; शुक्र-लक्ष्मी कृपेने कामे होतात पटापट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 12:44 IST

Numerology: या व्यक्ती मनी माइंडेड असतात. त्यांना विलासी जीवन जगायची आवड असल्याचे सांगितले जाते.

प्राचीन काळापासून ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. नवग्रह आणि १२ राशी, नक्षत्रांचा अभ्यास करून एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील घडामोडीचा अंदाज बांधला जाऊ शकतो. ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखा आहेत. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. 

एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो. १ ते ९ या अंकांचे वर्णन अंकशास्त्रात उपलब्ध आहे. ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५ आणि २४ या तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र ग्रह आहे.  शुक्र हा रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला जातो. या मूलाकांच्या व्यक्तीवर शुक्रासह लक्ष्मी देवीची कृपा असल्याचे सांगितले जाते. यामुळे हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकते.

पैसे कमवण्याची जबरदस्त हौस

मूलांक ६ असलेल्या व्यक्ती आकर्षक असतात. हे लोक कला आणि मनोरंजन प्रेमी असतात आणि सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात. या लोकांना पैसे कमवण्याची जबरदस्त हौस असते. त्यासाठी ते कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातही मेहनत घेतात. या लोकांना मनी माइंडेड असेही म्हणतात.

कोणत्या क्षेत्रात मिळते अपार यश?

मूलांक ६ असलेल्या व्यक्ती मीडिया, फॅशन डिझायनिंग किंवा अभिनयाचा कोर्स केला तर त्यांना चांगले यश मिळू शकते. यासोबतच कपडे, चैनीच्या वस्तू, सोने, चांदी आणि हिरे यांच्याशी संबंधित व्यापार, उद्योग, व्यवसाय खूप प्रगती देऊ शकतो. फिक्कट निळा, हलका गुलाबी आणि पांढरा रंग या मूलांकांच्या व्यक्तींसाठी सर्वांत शुभ मानला जातो.

पैसे खर्च करण्याचीही असते आवड 

मूलांक ६ असलेल्या व्यक्ती शिक्षणातही चांगल्या असतात. ते त्यांच्या मेहनतीने जीवनात भरपूर पैसाही कमावतात. मात्र आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी त्यांना कष्ट करावे लागतात. त्यांना पैसे खर्च करण्याचीही आवड आहे. तसेच, या लोकांना महागड्या वस्तू घेण्याचा शौक असतो. त्यांना वैभवशाली जीवन जगायला आवडते. या लोकांची कामे शुक्राच्या प्रभावाखाली होत असतात. 

टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष