शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Numerology: तुमची जन्मतारीख ‘या’ ३ पैकी आहे? मिळते सूर्य-कृपा, होतात तेजस्वी; पद-पैसा-प्रतिष्ठा लाभते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 14:38 IST

Numerology: सूर्याचे तेज लाभलेल्या या मूलांकाच्या निर्भय, स्वाभिमानी व्यक्तींना पैशांची कमतरता भासत नाही, असे सांगितले जाते.

Numerology: ज्योतिषशास्त्राला प्राचीन काळापासून भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येऊ शकतात. नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. फक्त जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र. या अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांक किंवा भाग्यांकावरून व्यक्तीचा स्वभाव, गुण-वैशिष्ट्ये, भविष्यकथन केले जाऊ शकते. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे.

नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य राशीचक्रातील एक अत्यंत महत्त्वाचा ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रातही गुरुला वरचे स्थान आहे. सूर्य प्रत्येक महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. डिसेंबर महिन्यात सूर्य गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे. अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म १, १०, १९ किंवा २८ या तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक १ आहे. सूर्य हा मूलांक १ चा स्वामी आहे. अंकशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींचा मूलांक १ असतो, त्या खूप प्रभावशाली आणि प्रतिष्ठित मानल्या जातात. 

निर्भय, धैर्यवान आणि स्वाभिमानी असतात

ज्या व्यक्तींचा मूलांक १ आहे, त्या स्वभावाने अतिशय मनमिळावू आणि साध्या असतात. इतकेच नाही तर असे लोक अन्य लोकांशी लवकरच जवळीक वाढवतात. आपल्या गोड बोलण्याने आणि साध्या वागण्याने समोरच्या व्यक्तीचे मन पटकन जिंकतात. या मूलांकाच्या व्यक्ती त्यांच्या कृती आणि बोलण्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव टाकतात. या व्यक्ती प्रामाणिक मानल्या जातात. निर्भय, धैर्यवान आणि स्वाभिमानी असतात. जीवनात येणाऱ्या अडचणींना ते घाबरत नाहीत, असे म्हटले जाते. 

चांगले उद्योगपती, पैशाची कमतरता भासत नाही

मूलांक १ असलेल्या व्यक्ती उत्तम उद्योगपती होऊ शकतात. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे, भाषणाची क्षमता आणि वेळेची बांधिलकी यामुळे या व्यक्ती व्यापार, व्यवसाय आणि उद्योगात चांगली प्रगती करतात. आपले प्रत्येक काम चोखपणे करतात. मूलांक १ असलेल्या लोकांना सर्व कामे शिस्तबद्ध पद्धतीने करण्याची सवय असते. तसेच वेळेचे व्यवस्थापन, कौशल्य आणि नेतृत्वाच्या गुणवत्तेमुळे या व्यक्ती राजकारण, व्यवस्थापन क्षेत्रात उच्च पदांपर्यंत जातात. या मूलांकांची आर्थिक स्थिती चांगली असते. पैशाची कमतरता भासत नाही.

कोणता दिवस आणि रंग शुभ ठरू शकतो? 

मूलांक १ असलेल्या व्यक्तींसाठी रविवार आणि सोमवार हे शुभ दिवस असतात. कोणत्याही कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तसेच मूलांक १ असलेल्या व्यक्तींसाठी पिवळा रंग शुभ मानला जातो. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष