शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

यशाच्या कुलुपाची चावी तुमच्याच खिशात आहे, एकदा तुमचा खिसा तपासून तर पहा; वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 17:29 IST

आपण अपयश गोंजारत बसतो आणि त्या नादात यशाची चावी आपल्याच खिशात असते हे विसरून जातो.

'तुज आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी' हे आपण अनेकदा ऐकतो, पण आजमावून पाहत नाही. यासाठी गरज आहे  विचारांना योग्य दिशा देण्याची! अतिविचाराच्या नादात आपण योग्य मार्ग भरकटतो आणि अपयशी ठरतो. तुमच्याही बाबतीत असेच घडत असेल, तर पुढील गोष्ट तुम्हाला नक्कीच मदत करेल.

एक माणूस चावीशिवाय कुलूप उघडण्यात तरबेज होता. त्याने आपल्या कलेचा वापर गैरकामांसाठी कधीच केला नाही. उलट पुरातत्त्व विभागाकडून काही अमूल्य पेटाऱ्यांचे कुलूप उघडण्यासाठी त्याला पाचारण केले जाई. अशी अनेक कुलूपे त्याने आपल्या हयातीत चावीशिवाय उघडली होती. त्याच्या नावावर विश्वविक्रम नोंदवला गेला होता. 

त्याचे हे कसब पाहण्यासाठी एकदा त्याला मोठ्या कार्यक्रमाचे आमंत्रण आल़े  तिथे भल्या मोठ्या समुदायाच्या उपस्थितीत त्याला स्विमिंग टँकमध्ये उतरून तिथे ठेवलेल्या पिंजऱ्यातील कुलूप उघडायचे होते. त्याने ते आव्हान स्वीकारले. 

ठरलेल्या दिवशी तो कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला. हजारो लोक तिथे उपस्थित होते. आयोजकांनी त्याला स्विमिंग पूल दाखवला आणि त्याच्या आत असलेल्या पिंजऱ्यामध्ये त्याला बंद केला. पिंजरा पाण्यात सोडण्याआधी आयोजकांनी त्याला सांगितले, जर तुम्हाला कुलूप उघडता आले नाही आणि पाण्यात तुम्ही फार काळ तग धरू शकला नाहीत तर बाजूला असलेले सेफ्टी बटन दाबताच तुम्ही सुरक्षितपणे वर येऊ शकता. 

या बटणाची आपल्याला गरजच लागणार नाही या अविर्भावात तो कलाकार पाण्यात उतरला. खाली जात असताना हजारो प्रेक्षकांसमोर स्वत:ला सिद्ध करण्याचे दडपण त्याच्या मानगुटीवर होते. तरी त्याने कामावर लक्ष केंद्रित केले आणि तो कुलुप उघडण्याचा आटोकाठ प्रयत्न करू लागला. परंतु काही केल्या कुलूप उघडत नाही पाहून तो हताश झाला. आज अपयशाला सामोरे जावे लागणार या विचाराने त्याने जीव वाचवण्याच्या बेताने सेफ्टी बटन दाबले आणि तो पिंजऱ्यातून मुक्त होऊन वर आला. 

त्याने अपयश मान्य केले. तेव्हा आयोजक म्हणाले, ते कुलूप उघडणारे नव्हतेच, परंतु तुमची खरी सुटका पिंजऱ्याच्या बाजूला असलेल्या दारातून होणार होती. ते कुलूप साध्या धक्याने उघडणार होते, तुम्ही ते न करता हार पत्करून सेफ्टी बटन दाबलेत!

कलाकाराला त्यादिवशी मोठी शिकवण मिळाली. आपण अपयश गोंजारत बसतो आणि त्या नादात यशाची चावी आपल्याच खिशात असते हे विसरून जातो. म्हणून यशाचे द्वार उघडायचे असेल तर आधी स्वत:कडे बघा, स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा आणि डोके शांत ठेवून विचार करा म्हणजे कठीणात कठीण कुलूपेही चावीशिवाय आपोआप उघडतील!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी