शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन..! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 11:43 IST

शेवटी त्या कर्माचं आणि फळाचं गणित हे प्रारब्धावर अवलंबून असते..

फळाची अपेक्षा न बाळगता आयुष्यात आपण नेहमी फक्त कर्म करत राहावे. आणि ते कर्म सत्याच्या वाटेवरचं आणि कमीपणाचा अभिनिवेश मानता करणे गरजेचे आहे. शेवटी त्या कर्माचं आणि फळाचं गणित हे प्रारब्धावर अवलंबून असते.मग आपोआप गमावण्याची भीती आणि शून्यपणाची लाज गळून पडते.  दुकानात कामाला असणारा एक नोकर मालकाला कोणतीही पूर्व कल्पना न देता गैरहजर राहिला. मालकाला वाटलं ह्याचा जर पगार वाढवला तर हा काम मन लावून करेल. म्हणून पुढच्या वेळेस मालकाने पगाराहुन अधिक पैसे त्याला दिले. तो काही बोलला नाही , त्याने चुपचाप मिळालेले पैसे ठेवून दिले. काही महिन्यानंतर परत त्याचप्रमाणे घडले. तो कोणतीही पूर्व कल्पना न देता सुट्टीवर गेला . 

मालकाला त्याचा खूप राग आला आणि त्याने विचार केला की, याचा पगार वाढवून काय फायदा झाला? हा काही सुधारणार नाही. पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढवलेला पगार कमी करून त्याच्या हाती रक्कम ठेवली . त्याने कुठलीही तक्रार न करता चुपचाप तो पगार घेतला. मालकाला खूप आश्चर्य वाटलं.       अखेर न राहवून त्याने त्याला विचारलं, ''मागच्या वेळेस तू गैरहजर राहीलास तरी तुझा पगार वाढवला. तेंव्हा सुद्धा तू काही बोलला नाहीस आणि ह्या वेळेस सुद्धा तू न पूर्वसुचना गैरहजर राहिला.  म्हणून तुझा वाढवलेला पगार कापला. तरीही तू काही बोलत नाही.. असं का ? त्यावर त्याने दिलेलं उत्तर विचार मनाला भिडणारं होतं. .''तो म्हणाला, मालक पहिल्या वेळी मी गैरहजर राहीलो त्यावेळी मला मुलगा झाला होता. तुम्ही माझा पगार वाढवलात तेंव्हा मी विचार केला , देवाने माझ्या मुलाचा पालनपोषणाचा हिस्सा पाठवला. दुसऱ्यांदा जेंव्हा मी गैरहजर राहिलो तेंव्हा माझ्या आईचं निधन झाले होते. आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात. मी मनाशी विचार केला माझी आई तिचा वाटा तिच्या बरोबर घेऊन गेली .मग मी ह्या पगाराबद्दल चिंता का करू ?ज्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे ...

.शिकवण : जीवनात काय मिळवलं आणि काय गमावलं असं जर कुणा विचारलं तर ,आवर्जून सांगा, जे गमावलं तो माझा अविचार होता आणि जे कमावलं ती सद्गुरू कृपा होती.. 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक