Kartik Som Pradosh Vrat 2025: अलीकडेच मराठीतील अत्यंत महात्म्य असलेला आणि अनन्य साधारण महत्त्वाचा चातुर्मास काळ समाप्त झाला आहे. कार्तिक महिना सुरू आहे. या कार्तिक महिन्यातील प्रदोष व्रत सोमवारी येत आहे. महादेव शिवशंकरांना समर्पित असलेले प्रदोष व्रत अत्यंत शुभ फलदायी असल्याचे म्हटले जाते. सोमवार, ०३ नोव्हेंबर २०२५ रोजी सोम प्रदोष आहे. सोमवारी प्रदोष येणे शुभ पुण्य फलदायी मानले जात आहे.
प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. शिवपूजेसह महादेवांच्या मंत्रांचा जप, नामस्मरण, विविध स्तोत्रांचे मनोभावे पठण करावे किंवा श्रवण करावे, असे सांगितले जाते. अनेकदा घरातील वास्तुदोषामुळे काही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत असतो. पितृदोषाचेही प्रतिकूल परिणाम भोगावे लागतात. सोम प्रदोष दिवशी काही उपाय केल्यास वास्तुदोष आणि पितृदोषातून काही अंशी दिलासा मिळू शकतो, पूर्वजांचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे म्हटले जाते.
सोम प्रदोष व्रतात शिव महादेव पूजनासह ‘हे’ आवर्जून करा
- घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर-पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावे. प्रदोष काळी म्हणजे दिवेलागणीच्या वेळेला एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
- घरातील उत्तर-पूर्व दिशेला महादेवांचे स्थान मानले गेले आहे. या दिशेला चंदन किंवा सुवासिक चंदनासंदर्भात वस्तू ठेवल्यास उत्तम मानले जाते. शिवकृपेने घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते, असे सांगितले जाते.
- घरातील संकट दूर करण्यासाठी ईशान्य दिशेला शिव परिवाराचे चित्र लावावे. भगवान शिव, माता पार्वती, कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्रे लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते. कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात. भगवान शंकरांचा परिवार आदर्श परिवार मानला जातो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते.
- घरात कलह किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ असते. ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते, त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा. लघुरुद्र, महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी इच्छित फलदायी ठरते.
- पितृदोष असल्यास पारद शिवलिंगाचे दररोज पूजन करावे, असा सल्ला दिला जातो. यासह अनेक समस्या, अडचणी दूर होऊ शकतात, असे सांगितले जाते.
- यादिवशी शंकराला बिल्व पत्र वाहावे. रुद्राभिषेक सुरु असताना मनोमन ॐ नमः शिवाय हा जप करत अर्पण केलेले बिल्व दल मनातील निचरा दूर करून सन्मार्गास प्रवृत्त करते, असे सांगितले जाते.
- पारद शिवलिंग घरात ठेवल्यास वास्तुदोष दूर होऊ शकतात, अशी मान्यता आहे. शिवपुराणात पारद शिवलिंगाचे महत्त्व सांगितले आहे. मात्र, याची स्थापना अतिशय शास्त्रशुद्ध आणि योग्य पद्धतीने करावी, असे सांगितले जाते. पारद शिवलिंगामुळे घराचे संरक्षण होण्यास मदत होते, असे म्हटले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥
Web Summary : On Som Pradosh 2025, worship Lord Shiva and perform remedies to alleviate Vastu Dosh and Pitra Dosh. Plant Bel tree, keep sandalwood, Shiv Parivar picture, do Rudrabhishek, worship Parad Shivling, offer Bel leaves for blessings.
Web Summary : सोम प्रदोष २०२५ पर, भगवान शिव की पूजा करें और वास्तु दोष और पितृ दोष को कम करने के उपाय करें। बेल का पेड़ लगाएं, चंदन रखें, शिव परिवार की तस्वीर लगाएं, रुद्राभिषेक करें, पारद शिवलिंग की पूजा करें, आशीर्वाद के लिए बेल पत्र अर्पित करें।