शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

Kamada Ekadashi 2022: आज हिंदू नवं वर्षातील पहिली एकादशी; वर्षभरातील समस्त एकादशींचे महत्त्व थोडक्यात जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 08:00 IST

Kamada Ekadashi 2022: वर्षभरातील प्रत्येक एकादशीला महत्त्व आहे. ते महत्त्व काय आहे, हे जाणून घेऊया.

एकादशी या तिथीला हिंदू धर्मशास्त्रात अतिशय महत्त्व आहे. हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो, पारमार्थिक ओढ लागते, संसार सुखाचा होतो. निरोगी काया, सुदृढ आरोग्य आणि धन संपत्तीचा लाभ होतो. ईश्वरासमीप नेणारे हे व्रत अतिशय फलदायी आहे. म्हणून दर महिन्यात दोनदा एकादशी येतात. त्याचे पालन करणाऱ्यांना भगवान विष्णुंचा आशीर्वाद प्राप्त होतो. आज कामदा एकादशी. वर्षभरातील प्रत्येक एकादशीला महत्त्व आहे. ते महत्त्व काय आहे, हे जाणून घेऊया.

>> चैत्रात कामदा आणि वरुथिनी एकादशी येते. कामदा एकादशीमुळे राक्षस योनीतून सुटका मिळते आणि वरुथिनी एकादशीमुळे सर्वकार्यसिद्धी प्राप्त होते. 

>> वैषाखात मोहिनी आणि अपरा एकादशी येते. ही एकादशी विवाह, सुख, शांती, समाधान प्रदान करते. त्याचबरोबर मोह मायेतून मुक्त करते. अपरा एकादशी सर्व पापांमधून मुक्त करते.

>> ज्येष्ठ मासात निर्जला एकादशी आणि योगिनी एकादशी येते. निर्जला एकादशीला अन्नग्रहणच काय तर पाणीही न पिता हे व्रत करायचे असते. ते केले असता सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते. तसेच योगिनी एकादशीमुळे कौटुंबिक सुख मिळते.

>> आषाढ महिन्यात देवशयनी आणि कामिका एकादशी येते. देवशयनी एकादशी अर्थात आषाढी एकादशीला वारीचे व्रत अंगिकारले जाते. वारी हा आयुष्याला समृद्ध करणारा अनुभव असतो. तो आयुष्यात प्रत्येकाने एकदातरी घ्यायलाच हवा. कामिका एकादशीचे व्रत केल्याने पुढील जन्म कुयोनित अर्थात वाईट कुळात होत नाही.

>> श्रावणात पुत्रदा आणि अजा एकादशी येते. संतानप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते. तर अजा एकादशीच्या व्रत हे मुलांवर कोणतेही संकट ओढावले जाऊ नये, त्यांना कसलीही कमतरता जाणवू नये यासाठी केले जाते. 

>> भाद्रपदात परिवर्तिनी आणि इंदिरा एकादशी येते. परिवर्तिनी एकादशीमुळे प्रापंचिक दु:ख दूर होते. इंदिरा एकादशीमुळे पितरांना  मोक्ष मिळून स्वर्गप्राप्ती होते.

>> अश्विन मासात पापांकुशा आणि रमा एकादशी येते. पापांकुशा एकादशीमुळे सर्व प्रकारच्या पापातून मुक्ती मिळून घरात भरभराट होते. तर रमा एकादशीमुळे सुख आणि ऐश्वर्य यांची प्राप्ती होते.

>> कार्तिक महिन्यात प्रबोधीनी अर्थात देवउठनी एकादशी तसेच उत्पन्ना एकादशी येते. कार्तिकी एकादशी केली असते भाग्य जागृत होते. त्यादिवशी तुळशीचा विवाह लावून दिला जातो.

>> मार्गशीर्ष मासात मोक्षदा आणि सफला एकादशी येते. मोक्षदा एकादशी मोक्ष देणारी तर सफला एकादशी यश देणारी असते.

>> पौष महिन्यात पुत्रदा आणि षटतिला एकादशी असते. पुत्रप्राप्तीसाठी पुत्रदा आणि दारिद्रय, दुर्भाग्यातून सुटका व्हावी यासाठी षटतिला एकादशी केली जाते. 

>> माघ मासात जया आणि विजया एकादशी येते. जया एकादशी सद्भाग्यप्राप्ती मिळवून देते तर विजया एकादशी शत्रूवर मात करण्याचे बळ देते.

>> फाल्गुन मासात आमलकी आणि पापमोचनी एकादशी येते. आमलकी एकादशीला आवळ्याच्या वृक्षाची पूजा केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते. तर पापमोचनी एकादशी आपल्याला पापातून मुक्ती देते.

>> ज्या वर्षी अधिक मास येतो, त्या मासात पद्मिनी एकादशीची भर पडते. ही एकादशी सर्व प्रकारचे सुख, आयुरारोग्य, धन धान्याची प्राप्ती देते.

वर्षभरातील सर्व एकादशी काही ना काही लाभ मिळवून देणाऱ्या आहेत. परंतु यापलीकडे जाऊन विचार केल्यास लक्षात येते, की एकादशी ही तिथी भगवान महाविष्णूंना प्रिय असल्याने आपला भक्तीमार्गाचा प्रवास सुकर होतो आणि त्यांची कृपादृष्टी लाभते.