शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 11:40 IST

Kalbhairav Jayanti 2024: २३ नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती आहे. या दिवशी महादेवाची पूजा करून काल भैरवाच्या स्वरूपाचे स्मरण करून दिलेले स्तोत्र म्हणावे.

महादेवाचे एक रूप म्हणजे कालभैरव. दैत्य विनाशासाठी त्यांनी कार्तिक अष्टमीला कालभैरवाचा अवतार घेतला. म्हणून दर महिन्यात अष्टमीची तिथी महादेवाच्या उपासनेची तिथी अर्थात कालाष्टमी या नावे साजरी केली जाते. मात्र कार्तिक अष्टमीला अर्थात यंदा २३ नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती (Kalbhairav Jayanti 2024) आहे. या औचित्याने काल भैरवाची उपासना जाणून घेऊ. 

भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते, असे सांगितले जाते. कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवांचा जन्म झाला होता. त्यामुळे कार्तिक महिन्यातील अष्टमीला काळभैरव अष्टमी असे देखील म्हटले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमी ही काळभैरवला समर्पित आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यात "कालाष्टमी" असते. पण या सर्वात महत्वाची कार्तिक महिन्याची अष्टमी असून हा दिवस पापी, अत्याचारी व अन्यायी लोकांना शिक्षा देण्याचा दिवस म्हणून मानला जातो, अशी आख्यायिका आहे. मान्यतेनुसार काळा कुत्रा हा काळभैरवचे प्रतीक मानला जातो. या दिवशी काळभैरवाष्टक तसेच महाकाळभैरवाष्टक म्हणावे. व काळभैरवाची स्तुती करावी. 

कालभैरवाष्टकम्

देवराज्य सेव्यमान पावनाघ्रिपंकजम्।व्यालयज्ञ सूत्रमिंदू शेखरं कृपाकरम्।नारदादि योगिवृंद वंदितं दिगंबरम्।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे ।।१।।

भानुकोटिभास्वरं भवाब्दितारकं परं।नीलकण्ठमीप्सिथार्थ दायकं त्रिलोचनम।कालकाल मम्बुजाक्ष मक्षशूलमक्षरं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।२।।

शूलटंक पाशदण्ड पाणिमादिकारणं।श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम।भीमविक्रम प्रभुं विचित्र तांडवप्रियं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।३।।

भुक्तिमुक्ति दायकं प्रशस्तलोकविग्रहं।भक्तवस्तलं स्थितं समस्तलोकविग्रहं।विनिकण्वन्मनोज्ञ् हेम् किंकिणीलस्तकटिं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।४।।

धर्मसेतू पालकं अधर्ममार्ग् नाशकम्।कर्मपाशमोचकम् सुशर्मदारकम् विभुम्।स्वर्णवर्ण शेष् पाश शोभितांगमण्डलं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।५।।

रत्नपादुकाप्रभाभिराम पाद युग्मकम्।नित्यमद्वितीयमिष्ट दैवतं निरंजनम्।मृत्युदर्प नाशनं करालदंष्ट्र मोक्षणम्।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।६।।

अट्टहास भिन्नपद्म जाण्ड् कोश संततिं।दृष्टिपात नष्टपाप जालमुग्र शासनं।अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।७।।

भूतसंघनायकं विशालकिर्तीदायकं।काशिवास लोकपुण्यपापशोधकं विभुम्।नितिमार्गकोविदम् पुरातनम् जगत्पतिं।काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे।।८।।

कालभैरवाष्टकम् पठन्ति ये मनोहरं।ज्ञानमुक्ति साधनम् विचित्रपुण्यवर्धनम्।शोक मोह दैन्य लोभ कोपतापनाशनम्।ते प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिम् धृवम् ।।९।।

इति श्रीमत् शंकराचार्यविरचितं कालभैरवाष्टकम् संपूर्णम्।

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२४