शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

Kalashtami: १० जून : कालाष्टमीनिमित्त करा ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय; कालभैरवाच्या पूजेने दूर होतील अपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 07:00 IST

Kalashtami: दर महिन्यातील अष्टमीच्या तिथीला कालभैरवाची पूजा आणि ज्योतिष शास्त्रात दिलेले तोडगे केले असता घर संसाराला पुष्कळ लाभ होतो

आज, शनिवार १० जून २०२३ रोजी मासिक कालाष्टमी आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिवशंकराचे स्वरूप असलेल्या कालभैरवची पूजा केली जाते. या मुहूर्तावर ज्योतिष शास्त्रात दिलेला उपाय करा, त्याचा निश्चित लाभ होईल. 

कालाष्टमी तिथीचे महत्त्व: 

पौराणिक कथेनुसार, कालाष्टमीच्या तिथीवर भगवान शिवाने दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी उग्र रूप धारण केले होते. ते रूप म्हणजे कालभैरवाचे रूप. त्या तिथीची आठवण म्हणून दर महिन्यात कालाष्टमी व्रत केले जाते. 

मासिक कालाष्टमी तिथी आणि पूजा शुभ मुहूर्त : 

दर महिन्याच्या कृष्ण पक्षात अष्टमी तिथी कालाष्टमी म्हणून साजरी केली जाते. या महिन्यात १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९.४५ वाजता अष्टमी सुरू होईल आणि १४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९.४५ वाजता समाप्त होईल. या दिवशी कालभैरवाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

कालाष्टमीच्या दिवशी हे उपाय करा :

सुखी वैवाहिक जीवन मिळवण्याचा उपाय- वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी आज सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी शमीच्या झाडाला किंवा पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हा उपाय केल्याने शिवशंकराच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. 

धनप्राप्तीचा उपाय- आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी कालाष्टमीला पिंपळाच्या झाडाची पूजा करा. तुमच्या घरात पैशाची आवक झपाट्याने वाढेल.

अज्ञात भीती आणि अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्त होण्याचा उपाय - जर तुम्हाला विनाकारण एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर कालाष्टमीच्या रात्री कालभैरवाची पूजा करा. त्यानंतर 'ओम हरी बम बटुकाय आपदुद्धाराय कुरुकुरु बटुकाय हरी' या मंत्राचा जप करा. तो शक्य नसेल तर ओम नमः शिवाय मंत्राचा १०८ वेळा जप करा. याशिवाय आज कालभैरवाष्टकाचे पठण केल्याने खूप शुभ फळ मिळते.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष