शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
3
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
4
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
5
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
6
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
7
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
8
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
9
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
10
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
11
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
12
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
13
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
14
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
15
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
16
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
17
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
18
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
19
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
20
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम

ज्येष्ठ निर्जला एकादशी: एकदाच व्रत करा, २४ एकादशींचे पुण्य मिळवा; पाहा, महात्म्य अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 09:24 IST

Jyesth Nirjala Ekadashi June 2025 Vrat Puja Vidhi In Marathi: मराठी वर्षांत येणाऱ्या सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशीचे महत्त्व आणि महात्म्य अनन्य साधारण असल्याचे म्हटले जाते. व्रत पूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या...

Jyesth Nirjala Ekadashi June 2025 Vrat Puja Vidhi In Marathi: मराठी वर्षातील तिसरा ज्येष्ठ महिना सुरू झाला आहे. ज्येष्ठ महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जातो. ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी निर्जला एकादशी म्हणून ओळखली जाते. संपूर्ण वर्षात येणाऱ्या २४ एकादशींमध्ये निर्जला एकादशीचे महत्त्व आणि महात्म्य अनन्य साधारण असल्याचे सांगितले जाते. निर्जला एकादशीचे व्रत कसे करावे? जाणून घ्या...

प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. ०६ जून २०२५ रोजी निर्जला स्मार्त एकादशी आहे. निर्जला एकादशीला श्रीविष्णूंच्या पूजनाने, भजनाने आणि उपासनेने जीवनातील विघ्न दूर होतात. सुख, शांतता, समृद्धी येते, असेही सांगितले जाते. 

निर्जला एकादशीचे महत्त्व अन् महात्म्य

ज्येष्ठ मासातील एक महत्त्वाचे व्रत म्हणजे निर्जला एकादशी. निर्जला एकादशीला दोन्ही वेळी खायचे तर नाहीच, शिवाय पाणीदेखील प्यायचे नाही असा नियम आहे. मराठी वर्षात एकूण २४ एकादशी येतात. पण असे म्हणतात की,  संपूर्ण वर्षातील दुसरी कोणतीही एकादशी न करता या एकादशीचे व्रत विधीपूर्वक केले, तर सर्व एकादशीचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. म्हणून या एकादशीला अधिक महत्त्व आहे. या दिवशी काहीही न खातापिता उपास करावा. श्रीविष्णूंची विधिवत पूजा करावी. गायन, नृत्य करून रात्री जागरण करावे. दुसऱ्या दिवशी पुन्हा श्रीविष्णूंची यथासांग पूजा करून, गरजूंना दान देऊन मग उपास सोडावा. हे व्रत केल्याने दीर्घायुष्य लाभते. सुदृढ आरोग्य प्राप्त होते, असे म्हटले जाते. आजच्या धकाधकीच्या जीवनात सगळ्यांनाच हे व्रत शक्य होईल असे नाही. त्यामुळे संपूर्ण अन्न पाण्याचा त्याग करून नाही, तर निदान फक्त फलाहार करून हे व्रत करण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले जाते.

निर्जला एकादशीचे व्रत कसे करावे?

निर्जला एकादशी व्रताचरण आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा यानुसार पूजन करावे. षोडषोपचार पूजा शक्य नसेल, तर पंचोपचार पूजा करावी. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा पाळून एकादशी व्रताचरण करावे. 

निर्जला एकादशी व्रताची सांगता कशी करावी?

निर्जला एकादशीला जागरण करून भजन, कीर्तनात रात्र जागवावी, असे सांगितले जाते. एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.

 

टॅग्स :ekadashiएकादशीspiritualअध्यात्मिकPuja Vidhiपूजा विधीAdhyatmikआध्यात्मिक