शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

अंगारक संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रताचरण, बाप्पा करेल शुभ; जाणून घ्या, चंद्रोदयाची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 15:51 IST

Jyeshtha Angarki Sankashti Chaturthi June 2024: अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष मानली जाते. या दिवशी केलेल्या व्रताचे शुभ पुण्यफल मिळते, असे म्हटले जाते. जाणून घ्या, चंद्रोदय वेळ...

Jyeshtha Angarki Sankashti Chaturthi June 2024: गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला ‘अंगारकी’ म्हणण्याची प्रथा आहे. विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. जून महिन्यातील ज्येष्ठ वद्य चतुर्थी मंगळवारी आल्याने ही संकष्ट चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी होत आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीचा व्रतपूजा विधी, चंद्रोदय वेळ पाहुया...

अंगारक म्हणजे मंगळ. या दिवशी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते. अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले, तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते, शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्टया केल्याचे पुण्य मिळते, अशी काही भाविकांची समजूत आहे, तर अंगारक चतुर्थी ही वीस संकष्ट चतुर्थ्या केल्याचे पुण्य देते, असेही काहींचे मानणे आहे. म्हणूनच हा उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. हजारो भाविक या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतात. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. 

ज्येष्ठ अंगारक संकष्ट चतुर्थी: २५ जून २०२४

ज्येष्ठ अंगारक संकष्ट चतुर्थी प्रारंभ: २४ जून २०२४ रोजी मध्यरात्री ०१ वाजून २३ मिनिटे.

ज्येष्ठ अंगारक संकष्ट चतुर्थी सांगता: २५ जून २०२४ रोजी रात्रौ ११ वाजून ११ मिनिटे.

सामान्यतः सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. मात्र, संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रदर्शनाला महत्त्व असून, हे प्रदोष काळी करायचे व्रत आहे. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय, चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले गेले आहे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते. 

संकष्ट चतुर्थी व्रतपूजनाची सोपी पद्धत

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे. गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. 

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ 

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ १० वाजून २८ मिनिटे
ठाणेरात्रौ १० वाजून २८ मिनिटे
पुणेरात्रौ १० वाजून २३ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ १० वाजून २३ मिनिटे
कोल्हापूररात्रौ १० वाजून १९ मिनिटे
सातारारात्रौ १० वाजून २२ मिनिटे
नाशिकरात्रौ १० वाजून २६ मिनिटे
अहमदनगररात्रौ १० वाजून २० मिनिटे
धुळेरात्रौ १० वाजून २३ मिनिटे
जळगावरात्रौ १० वाजून २० मिनिटे
वर्धारात्रौ १० वाजून ०७ मिनिटे
यवतमाळरात्रौ १० वाजून ०८ मिनिटे
बीडरात्रौ १० वाजून १६ मिनिटे
सांगलीरात्रौ १० वाजून १८ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ १० वाजून २० मिनिटे
सोलापूररात्रौ १० वाजून १४ मिनिटे
नागपूररात्रौ १० वाजून ०५ मिनिटे
अमरावतीरात्रौ १० वाजून ११ मिनिटे
अकोलारात्रौ १० वाजून १४ मिनिटे
छत्रपती संभाजीनगररात्रौ १० वाजून १९ मिनिटे
भुसावळरात्रौ १० वाजून १९ मिनिटे
परभणीरात्रौ १० वाजून १२ मिनिटे
नांदेडरात्रौ १० वाजून ०९ मिनिटे
धाराशीवरात्रौ १० वाजून १४ मिनिटे
भंडारारात्रौ १० वाजून ०३ मिनिटे
चंद्रपूररात्रौ १० वाजून ०३ मिनिटे
बुलढाणारात्रौ १० वाजून १७ मिनिटे
मालवणरात्रौ १० वाजून २१ मिनिटे
पणजीरात्रौ १० वाजून १९ मिनिटे
बेळगावरात्रौ १० वाजून १७ मिनिटे
इंदौररात्रौ १० वाजून २१ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ १० वाजून १८ मिनिटे

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीganpatiगणपतीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३