शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

ढोलकल डोंगरावरील गुप्त गणेश मंदिराची शब्दसफर खास अंगारकीनिमित्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 15:15 IST

२०१२ मध्ये या स्थानाची माहिती कळल्यानंतर ट्रेकर्स साठी हे गिर्यारोहणाचे ठिकाणही बनले आहे.

छत्तीसगड येथील दांतेवाडा जिल्ह्यात ढोलकल डोंगरावर गुप्त गणेश मंदिर स्थित आहे. रायपूर पासून अवघ्या ३५० किलोमीटर दूर दांतेवाडा जिल्हा आहे आणि तिथल्याच एका डोंगरावर विराजमान झाले आहेत श्रीगणेश. आज अंगारकीनिमित्त त्या स्थानाचे महात्म्य जाणून घेऊ. 

३००० फूट उंचारव असलेली ही गणेशमूर्ती ९ व्या शतकात बनवली गेली आहे असे म्हटले जाते. ग्रैनाइटपासून बनलेली ही मूर्ती तीन फूट लांब व साडे तीन फूट रूंद आहे. 

पौराणिक कथा :

असे म्हटले जाते, की भगवान परशुराम आणि गणपतीचे याच डोंगरावर भीषण युद्ध झाले होते. युद्धाचे कारण असे, की भगवान परशुराम यांनी महादेवांकडून तपश्चर्येने भरपूर शक्ती प्राप्त केली होती व त्या शक्तीचा वापर करून ते युद्ध जिंकून आले होते. महादेवांचे आभार मानण्यासाठी ते कैलासावर जात असताना वाटेत गणपती बाप्पाने त्यांना या डोंगरावर अडवले होते. या युद्धात परशुरामांच्या हातातील परशुच्या आघाताने बाप्पाचा एक दात अर्धा तुटला. तेव्हापासून बाप्पाला एक दात पूर्ण आणि दुसरा अर्धा अशीच मूर्ती पहायला मिळते. या युद्धात परशु या शस्त्रामुळे त्या डोंगरावर भेग पडली आणि तेथील खडकही लोखंडी झाले असे म्हणतात. म्हणून त्या डोंगरावरील खडकांना लोखंडी खडक म्हटले जाते. 

रम्य परिसर आणि खडतर प्रवास :

डोंगराच्या माथ्यावर पोहोचायला तुम्हाला ५ किलोमीटरचा खडतर रस्ता चढून पार करावा लागतो. या प्रवासात तुम्हाला घनदाट जंगल, धबधबे, जुने वृक्ष आणि पुरुषभर उंचीची वारूळे नजरेस पडतात. या प्राचीन मंदिराचा शोध १९३४ मध्ये एका परदेशी भौगौलिक अभ्यासकाने लावला होता. त्यानंतर अलीकडे २०१२ मध्ये दोन पत्रकार ट्रेकिंग करत तिथे पोहोचले आणि त्यांनी तेथील फोटो व माहिती व्हायरल केली, त्यानंतर ट्रेकर्सना चढाई करायला नवा डोंगर सापडला. 

या स्थानाबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली जाते, ती अशी, की २०१२ मध्ये या स्थानाचा पत्ता लागल्यावर स्थानिकांनी शासनाच्या मदतीने या मूर्तीचे भग्न अवशेष आसपासच्या परिसरात शोधून मूर्तीचा जिर्णोद्धार केला आणि त्या मंदिराला गुप्त गणेश मंदिर असे नाव दिले. 

तिथे पोहोचण्यासाठी स्थानिक मुले गाईड म्हणून काम करतात. त्यांनी हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित केला आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगारही मिळत आहे, ही बाप्पाचीच कृपा म्हणायला हवी, नाही का?

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी