शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:52 IST

Jagannath Rath Yatra 2025 : आजपासून अर्थात आषाढ शुद्ध द्वितीयेपासून जगन्नाथ रथ यात्रेला सुरुवात झाली, त्यानिमित्त जगन्नाथाच्या या अनोख्या रूपाची कथा जाणून घेऊ.

आपल्या देशात चार दिशांना चार प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. त्यांनाच चारधाम म्हणतात. पूर्व दिशेल ओरिसा राज्यात श्रीजगन्नाथाचे स्थान असून त्या स्थानावरून त्या शहराला `जगन्नाथपुरी' असे नाव पडलेले आहे. येथे जगन्नाथ म्हणजे भगवान श्रीकृष्ण. 

आषाढ शुद्ध द्वितीयेच्या दिवशी म्हणजे आजपासून पुरी येथे जगन्नाथाची यात्रा(Jagannath Rath yatra 2025) धुमधडाक्यात निघते. 

श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यामध्ये त्यांची बहीण सुभद्रा अशी तिन्ही भावंडे तीन वेगवेगळ्या प्रचंड रथावर विराजमान झालेली असतात. ते अतिभव्य रथ ओढायला शेकडो भाविक पुढाकार घेतात. या रथयात्रेत अक्षरश: लाखो भाविकांची उपस्थिती असते. 

Gupta Navaratri 2025 : कामाख्या मंदिरात होत आहे तांत्रिकांची गर्दी कारण सुरु झाली आहे आषाढ गुप्त नवरात्र!

ओरिसा राज्यातील समुद्रतीरी बांधण्यात आलेल्या मंदिरातील श्रीकृष्णाच्या काष्ठमूर्तीला जगन्नाथ नावाने संबोधण्यात येते. या मंदिरात जगन्नाथाच्या मूर्तीबरोबर सुभद्रा आणि बलराम यांच्याही मूर्ती आहेत. आषाढ शुद्ध द्वितीया या दिवशी रथामध्ये या मूर्ती ठेवून रथयात्रा काढली जाते. या उत्सवात लाखो भाविक रथ ओढतात.

सध्याचे जगन्नाथचे मंदिर १२ व्या शतकात बांधले असावे. लाकडाच्या ओबडधोबड मूर्तींना हातपाय नाहीत. फक्त डोळे, नाक व तोंड हे अवयव आहेत. याबाबतीत एक परंपरागत कथा आहे ती अशी-

प्राचीन काळी पुरी नगरीमध्ये इंद्रद्युम्न राजा राज्य करीत होता. त्याने आपल्या नगरात देवमंदिर बांधले, पण त्या स्थापन करण्यासाठी इंद्रनील मण्याची सुंदर मूर्ती हवी होती. मोठ्या कष्टाने त्याने त्या मूर्तीचा शोध लावला. एक शबदर नित्य तिथे जाऊन तिची पूजा करत होता. राजाने एक सैन्यतुकडी मूर्ती आणण्यास पाठवली. पण मूर्ती तिथून अदृश्य झाली.  त्याच रात्री स्वप्नात येऊन नीलमाधवाने राजाला म्हटले, `हे राजा, तू अहंकाराने माझा भक्त शबदर याच्याकडून मला छिनावून आणणार होतास म्हणून मी अदृष्य झालो. आता मी तुझ्या राज्यात चंदनी ओंडक्याच्या रूपाने प्रगट होईन. त्या ओंडक्यावर पद्म आणि चक्र ही चिन्हे दिसली की, तीच माझी मूर्ती आहे असे समज. 

तसा ओंडका सापडला. पण त्याच्यावर सुताराची हत्यारे चालेनात. अनंत नावाच्या एका म्हाताऱ्या मूर्तीकाराने राजाला सांगितले, देवळाच्या गाभाऱ्यात मला एकवीस दिवस एकटा कोंडून ठेव आणि देवळाचे सर्व दरवाजे बंद कर. या मुदतीत मी या ओंडक्याची मूर्ती घडवीन. एकवीस दिवसांनी तू गाभाऱ्याचा दरवाजा उघड. राजाने मान्य केले. तरीपणे संशयशिच्चाने ग्रस्त होऊण आणि राणीच्या आग्रहामुळे मुदतीच्या आधीच दार त्याने उघडले. तर त्याला हातपाय नसलेला डोळे वटारलेला मुखवटा दिसला. मूर्तीकार मात्र अदृश्य झाला. तेव्हापासून अशाच रुपाच्या मूर्तीची रथयात्रा काढली जाते.

Astrology: शुक्रवारी गौरी योगात पाच राशींवर लक्ष्मीकृपा होणार; धनधान्याची काळजी मिटणार!

आषाढ शुद्ध द्वितीयेपासून आठ दिवस हा उत्सव चालतो. सर्व भारतातून लाखो भाविक जगन्नाथाचा रथ आपल्या हातांनी ओढण्यासाठी येतात. कृष्ण, बलराम आणि सुभद्रा या तिन्ही मुर्तींसाठी तीन मोठे रथ दरवर्षी बनवतात. मंदिराच्या सिंहद्वारापासून रथयात्रा निघते आणि जनकापुरापर्यंत जाते. येथे जगन्नाथाला भेटण्यासाठी लक्ष्मी येते अशी भाविकांची समजूत आहे.

टॅग्स :Jagannath Rath Yatraजगन्नाथ यात्राIndian Festivalsभारतीय उत्सव-सण