शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
6
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
7
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
8
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
9
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
10
पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : ‘ग्रेस’ यांचे पहिले पुस्तक असे आले
11
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
12
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
14
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
15
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
16
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
17
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
18
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
19
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,

इंदोरचे पितरेश्वर हनुमान मंदिर; ७१ फूट उंच मूर्ती आणि पितृ पर्वतावर १ लाख झाडांची लागवड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 11:55 IST

आज जागतिक वन दिवस; त्यानिमित्ताने इंदोरच्या पितृ पर्वतावर एक लाख झाडांच्या परिसरात वसलेल्या १०७ टन वजनाच्या हनुमान मंदिराबद्दल जाणून घेऊया. 

>> ज्योत्स्ना गाडगीळ पंचमुखी 

'स्वच्छ भारत अभियान' सुरु झाल्यापासून इंदोर हे शहर आजतागायत सलग ७ वेळा भारतात प्रथम क्रमांकावर आले आहे. तेथील शहरंच नाही तर ग्रामीण भाग, गल्ली, बोळ, बाजारपेठ, ऐतिहासिक वास्तू आणि तीर्थस्थान याबाबतीत कमालीची स्वच्छता बघायला मिळते. त्यामुळेच की काय तिथले स्ट्रीट फूड खातानाही मनात किंतु परंतु येत नाही. हे केवळ शासनाचे यश नाही तर नागरिकांच्या प्रयत्नातून साकार झालेले स्वप्न आहे. आणि तसे होण्यामागे पूर्वसंस्कार आहेत पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांचे! सुंदर नगररचना, रोजगार, चोख न्यायव्यवस्था, सुसज्ज बाजारपेठा आणि स्वच्छता यावर अहिल्याबाईंचा कटाक्ष होता. त्यांनी मध्य प्रदेशातच नाही तर आसेतुहिमाचल अनेक तीर्थक्षेत्रांचा, मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अन्नछत्र उभारले, शिष्यवृत्ती सुरू केल्या. तो नेम आजवर सुरु आहे. त्याचाच पडसाद म्हणजे इंदोरच्या पितृ पर्वतावर (Pitru Parvat, Indore) वसलेले हे सुंदर हनुमान मंदिर(Pitareshwar Hanuman Mandir, Indore)!

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे शहराच्या जवळच असूनही या परिसरात कमालीची शांतता आहे. मोकळे वातावरण, स्वच्छ परिसर आणि जवळपास १ लाखाहून अधिक वृक्षांची लागवड, त्यामुळे या परिसरात फेरफटका मारतानाही तना-मनाला तजेला मिळतो. हा पर्वत पितृ पर्वत म्हणून ओळखला जातो, कारण मंदिर निर्मितीच्या वेळेस त्या परिसरात आपल्या पितरांच्या स्मरणार्थ वृक्षांची लागवड करण्याचे जनतेला आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि लोकसहभागातून एक लाखाहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. आजही अनेक पर्यावरण स्नेही मिळून या परिसराचा सांभाळ करत आहेत. तसेच शासनाचाही त्याला हातभार आहे. 

आता हनुमान मंदिराबद्दल जाणून घेऊ. पितरेश्वर हनुमान मंदिर (Pitareshwar Hanuman Mandir, Indore) असे नामकरण होण्यामागे त्याचा पूर्वइतिहास म्हणजे तिथे एक प्राचीन शिवमंदिर आहेते म्हणजे  सिद्ध भैरव महादेवाचे! त्याचा जीर्णोद्धार केल्यावर या मंदिराची रचना करण्यात आली. या प्रसन्न वास्तूमध्ये हनुमानाच्या दोन मूर्ती बघायला मिळतात. एक पूजेसाठी आणि दुसरी दर्शनासाठी! अंजनी मातेने कवेत घेतलेल्या हनुमंताची मूर्ती पूजेत ठेवली आहे. (असे म्हणतात, की हनुमंत रात्री आपल्या आईच्या कुशीत येऊन विश्रांती घेतात.) तिथेच द्रोणागिरी हातात घेतलेल्या हनुमंताचेही दर्शन घडते. तर दुसरे हनुमंताचे विशाल रूप आहे. १०८ टन वजनाची मूर्ती ७१ फूट उंच आणि ५४ फूट रुंद आहे. बाजूला भली मोठी गदा आणि हनुमंताचे चिंतन स्वरूप बघायला मिळते. रामभजनात रंगलेली हनुमंताची ही जगातील सर्वात मोठी मूर्ती आहे. ही मूर्ती अष्टधातूची बनवली आहे. ती बनवण्यासाठी १२५ कारागीर ७ वर्षं मेहनत घेत होते. 

असे म्हणतात, की या मंदिरात बोललेला नवस पूर्ण होतो. त्यामुळेही तिथे भक्तांची रीघ पाहायला मिळत असावी. 

समर्थ रामदास स्वामींनी हनुमान स्तोत्रात वर्णन केल्याप्रमाणे 'वाढता वाढता वाढे, भेदिले शून्य मंडळा' असे विशाल स्वरूप बघायचे असेल, तर इंदोरला गेल्यावर पितृपर्वतावर विराजमान झालेल्या पितरेश्वर हनुमान मंदिराचे दर्शन घ्यायलाच हवे. 

टॅग्स :TempleमंदिरforestजंगलTravel Tipsट्रॅव्हल टिप्स