शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

Indian Marriage: जया किशोरी सांगतात, 'मुलींसाठी स्थळ निवडताना लक्षात ठेवा 'ही' गोष्ट!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 14:58 IST

Marriage Rituals: मुलीसाठी मनपसंत जोडीदार निवडताना प्रत्येक वधूपित्याने लक्षात ठेवावी अशी गोष्ट सांगत आहेत व्याख्याता जया किशोरी. 

भारतीय लग्नसंस्था पूर्वीसारखी राहिली नसून त्यात अनेक स्थित्यंतर झाली आहेत. लग्न म्हणजे दोन कुटुंबांचा सोहळा, आप्त नातलग, मित्र मंडळी, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने बांधलेली लग्न गाठ आणि आयुष्यभर एकमेकांचा सांभाळ करण्याचं दिलेलं वचन! मात्र अलीकडे हे चित्र बदलले आहे. करिअर घडवत असताना लग्नाचं  वाढलेलं वय, स्वभावात आलेली अढी आणि अपेक्षांचे डोंगर यामुळे लग्न ठरणं, होणं आणि टिकणं हे आव्हान झाले आहे. 

लग्न का ठरत नाही विचारावं, तर मुलाकडचे मुलींना आणि मुलीकडचे मुलांना दोष देऊन मोकळे होतात. पूर्वी मुलाकडचे होकार, नकार कळवण्यासाठी तंगवून ठेवायचे, आता मुलीकडचे उत्तर देण्यात दिरंगाई करतात. पर्यायी दोघांची वयं वाढतात आणि पालकांचे अपेक्षा भंग होतात. यावर उपाय म्हणून अध्यात्मिक व्याख्याता जया किशोरी यांनी मुलींना आणि पालकांना एक गोष्ट लक्षात ठेवा असे सांगितले आहे. ती पुढीलप्रमाणे- 

मुलीसाठी मनपसंत जोडीदार निवडताना तो अनुरूप आहे की नाही हे लक्षात घ्या. त्याचे रूप, गुण, मिळकत, स्वभाव आपल्या मुलिशी ताडून बघा. त्यात फारकत असेल तर वेळेत नकार कळवण्याचे सौजन्य दाखवा. हीच बाब मुलाकडच्यांनाही लागू होते. 

मात्र जया किशोरी विशेषतः मुलीच्या पालकांना विशेष सल्ला देतात. तो म्हणजे, 'मुलीच्या अपेक्षेप्रमाणे उच्च घरातला मुलगा शोधताना स्वप्नरंजन करू नका! सुखवस्तू कुटुंबात दिलेली मुलगी सुखीच होते असे नाही आणि मध्यमवर्गीय तसेच गरीब घरात दिलेली मुलगी दुःखी असते असेही नाही. दिवस सगळ्यांचेच बदलतात. सीतामाईसाठीदेखील जनक राजाने स्वयंवर ठेवले. शूर, वीर राजे बोलावले. रामाने पण जिंकला. सीतेशी विवाह झाला. आपली जानकी रघुवंशाची महाराणी होणार या विचाराने जनक राजा सुखावला. मात्र सीतेच्या नशिबात कालांतराने वनवास आला. तिने राजसुखाचा त्याग केला आणि वनवासात राहूनही आनंदाने स्वर्ग फुलवला. याचाच अर्थ, सुख निर्माण करण्याची क्षमता मुलींमध्ये निर्माण करा. त्यांना खंबीर बनवा. आहे त्या परिस्थितीशी लढा द्यायला शिकवा. तरच त्या सुखाने संसार करू शकतील. 

त्यापेक्षा मुलाचे, घरच्यांचे स्वभाव बघा, आर्थिक स्थितीचा आढावा घ्या आणि जोडी अनुरूप दिसत असल्यास होकार देऊन मोकळे व्हा. अति अपेक्षा ठेवल्या तर अपेक्षा भंग होईलच शिवाय लग्नाचे वय वाढून लग्न करणारच नाही निर्णयापर्यंत मजल जाऊ शकेल हे नक्की! त्यापेक्षा वधू आणि वर मंडळींनी वेळीच सावध व्हा आणि लग्न हा व्यवहार न ठरवता आपुलकीचे नाते जोडा.' 

टॅग्स :marriageलग्न