शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पद्म पुराणातदेखील सांगितले आहे मोक्षदा एकादशीचे महत्त्व; जाणून घ्या या एकादशीची महती आणि माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 13:29 IST

१४ डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी आहे. एकादशी ही विष्णूंची प्रिय तिथी! तसेच मार्गशीर्ष मास केशव मास म्हणून ओळखला जातो. म्हणून या एकादशीला मोक्ष प्राप्तीसाठी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते. 

हिंदू धर्मात एकादशीला अतिशय महत्त्व असते. वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात. अधिक मास आल्यास त्यात आणखी दोन एकादशींची भर पडून त्या २६ होतात. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात येणारी एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असते. मोक्ष देणारी म्हणून मोक्षदा एकादशी असे तिचे नाव आहे, म्हणून काही ठिकाणी ती वैकुंठ एकादशीही म्हटली जाते. नरदेहातून सुटका झाल्यावर आत्म्याला मोक्ष मिळावा, म्हणून यादिवशी भगवान विष्णू यांची आराधना केली जाते. 

मोक्षदा एकादशीचे महत्त्व :पद्म पुराणात भगवान श्रीकृष्ण यांनी युधिष्ठिराला सांगितले, मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान महाविष्णूंना तुळशी मंजिरी, धूप, दीप अर्पण करून मनोभावे पूजा केल्यास सर्व पातकांचा नाश होतो. पातक नष्ट झाल्याने आपसुकच मोक्षाचे द्वार खुले होते. तसेच मोक्षदा एकादशीचे व्रत मनापासून केल्यास मृत्यूपश्चात केवळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या पितरांच्या आत्म्याला सद्गती मिळते. ही एकादशी कामधेनूप्रमाणे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते. मोक्षदा एकादशीची व्रत कथा ऐकणाऱ्या आणि वाचणाऱ्याला पुण्य प्राप्त होते. 

मोक्षदा एकादशीची व्रतकथा :गोकुळ नामक नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात अनेक विद्वान होते. तो आपल्या प्रजेचे मुलांप्रमाणे संगोपन करत असे. एके रात्री राजाला स्वप्न पडले, की त्याचे वडील नरकात गेले आहेत.

दुसरे दिवशी उठल्यापासून राजा अस्वस्थ झाला. राज्यातील मान्यवर ऋषींसमोर त्याने आपले दु:ख कथन केले. आपल्या वडिलांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत, ही कल्पनाही आपणाला सहन होत नाही, असे त्याने सांगितले. ऋषींनी त्याला पर्वत ऋषींकडे शंका निरसन करण्यासाठी पाठवले. राजाने पर्वत ऋषींची भेट घेतली. त्यांनी ध्यानस्थ होऊन राजाच्या वडिलांचे प्रारब्ध पाहिले आणि राजाला भाकित केले. `राजा, तू पाहिलेले स्वप्न खरे आहे. तुझ्या वडिलांकडून अजाणतेपणी झालेल्या कुकर्माचे फलित म्हणून त्यांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत.' 

राजाने विचारले, `गुरुदेव, त्यांच्या यातना कमी व्हाव्यात म्हणून काहीच उपाय नाही का?' तेव्हा गुरुंनी राजाला मोक्षदा एकादशीचे व्रत करायला सांगितले. गुरुंच्या सांगण्याप्रमाणे राजाने ते व्रत केले आणि त्याच्या वडिलांची कुकर्मातून मुक्तता झाली. त्यांनी स्वप्नात येऊन पुत्राचे आभार मानले. तेव्हापासून राजा दरवेळी हे व्रत श्रद्धेने करू लागला. अशी ही व्रत कथा मोक्षदा एकादशीचे महत्त्व अधोरेखित करत़े 

मोक्षदा एकादशीची विविध नावे :मोक्षदा एकादशी विविध नावांनी ओळखली जाते. वैकुंठ एकादशी, मुक्कोटी एकादशी, मोक्षदा एकादशी, धनुर्मास एकादशी अशी तिची नावे आहेत. नावे अनेक असली, तरी एकादशीचे महत्त्व सारखेच आहे. पापनाश होऊन मोक्ष मिळण्यासाठी मोक्षदा एकादशीचा उपास जरूर करावा आणि भगवान महाविष्णूंची पूजा-अर्चा करावी. तसेच या दिवशी गीता जयंती असल्याने गीता पठणास सुरुवात करावी.