शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मृगजळामागे धावण्यात आयुष्य घालवले, तर केवळ पश्चात्ताप वाट्याला येईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 14:16 IST

मृगजळ आभासी असते. हे माहीत असतानाही त्यामागे धावणे, हे स्वत:चीच फसवणूक करण्यासारखे आहे.

जीवघेण्या उन्हाने तो वाळवंटी परिसर अतिशय उजाड, रखरखीत, दयामाया नसलेल्या निष्ठुर काळासारखा वाटत होता. त्या गरीब बिचाऱ्या  हरणाची अवस्था अत्यंत शोकाकुल होती. तृष्णेमुळे विचारबुद्धी जणू नष्टच झाली होती. 

पाण्याच्या शोधार्थ भटकत असताना, त्याला एके ठिकाणी पाण्याचा साठा दिसला. ते आनंदातिशयाने त्याच्या रोखाने धावू लागले आणि आता ते पाणी आपणास प्राप्त होणार असे त्याला वाटले, पण तिथे होता केवळ भास! 

कधीही तहान न भागवणाऱ्या मृगजळामागे ते धावले होते. इतक्यात त्या हरणाला वाटले की त्या वृक्षाजवळ पाणी आहे. बिचारे, त्या विचाराने पुलकीत होऊन त्या जवळ गेले. परंतु पदरी पुन्हा निराशाच आली. मुळात तो वृक्ष नव्हताच. तर कोणीतरी टाकलेल्या फांद्या असलेला लाकडी ओंडका होता. जलाचे भास त्या अज्ञानी मृगाला होत राहिले आणि त्यांना बळी पडून तो वेडापिसा धावत राहिला. पाण्यासाठी व्यावूâळ झालेले त्याचे शरीर जणू मृत्यूपंथाला लागले.

एवढ्यात एक उंट त्याच्याजवळ आला व त्याला म्हणाला, 

'रे मृगा, मगापासून मी पाहतो आहे, किती मैल तू या परिसरात धावत आहेस. त्याऐवजी योग्य विचाराने, रस्त्याने तू जर या वाळवंटी परिसरातून बाहेर पडला असतास तर एवढ्याच धावपळीत पलीकडेच एक कधीही न आटणारा लहानसा झरा आहे तो तुला नक्की दिसला असता. अरे केवळ आभासामुळे तुझी भयंकर दिशाभूल झाली. 

या हरणाप्रमाणे आपणही आयुष्यभर मृगजळाप्रमाणे धावत राहतो आणि हाती काहीच लागले नाही म्हणून उद्विग्न होतो. मृगजळ आभासी असते. हे माहीत असतानाही त्यामागे धावणे, हे स्वत:चीच फसवणूक करण्यासारखे आहे. अशी दिशाभूल होऊ नये, म्हणून वेळोवेळी त्या त्या क्षेत्रातील उंटासारख्या अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन घ्यायला हवे, म्हणजे पश्चात्तापाची वेळ येत नाही. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन करतात-

असे सार साचार ते चारिलेसे,इही लोचनी पाहता दृश्य भासे,निराभास निर्गुण ते आकळेना,अहंतागुणे कल्पिताही कळेना।

चित्त, मन, बुद्धी, अहंकार, इंद्रिय हे भ्रामक जग मृगजळाप्रमाणे आहे. त्या वर्तुळात आपण फिरत राहतो आणि निराश होतो. परंतु खरे सुख, आनंद, समाधान ज्या परमतत्त्वात आहे, त्याला आपण ओळखत नाही. कारण त्याच्याकडे या चर्मचक्षूंनी नाही, तर ज्ञानचक्षूंनी पाहता येते.