शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

संत नामदेव पुण्यतिथी: मृत्यूचे भय वाटत असेल तर संत नामदेवांनी मृत्यूबद्दल केलेले भाष्य वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 12:36 IST

मृत्यूच्या भीतीने मनुष्याची गाळण उडते, ती भीती संत नामदेवांच्या शब्दांनी पळून जाईल अशी आशा वाटते. 

संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी ते एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. १५ जुलै रोजी त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी आपल्या हयातील भरपूर साहित्य निर्मिती केली व आपल्या आचरणातून समाजापुढे अध्यात्माचा आदर्श ठेवला. आजच्या तिथीला त्यांनी देह ठेवला तरी मोक्षपदाला ते जिवंतपणीच पोहोचले होते. 

असे म्हणतात, की मृत्यनंतरही इच्छा शिल्लक असतील, तर पुन्हा जन्म आणि जिवंत असताना इच्छा संपल्या तर मोक्ष मिळतो. मात्र आपल्या इच्छांची यादी एवढी मोठी असते की एका जन्मात काही ती पूर्ण होत नाही. परंतु संतांनी त्या इच्छांना, वासनांना मुरड घातली, म्हणूनच ते जन्म मरणाचा फेरा संपवून मोक्ष पदाला पोहोचू शकले. हे ज्ञान त्यांना कसे अवगत झाले, याबद्दल खुलासा करताना संत नामदेव एके ठिकाणी लिहितात-

मनुष्यशरीराची घटक असणारी पंचतत्त्वे विघटित होणे म्हणजेच शरीर मृत होणे. नामदेव म्हणतात की आपले सद्गुरु विसोबा खेचर यांच्याकडून देहात असतानाच मरण्याची विद्या शिकून त्यांनी मृत्यूवर विजय मिळवला आहे. त्याचेच वर्णन ते पुढील अभंगात करतात-

आपप तेज वायू पृथिवी गगन,मेले ते कवण पंचामध्ये।।आम्हा मरण नाही मरशील काई,आत्मवस्तु पाही श्रीगुरुमुखे।।जिताची मरण आलेसे हाता, मरण बोलता लाज नये।।खेचर विसा म्हणे आम्हा मरण नाही,कैसे मरण पाही आले नाम्या।।

देहाची पाच तत्त्वे जेव्हा मूळ पाच तत्त्वात अर्थात पंचमहाभूतात परत जाऊन मिळतात तेव्हा माणसाला मरण येते. तथापि मी मृत्यूपलिकडे गेलो आहे. मला कसे काय मरण येईल? गुरुदत्त नामाने मला आपले आत्मस्वरूप उमजले आहे. मी तर जिवंतपणेच मरायला शिकलो आहे. त्यामुळे आता मला मरणाची भीती वाटत नाही. आम्ही आमचे मरण स्वत:च पाहिले आहे. तेव्हा आमच्यासाठी मरण उरलेच नाही.

अशी स्थिती प्राप्त होणे सर्वसामान्य माणसासाठी कठीण असले तरी अशक्य नाही. यासाठी संत उपाय सुचवतात, 

विषय उपेक्षूनि, अनुभव लक्षूनि,आत्मपदी वस रे, मानस नारायण भज रे।।

विषयातून आपली सुटका होणार नसली, तरी अलिप्त नक्कीच होता येईल. त्यासाठी मन भगवंत नामात गुंतवायला हवे. एकदा प्रभुपदाची गोडी लागली, की इतर विषय त्यासमोर गौण वाटू लागतील व मृत्यूचे भयही राहणार नाही.