शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
7
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
8
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
9
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
10
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
11
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
12
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
13
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
14
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
15
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
16
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
17
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
18
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
19
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
20
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

घरावर एकाच वेळी अनेक कावळे काव काव करू लागले, तर हे शुभ संकेत नाहीत; अधिक माहिती वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 09:58 IST

ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांनी आपल्या निरीक्षणातून कावळ्याच्या ओरडण्याचा संबंध शुभ-अशुभ संकेतांशी जोडला आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

आपल्याला कावळ्याची काव काव कटकट वाटते, पण संत ज्ञानेश्वर त्यातूनही शुभ संकेत शोधत म्हणतात, 'पैल तोगे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे' यावरून ज्योतिष शास्त्र सुद्धा कावळ्याच्या बोलण्याचा संबंध शुभ-अशुभाशी कसा जोडला गेला ते सांगत आहे. 

शुभ-अशुभ चिन्हांचा आपल्या जीवनावर सकारात्मक-नकारात्मक प्रभाव पडत असतो. आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आणि घटना घडत असतात ज्या चांगल्या आणि वाईट संकेत दर्शवतात. हे शकुन शतकानुशतके प्रचलित आहेत. आज आपण अशा पक्ष्याशी संबंधित शकुन आणि अपशकुनाबद्दल जाणून घेणार आहोत, जो सर्वत्र आढळतो. हा पक्षी आहे कावळा. कावळ्याशी संबंधित असलेल्या चांगल्या आणि वाईट लक्षणांबद्दल जाणून घेऊ. 

कावळ्याशी संबंधित ही लक्षणे धनवृद्धीची चिन्हे दर्शवतात 

>> जर कावळा चोचीने माती खरडताना दिसला तर समजा तुम्हाला कुठूनतरी खूप पैसा मिळणार आहे. हे चिन्ह खूप शुभ मानले जाते.

>> त्याचबरोबर सकाळी घराच्या छतावर किंवा घरासमोर कावळ्याची दीर्घकाळ काव काव शुभ मानली जाते. हे घडणे एखाद्या पाहुण्यांच्या आगमनाचे लक्षण आहे, तसेच हा कार्यक्रम मान-सन्मान आणि पैसा मिळण्याचेही लक्षण आहे.

>> तुम्ही काम करत असताना एखादा कावळा काव काव करून लक्ष वेधून घेत असला तर ते समस्येतून मुक्त होण्याचे लक्षण आहे.

>> आपल्या नेहमीच्या वाटेवर कावळे पाणी पिताना दिसले तर ते धनलाभाचे स्पष्ट लक्षण आहे.

या शुभ लक्षणांबरोबर काही अशुभ संकेतही मिळतात, ते पुढीलप्रमाणे - 

>> जर एखाद्या स्त्रीच्या डोक्यावर कावळा बसला तर ते तिच्या कुटुंबावर संकट दर्शवते. 

>> बाहेर जाताना एखाद्या रुक्ष झाडावर गिधाड बसलेले दिसले तर तेही अशुभ लक्षण आहे. तिथून मार्ग बदला. 

>> घराच्या छतावर गरुड बसलेले दिसणे हे देखील संकटाचे लक्षण आहे.

>> जर एकाच वेळी भरपूर कावळे कोकलत असतील तर कुटुंब प्रमुखाची तब्येत बिघडू शकते.