शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पंचांग कसे पाहावे? पंचांगातून कोणकोणती माहिती मिळते, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 15:28 IST

पंचांग वाचनामुळे तिथी, वार, नक्षत्र, मुहूर्त यांची दैनंदिन माहिती मिळत राहते, म्हणून ही सवय लावून घ्यावी.

घरोघरी दिनदर्शिका आल्यामुळे पूर्वीसारखे पंचांग वाचन होत नाही. तरीदेखील दिनदर्शिकेत पंचांगाइतकी सविस्तर माहिती मिळत नाही. यासाठी पंचांग वाचन करावे. परंतु अनेकांना पंचांग असूनही कसे वाचावे यासंदर्भात पुरेशी माहिती नसते. यासाठीच पुढील माहिती. 

पंच +अंग  (पाच अंगे) म्हणजे पंचांग. तिथी, वार, नक्षत्र, योग करणे ही पंचांगातील पाच अंगे आहेत. प्रत्येक दिवसाला सूर्योदयापासून या पाच अंगांचे अस्तित्त्व किती काळ (म्हणजे किती तास व किती मिनिटे) आहे, याची माहिती पंचांगात ३६५ दिवसांची दिलेली असते. अशा रीतीने १२ महिन्यांचे पंचांग लिहिलेले असते. प्रत्येक महिन्यात दोन पक्ष (शुद्ध आणि वद्य) असतात. पंचांगाच्या एकेक पृष्ठावर एकेका पक्षाचे (१५-१५ दिवसांचे) पंचांग छापलेले असते.

आपण पंचांग घेऊन कोणत्याही महिन्याचे पान उघडले म्हणजे त्यावर उभ्या आडव्या रेघांची कित्येक घरे (कोष्टकासारखी) पाडलेली असतात व त्या घरात अक्षरे व आकडे भरलेले असतात. एका पक्षासाठी एक पान असते. या पानांवर शीर्षभागी प्रथम शकाचे नाव, नंतर संवत्सराचे नाव, नंतर महिन्याचे व पुढे पक्षाचे नाव असते. त्याखाली क्रमाने १५ तिथींचे पंचांग असते. 

(कोष्टकात पहिला आकडा तिथीचा असतो) १ म्हणजे प्रतिपदा, २ म्हणजे द्वितीया, १५ म्हणजे पौर्णिमा. वद्य पक्षात शेवटी ३० आकडा अमावस्येचा असतो. या तिथीच्या आकड्यामुळे पुढे वाराचे आद्याक्षर असते. सो-सोमवार, मं-मंगळवार इ. त्या वारांच्या अद्याक्षरापुढे तास व मिनिटे यांचे आकडे असतात. ओळीने त्यापुढे नक्षत्राचे अद्याक्षर त्यापुढील आकडे म्हणजे ते नक्षत्र त्या तिथीला किती तास व मिनिटे आहे ते दाखवतात. त्यानंतर योगाचे अद्याक्षर व आकडे, त्यापुढे करणाचे अद्याक्षर व आकडे असतात.

इंग्रजी तारखेचा जाड आकडा असतो. त्यापुढे र. उ. म्हणजे रवि उदय, र. अ म्हणजे रवि अस्त किती वाजता हे दिलेले असते. शेवटच्या रकान्यात चंद्र त्या दिवशी कोणत्या राशीत आहे, त्या राशीचे नाव लिहिलेले असते. त्यानंतर पुढचे प्रत्येक तिथीचे, दिवसाचे दिनविशेष लिहिलेले असतात. उदा. ग्रह बदलून कोणत्या राशीत गेले, त्या ग्रहाचे उदयास्त, सत्पुरुषांच्या पुण्यतिथी, सण, जयंती, घबाड, अमृतसिद्धी योग इ. माहिती दिलेली असते.

याशिवाय पंचांगात वर्षातील विवाह, उपनयन यांचे मुहूर्त, ग्रहणांची माहिती इ. दिलेले असते. बारा महिन्यांच्या पंचांगानंतर आडनावांची गोत्रे दिलेली असतात. काही पंचांगातून बारा राशीची महिनेवार, भविष्येही दिलेली असतात. यासाठीच दररोज सकाळी स्नान झाल्यावर पंचांग पाहण्याची सवय लावून घ्यावी.