शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वेद पुराणातील अध्यात्माबरोबर रोजच्या जगण्यातले अध्यात्म कसे समजून घ्यायचे? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 14:57 IST

अध्यात्म हा शब्द केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नाही तर त्यामागे असलेल्या व्यापक तरी साधा सरळ दृष्टिकोन जाणून घ्या!

>> शंतनू ठाकरे 

अध्यात्म ही कोणतीही धार्मिक गोष्ट नाही. ध्यात्म म्हणजे, वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे. अध्यात्म म्हणजे, कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणे. अध्यात्म म्हणजे, आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये, असं वागणं.      अध्यात्म म्हणजे, वेद वाचण्याबरोबर वेदना वाचता येणे. अध्यात्म म्हणजे, आपलं काम प्रामाणिकपणे करणं. अध्यात्म म्हणजे, आपलं कौटुंबीक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं. अध्यात्म म्हणजे, मुक्या प्राण्यांवर, पशु-पक्ष्यांवर प्रेम करणे. अध्यात्म म्हणजे, निरपेक्ष सत्कर्म करत रहाणे. अध्यात्म म्हणजे, नि:स्वार्थी सेवाभाव जोपासणे. अध्यात्म म्हणजे, सदैव कृतार्थ भाव अंगी बाळगणे. अध्यात्म म्हणजे, विना अपेक्षा कौतुक करणे. अध्यात्म म्हणजे, आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सद्भावाने रहाणे. अध्यात्म म्हणजे, ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे. अध्यात्म म्हणजे, आपण या समाजाचं काही देणं लागतो, आणि ते आपण दिलेच पाहिजे, अशी मानसिकता मनाशी सतत बाळगणे. अध्यात्म म्हणजे, गरजुवंतांना यथा शक्ती, आर्थिक किंवा शाब्दिक मदत करणे. अध्यात्म म्हणजे, आपल्याबरोबर इतरांची देखील प्रगती होवो, हा भाव अंगी असणे.      अध्यात्म म्हणजे,साधं .........सोपं .........सरळ ........आणिनिर्मळ .......असणं - दिसणं आणि वागणं.     

अध्यात्म म्हणजे, फक्त पूजा - पाठ, प्रार्थना आणि भक्ती नव्हे तर.. अध्यात्म म्हणजे, केलेली पूजा - पाठ, प्रार्थना आणि भक्ती, या प्रमाणेच आपली प्रत्येक कृती असणे. अध्यात्म म्हणजे, राष्ट्रपुरुष आणि  राष्ट्रीय संताचं सदैव स्मरण असणे. अध्यात्म म्हणजे सकाळ पासून रात्री झोपे पर्यंत नित्य कर्म, कर्तव्य पारदर्शक पद्धतीने पार पाडणे. 

थोडक्यात, सकारात्मक जगायला शिकवते ते अध्यात्म. अध्यात्म या शब्दाची फोड "अधि" म्हणजे शरीर व त्यात वास असणाऱ्याचे "अयन करणे" म्हणजे शिकणे, ते अध्यात्म. मनासारखे कोणालाच जगता येत नसते. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र, म्हणजे अध्यात्म. 

"अगदी थोडक्यात सांगावयाचे म्हणजे, हे अध्यात्म म्हणजे, जीवन जगण्याची कला... आत्म उन्नती करणारी, व्यक्तिमत्व विकास करणारी आणि भगवत चिंतन करणारी, याहीपेक्षा सर्व भगवंताला अर्पण कसं करावं, हे सहजतेने शिकवणारी कला !" 

॥ श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तु ॥