शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

बाप्पाला कोणत्या प्रकारे केलेली पंचारती आवडते? वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 07:20 IST

आपणास अहंकार नाही, असे आपले आपल्याला वाटत राहणे हासुद्धा एक प्रकारचा अहंकारच आहे.

'मी'पणा जिथे संपतो, तिथे अद्वैताचा साक्षात्कार होऊ लागतो.  अद्वैत म्हणजे काय? तर जिथे भक्त आणि भगवंत हे वेगळे उरतच नाहीत. ही अवस्था प्राप्त करण्यासाठी सर्वप्रथम अहंकाराचा त्याग करावा लागतो. आपल्याला अहंकार नाही, हे सतत म्हणणे सुद्धा अहंकाराचेच लक्षण आहे. तो कसा संपवावा, याबाबत मध्वनाथस्वामी पंचारतीचा खूप छान उपचार सांगत आहेत. ही नेहमीची पंचारती नसून या पंचारती वेगळी आहे. 

हेही वाचा : उजव्या सोंडेचा गणपती घरात ठेवावा की नाही? शास्त्र काय सांगते?

श्रीगजानन हे विद्येचे दैवत आहे. त्यामुळे विद्येचे उपासक, साहित्यिक, लेखक अशा अनेकांनी गजाननाची स्तुतिस्त्रोत्रे मनापासून गायली आहेत. गणपतीच्या आरत्या तर अगणित आहेत. गणपतीचे गुणवर्णन करताना त्याच्या भक्तांना शब्दांची उणीव कधीच भासत नाही. कल्पनांचीही रेलचेल गणेशस्तवनात आढळते. मध्वनाथस्वामींच्या पदातून ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर पंचारतीची उकल करून सांगत आहेत.

आवडी गंगाजळे देवा न्हाणीले,भक्तीचे भूषण प्रेमसुगंध अर्पीले,अहं हा धूप जाळू गणपतीपुढे, माझ्या मोरयापुढे।।जंव जव धूप जळे तंव तंव देवा आवडे,पंचप्राणसहित धूपदीप जो केला,नैवेद्याकारणे, उत्तम प्रकार अर्पीला,मध्वनाथस्वामी पंचोपचारि पूजीला,मग एकार्तीसी प्रेमे प्रारंभ केला।।

आवड हेच गंगाजळ त्याने देवाला स्नान घातले आहे. आंघोळ घातली आहे. त्याच्या अंगावर भावभक्तीचे अलंकार चढविले आहेत. प्रेमाचा सुगंध त्याला अर्पण केला. माझ्या अहंकाराचा धूप मी गणपतीपुढे जाळला. म्हणजे मी निरंहकारी झालो. मला कशाचाही अहंकार उरला नाही आणि जेव्हा जेव्हा मी अहंकाराचा धूप जाणून निरहंकारी होतो, तेव्हा तेव्हा मी देवाला अतिशय प्रिय असतो. अहंकार हा एकदा दूर सारला की कायमचा दूर होत नाही. तो पुन: पुन्हा एखाद्या चेंगट, लाचारासारखा येऊन चिकटतोच. अगदीच काही नाही तरी मनात निर्माण होतो. तो अहंकारसुद्धा त्याज्यच. 

आपणास अहंकार नाही, असे आपले आपल्याला वाटत राहणे हासुद्धा एक प्रकारचा अहंकारच आहे. आपण देवासमोर नतमस्तक झालो, तर त्यामधून येणारी नम्रता ही सर्वगामी, सर्वव्यापी असली पाहिजे. त्या नम्रतेचाही अहंकार मनाला जाणवणे उपयोगाचे नाही. म्हणून हा पुन्हा पुन्हा येऊन चिकटणारा आणि माझ्या मनाला ग्राहणारा अहंकार मी जेव्हा जेव्हा दूर करतो तेव्हा तेव्हा मी देवाच्या अधिक प्रीतीला पात्र होतो.  माझे पंचप्राण  हीच जणू देवाची पंचारती आहे. देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मी उत्तमोत्तम पदार्थ आणले आहेत. अशी देवाची पंचोपचाराने पूजा करून नंतर पूजेच्या क्रमाक्रमाने मध्वनाथस्वामींनी बाप्पासमोर पंचारती ओवाळली आहे. आपणही अशी पंचारती देवाला ओवाळली, तर त्याला ती निश्चितच आवडेल. 

हेही वाचा : 'संकटी पावावे, निर्वाणि रक्षावे' हीच प्रार्थना!