शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Holi 2023: भक्त प्रल्हादाला हानी पोहोचवणाऱ्या होलिकेला आपण माता म्हणतो आणि तिची पूजादेखील का करतो? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 07:00 IST

Holi 2023:होलिका दहन, होलिका पूजन आपण दरवर्षी करतो, त्यामागील कार्यकारण भावही जाणून घेतला पाहिजे. 

६ मार्च २०२३ रोजी होळीचा सण आहे. दरवर्षी होळीच्या मुहूर्तावर आपण होलिकादहन करतो. त्यामागे असलेली पौराणिक कथासुद्धा आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु, मनात प्रश्न निर्माण होतो, की होलिकेने प्रल्हादासारख्या भक्ताला जाळण्याचा प्रयत्न केला, त्या होलिकेचे हजारो वर्षांपासून पूजा करण्याची प्रथा का आहे? आपण अजाणतेपणी चुकीच्या गोष्टीचे तर समर्थन करत नाहीये ना? होळीच्या दिवशी होलिका राक्षसीणीची आठवण का? याचे सुंदर उत्तर दिले आहे, परमपुज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांनी...

होलिकेला वरदान होते, सद्वृत्तीच्या माणसांना तिने त्रास दिला नाही, तर अग्नी तिला जाळणार नाही. परंतु, हिरण्यकश्यपूच्या सांगण्यावरून तिने भक्त प्रल्हादाला जाळण्यासाठी मांडीवर घेतले. त्यादिवशी नगरातील सर्व लोकांनी घराघरात अग्नी प्रज्वलित केला आणि त्याने प्रल्हादाला जाळू नये अशी प्रार्थना केली. 

प्रल्हादाने लोकहृदयाला जिंकले होते. अग्नीने लोकांची प्रार्थना ऐकली. होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद अग्निदिव्यातून पार होत नरश्रेष्ठ झाला. प्रल्हादाला वाचवण्याच्या हेतूने चालू झालेली घराघरातील अग्निपूजा कालक्रमामध्ये सामुदायिक पूजेत रुपांतरित झाली आणि त्यामुळेच आज चौकाचौकात होत असलेली होलिका पूजा रूढ झाली. म्हणजेच ही पूजा होलिका नावाच्या राक्षसिणीची नसून सामुदायिक अग्निपूजेमुळे प्रल्हादाला जे बळ, तेज मिळाले, ते होलिकेच्या निमित्ताने मिळाले. त्या दृष्टीने पाहता, होलिका पूजन हे असूर वृत्तीच्या नाशासाठी तसेच सद्वृत्तीच्या रक्षणासाठी लोकांच्या हृदयात असलेल्या शुभ भावनांचे प्रतीक आहे. म्हणून आपण तिला माता म्हणतो आणि आई जशी आपले सगळे अपराध पोटात घेते, तशी होलिकामाता आपले अपराध पोटात घेऊन जाळून टाकते. म्हणून आनंदाने होलिकादहन केले जाते. 

होलिका दहनामुळे खुश झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला. आनंदाच्या वातावरणाने रंगीत बनलेले लोक एकमेकांवर रंग, गुलाल उडवू लागली. शिवाय काहींनी धूळ उडायला सुरुवात केली आणि त्यामुळे धुळवड निर्माण झाली. आकाशातील रंग आणि धरतीवरील धूळ यांचे या उत्सवात मीलन झाले आहे. लहान मोठा भेद विसरून, महालात आणि झोपडीत राहणारे लोक एकत्र येऊन नाचू लागले. यात प्रल्हादासारख्या महापुरुषाचे कर्तृत्त्व दिसते.

होळीमध्ये केवळ निकामी वस्तु किंवा लाकडे जाळली पाहिजेत असे नाही, तर आपल्या जीवनात असलेले, आपणास त्रास देणारे खोटे विचार, मनाचा मळ, विचारांच कचरा जाळला पाहिजे. संघनिष्ठेला शिथिल बनवणारे खोटे तर्ककुतर्क या होळीत दहन केले पाहिजेत. त्याबरोबरच उत्सवाला विकृतीचे गालबोट लागणार नाही, हे लक्षात घेऊन स्त्रिवर्गाशी आदरभावनेने होळी खेळली पाहिजे. 

टॅग्स :Holiहोळी 2022