शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Holi 2022: होळीच्या दिवशी भांग का प्यायली जाते?, जाणून घ्या धार्मिक महत्त्व...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 17:16 IST

होळी सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळीचा सण १७ मार्च आणि धुलिवंदन १८ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. होळीचा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतिक मानला जातो.

होळी सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळीचा सण १७ मार्च आणि धुलिवंदन १८ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. होळीचा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतिक मानला जातो. दरवर्षी या दिवशी मोठ्या संख्येने लोक जमतात, रंग खेळतात, नाचतात, स्वादिष्ट पदार्थ खातात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. दुसरीकडे, होळीचा सण भांगेशिवाय अपूर्ण मानला जातो. होळी सणात भांग सुद्धा प्यायली जाते. या दिवशी लोक वेगवेगळ्या प्रकारे भांगेचं सेवन करतात. यामध्ये भांग लस्सी, भांग पकोडे, भांग थंडाई आणि भांग गुजिया यांचा समावेश असतो. 

भांगेचं धार्मिक महत्वसमुद्रमंथनाच्या वेळी बाहेर पडलेलं विष भगवान शंकरानं आपल्या कंठातून खाली उतरू दिलं नाही. हे विष खूप गरम होतं. त्यामुळे शिवाला उष्ण वाटू लागलं. शिव कैलास पर्वतावर गेले. विषाची उष्णता कमी करण्यासाठी भगवान शंकरानं भांगाचं सेवन केलं. भांग हे थंडगार मानलं जातं. तेव्हापासून भगवान शिवाला भांग खूप आवडते, असं मानलं जातं. भगवान शंकराच्या पूजेदरम्यानही भांग वापरतात. भांगेशिवाय शिवाची पूजा अपूर्ण आहे, असं मानलं जातं. शिवपूजेत भांग अर्पण केल्यानं भगवान शिव प्रसन्न होतात, असं सांगितलं जातं. भांग आणि बेलाची पानेही अर्पण केली जातात.

होळीच्या दिवशी भांग का प्यायली जाते?धार्मिक मान्यतेनुसार होळीच्या दिवशी भगवान शिव आणि विष्णू मैत्रीचे प्रतीक म्हणून भांगेचं सेवन करतात. वास्तविक असं मानलं जातं की भक्त प्रल्हादला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिरण्यकशिपूला मारण्यासाठी भगवान विष्णूने नरसिंहाचे रूप घेतले होते. पण हिरण्यकशिपूचा वध केल्यावर नरसिंहाचा अवतार संतापला होता आणि त्याला शांत करण्यासाठी भगवान शिवाने शरभाचा अवतार घेतला होता. होळीच्या दिवशी भांग पिण्याचं हेही एक कारण असल्याचं मानलं जातं. त्याचा प्रसाद म्हणून सेवन केला जातो. याशिवाय इतरही अनेक कथा लोकप्रिय आहेत.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

टॅग्स :Holiहोळीspiritualअध्यात्मिक