शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

आनंद तरंग: जीवनात होणारे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 02:51 IST

सतत परिवर्तित होणाºया ‘नाम’चेही आणि मनात येणाºया व सतत परिवर्तित होणाऱ्या विचारांचेही ध्यान करतो़ कधी-कधी साधक आपले ध्यान अस्तित्वाच्या भौतिक पक्षावर केंद्रित करतो,

फरेदुन भुजवालाभगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणुकीत ज्यांना चार ‘आर्य सत्य’ म्हटले गेले आहे, त्यात दु:ख सत्य हे प्रथम क्रमांकावर आहे़ कारण जेव्हा तुम्ही दु:खाच्या सूक्ष्म रूपाचा अनुभव करता, त्या दु:खाला तुम्ही इच्छा असली तरी बाहेर काढू शकत नाही़ क्षणासाठीही नाही तेव्हा खरोखर तुमच्यात भय जागते़ तुम्हाला वैराग्य प्राप्त होते़ नाम-रूप हे तुमच्या अस्तित्वाचे आधारभूत तत्त्व आहे़ तुम्ही दु:खाच्या नि:स्सरणासाठी, दु:खमुक्त होण्यासाठी, दु:खातीत होण्यासाठी, निर्वाण प्राप्त करण्यासाठी मार्ग शोधू लागता़ तेव्हा इतकी साधना कराल की निर्वाणिक अवस्थेची प्राप्ती कराल, आंतरिक शांती प्राप्ती कराल़; परंतु दैनंदिन जीवनातही जेव्हा तुम्ही अनित्यतेची स्मृती कायम ठेवाल, त्याप्रती जागरूक राहाल, तर इतका अनुभव करालच की तुमच्यात जे परिवर्तन होत आहे, ते चांगल्यासाठीच होत आहे- शारीरिक रूपाने आणि मानसिक रूपानेही़ विपश्यना करताना केवळ साधक न राहता परिवर्तित होणाऱ्या ‘रूप’चे ध्यान करतो, तर सतत परिवर्तित होणाºया ‘नाम’चेही आणि मनात येणाºया व सतत परिवर्तित होणाºया विचारांचेही ध्यान करतो़ कधी-कधी साधक आपले ध्यान अस्तित्वाच्या भौतिक पक्षावर केंद्रित करतो, म्हणजे रूपाच्या सतत परिवर्तित होणाºया स्वभावावर अर्थात रूपाच्या अनित्य स्वभावावर, तर कधी-कधी विचारात होणाºया म्हणजे मनात होणाºया परिवर्तनावर ध्यान केंद्रित करतो़ म्हणजे नाम व रूपाच्या सतत परिवर्तितहोणाºया स्वभावावर अर्थात नाम व रूपाच्या अनित्य स्वभावावऱ जेव्हा कोणी रूपाच्या अनित्यतेवर ध्यान करतो, तेव्हा त्याचवेळी होणाºया नामाच्या अनित्यतेवरही ध्यान करतो आणि पाहतो हेही बदलत आहे, असे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांचे गुरू विपश्यनाचार्य सयाजी उ बा खिन हे आपल्या प्रवचनातून सांगत असत़ त्यांचे प्रवचन साधकांसाठी नेहमी प्रेरणादायी राहिले.