दैनंदिन जीवनात आपण कामासाठी किंवा प्रवासासाठी घराबाहेर पडतो, तेव्हा रस्ते अपघातांची भीती किंवा प्रवासातील अडथळे मनात घर करून असतात. अशा वेळी एकाग्रता आणि सावधानतेसोबतच जर 'अध्यात्मिक बळ' पाठीशी असेल, तर प्रवास अधिक सुखकर आणि निर्भय होतो. त्यादृष्टीने रामरक्षेतला एक अत्यंत प्रभावी मंत्र तुम्हाला प्रवासात 'सुरक्षा कवच' देऊ शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर माहिती.
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
गाडी, कार किंवा बाईक चालवताना आपले लक्ष रस्त्यावर असणे अत्यंत महत्त्वाचे आहेच, पण त्यासोबतच आपल्या प्रवासाचे रक्षण करण्यासाठी संकटमोचक हनुमंताचे स्मरण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. रामरक्षेत असा एक मंत्र आहे, जो थेट हनुमंताला साद घालतो.
तो प्रभावी मंत्र कोणता?
'श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये'
याचा अर्थ असा की, "मी प्रभू श्रीरामांचा दूत असलेल्या हनुमंताला शरण आलो आहे." जेव्हा आपण या मंत्राचा उच्चार करतो, तेव्हा आपण अफाट शक्तीचे प्रतीक असलेल्या हनुमंताकडे संरक्षणाची मागणी करत असतो.
११ वेळाच का म्हणावा?
हनुमंताला 'एकादश रुद्र' (शिवाचा अकरावा अवतार) मानले जाते. त्यामुळे ११ या अंकाला हनुमंताच्या उपासनेत अनन्यसाधारण महत्त्व आहे.
कधी म्हणावा: गाडी सुरू करण्यापूर्वी किंवा प्रवासादरम्यान तसेच रोज घराबाहेर कामासाठी निघण्यापूर्वी शांत चित्ताने मनातल्या मनात ११ वेळा या मंत्राचा जप करावा.
फायदा: या मंत्रामुळे प्रवासातील भीती नष्ट होते, मनाची एकाग्रता वाढते आणि संकटमोचक हनुमान तुमच्या प्रवासाचे रक्षण करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
राम रक्षा: सुरक्षा कवच
जर तुम्ही दररोज पूर्ण 'राम रक्षा स्तोत्र' म्हणत असाल, तर तुम्हाला केवळ प्रवासातच नाही, तर आयुष्यभर एक 'दिव्य सुरक्षा कवच' लाभते. रामरक्षेच्या प्रत्येक श्लोकात शरीराच्या प्रत्येक भागाचे रक्षण करण्याची प्रार्थना केलेली आहे. त्यामुळे ज्या घरात राम रक्षा म्हटली जाते, तिथे नकारात्मकता टिकत नाही आणि घरातील सदस्यांचे सर्व संकटांपासून रक्षण होते.
सावधानता आणि श्रद्धा यांचा मेळ
अध्यात्मिक शक्ती आपल्याला मानसिक बळ देते, पण त्यासोबतच व्यावहारिक नियमांचे पालन करणेही आपले कर्तव्य आहे.
१. वाहतुकीचे सर्व नियम पाळा.२. हेल्मेट किंवा सीट बेल्टचा वापर आवर्जून करा.३. वेगावर नियंत्रण ठेवा.
या नियमांसोबत जेव्हा तुम्ही 'श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये' चा जप करता, तेव्हा तुमचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि मंगलमय होतो.
Web Summary : Chant the 'Shri Ram Dootam Sharanam Prapadhye' mantra 11 times before traveling for protection. This Hanuman mantra fosters concentration, dispels fear, and ensures a safe journey. Combine faith with traffic rules for ultimate security.
Web Summary : यात्रा से पहले 'श्री राम दूतम शरणं प्रपद्ये' मंत्र का 11 बार जाप करें, सुरक्षा मिलेगी। यह हनुमान मंत्र एकाग्रता बढ़ाता है, डर दूर करता है और सुरक्षित यात्रा सुनिश्चित करता है। सुरक्षा के लिए आस्था के साथ यातायात नियमों का पालन करें।