शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Hanuman Jayanti 2022: मूळ रामायणात वाल्मिकी ऋषींनी वर्णन केलेली हनुमंताची जन्मकथा काय आहे ती वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 12:37 IST

Hanuman Jayanti 2022 : १६ एप्रिल रोजी चैत्र शुद्ध पौर्णिमेला पहाटे सूर्योदयाच्या समयाला रुद्रावतार हनुमंताचा जन्म झाला. ती जन्मकथा वाचूया आणि पुण्याचे भागीदार होऊया!

हनुमान हा अंजनी व केसरी यांचा पुत्र असून त्याची माता अंजना ही मूळची शापित अप्सरा होती. अत्यंत लावण्यवती असलेल्या या अप्सरेचे नाव 'पुंजिकस्थला' होते. एकदा एका तपस्व्याचा अपमान केल्यामुळे त्या ऋषींकडून 'तू वानरी होशील' असा शाप मिळाला. तिने पुष्कळ विनवणी केल्यावर तिला `इच्छेनुसार वारी किंवा मानुषी रूप धारण करण्यास समर्थ होशील' असा उ:शाप मिळाला. त्यामुळे ही अप्सरा कपियोनीत 'कुंजर' या वानराची मुलगी `अंजना' म्हणून जन्माला आली.

अंजनाचा विवाह पुढे वाननराज केसरीशी झाला. तो सुमेरू पर्वतावर विहार करण्यासाठी पत्नी अंजनीसह आला असता तिथे मंदपणे वाहत असलेल्या वायूने तिचे अप्रतिम लावण्य पाहिले आणि तो काममोहित झाला. त्याने केसरीच्या शरीरात प्रवेश केला. यथावकाश एक दिवस पूर्व दिशेला बालरवि उदयाला आला आणि त्यावेळी अंजनेने एका तेजस्वी बालकाला जन्म दिला. मरुताचा पुत्र म्हणून बाळाचे नाव मारुती असे ठेवण्यात आले.

हनुमान कोणत्या दिवशी जन्माला आला याबाबत भिन्न मते आहेत. प्राचीन काळापासून वैदिक, तांत्रिक, पौराणिक, ललित सर्व प्रकारच्या वाङमयात हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत.

'वाल्मिकी रामायण' हे सर्व रामायणात आद्य मानले जाते. यात हनुमानाचा जन्म कोणत्या वेळी झाला याचा उल्लेख नाही, परंतु जन्मकथेचा उल्लेख तीन वेळेस आला आहे. यात हनुमानाने जन्मानंतर फळ समजून सूर्याचा ग्रास घेण्याचा यत्न केला असे वर्णन आहे. यावरून निष्कर्ष निघतो, की हनुमानाच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी अमावस्या असावी. सूर्यग्रहण असल्याने राहूचा उल्लेख आढळतो. 

आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा.

या विवेवचनावरून हनुमानाच्या जन्मासंबंधी मतभिन्नता लक्षात येईल. मंगळवार आणि शनिवार दोन्ही दिवशी त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. याचे कारण असे, की दोन्ही वार त्याचे जन्मदिवस वार मानले जातात. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने त्याच्या जन्मसंदर्भात सांगितले जातात.

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंती