शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेला 'या' तीन गुरूंना वंदन करायला विसरू नका, मिळतील अनेक आशीर्वाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 07:05 IST

Guru Purnima 2025: १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे, त्यादिवशी देवदर्शनाला सगळे जातातच, पण 'या' तीन गुरुंचे विस्मरण होऊ नये म्हणून हा लेखनप्रपंच!

यंदा १० जुलै रोजी गुरुवारी गुरुपौर्णिमेचा(Guru Purnima 2025) अपूर्व योग येत आहे. त्यादिवशी आपले गुरु, तसेच दत्त गुरु, स्वामी समर्थ, गजानन महाराज यांचे दर्शन, पूजन सर्वत्र केले जाते, पण शास्त्राला अभिप्रेत असलेले तीन गुरु विस्मरणात जाऊ नये यासाठी सविस्तर माहिती वाचा. 

गुरुजी पूजा करताना आचमन करत पळीने तळहातावर पाणी घेत प्राशन करायला सांगतात. तेव्हा सुरुवातील `मातृ देवो भव' मग `पितृ देवो भव' नंतर 'आचार्य देवो भव' असे म्हणायला सांगतात. त्यानुसार आई वडिलांनंतर आपल्या संस्कृतीने गुरुंना तिसरे स्थान का दिले आहे ते जाणून घेऊ. या प्रश्नाचे उत्तर एका श्लोकात दडले आहे आणि तो श्लोक बालपणापासून आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे.

गुरुब्र्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम:

गुरु ब्रह्मात पहावे, विष्णूत पहावे, महेश्वरात पहावे किंवा त्रिदेव गुरुंमध्ये पहावेत. कारण माता, पिता यांच्यानंतर देवस्थान कोण घेऊ शकत असतील तर ते म्हणजे गुरु. 

गुरु हे आपल्या आयुष्याला आकार देतात. मार्गदर्शन करतात आणि योग्य अयोग्याची समज देतात. गुरु हे महेश्वराच्या परंपरेतील असल्यामुळे त्यांना विषयांची आसक्ती नसते. ते संसार तापातून मुक्त होऊन परमार्थाकडे आपले मन वळवतात, म्हणून ते श्रेष्ठ असतात. 

प्रत्येक साधकाने त्रिदेवांचे स्थान जिथे एकवटले आहे त्या गुरु दत्तात्रेयांना शरण गेले पाहिजे. गुरु साक्षात परब्रह्म असतात. त्यांना शरण गेल्यावर देवाच्या शोधार्थ अन्य कुठेही धाव घेण्याची गरजच उरणार नाही. 

गुरु कल्पवृक्षाप्रमाणे असतात. त्यांच्याकडून अनुग्रह घेतल्यावर सांसारिक गोष्टींचे आकर्षण राहत नाही. आपल्या जीवनाचा उद्धार करण्याची क्षमता केवळ गुरुंकडे असते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार जीवनाची वाटचाल केली असता कधीही वाईट घडत नाही. आपले सगळे कार्य त्यांच्या पायाशी अर्पण करून `तस्मै श्री गुरवे नम:' असे म्हणत जे जे मी करीन, जे जे माझ्या ठीकाणी असेल ते त्यांना अर्पण करेन, हा सच्चा भाव शिष्याजवळ असेल, तर गुरु त्याचा नक्कीच उद्धार करतात. अशा गुरुंचे आशीर्वाद लाभावेत, म्हणून देवाची पूजा करताना, देव भेटला नाही तरी या तिघांमध्ये देव पहा, असे सांगत आपली संस्कृती म्हणते मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव!

१० जुलै रोजी गुरुपौर्णिमा(Guru Purnima 2025) आहे, त्यानिमित्त आपली पहिली गुरु आई, दुसरे गुरु वडील, तिसरे गुरु शालेय शिक्षक, कला शिक्षक किंवा अन्य विषयातील शिक्षक, तसेच ग्रंथ, अनुभव, तंत्रज्ञान अशा गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका!

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाPuja Vidhiपूजा विधीshree datta guruदत्तगुरुshree swami samarthश्री स्वामी समर्थ