शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Guru Purnima 2023: शिष्यानी गुरुंना 'ही' भेट दिली असता ते खुश होतात; सांगताहेत सद्गुरु!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 16:07 IST

Guru Purnima 2023: गुरुपौर्णिमेची भेट म्हणून गुरु शिष्याने परस्परांना कोणती भेट दिली पाहिजे याबद्दल सद्गुरु यांनी खुलासा केला आहे. 

गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी गुरूंच्या ऋणनिर्देशनार्थ काही भेटवस्तू देण्याचा प्रघात पूर्वापार आहे. आजही शाळेत जाणारी लहान मुलेसुद्धा शिक्षकांसाठी आठवणीने एखादे फुल, भेटपत्र, मिठाई अशा गोष्टी घेऊन जातात. पालक त्यासाठी प्रोत्साहन देतात. कारण जे शिक्षक आपले भवितव्य घडवतात, त्यांच्याप्रती आपल्या पाल्याने कृतज्ञता बाळगावी असा त्यामागचा हेतू असतो. मात्र अशी ऐहिक सुखांशी संबंधित गोष्टी दिल्याने गुरु प्रसन्न होतात का? तसे होणार असतील तर ते शिष्याच्या दृष्टीने योग्य ठरेल का? गुरूंना नेमके काय दिले तर ते खुश होतील याबद्दल सद्गुरुंचे म्हणणे काय आहे ते जाणून घेउ. 

सद्गुरू म्हणतात, 'गुरु शिष्याला घडवत असतात, ती एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही. त्यामागे गुरूंची शिकवण्याची आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची तपश्चर्या असते. ज्याप्रमाणे तुम्ही ऑक्टोबर नोव्हेम्बरमध्ये आंब्याचे झाड पाहिले तर त्याला आंबा लागलेला दिसत नाही, मात्र तेच झाड जानेवारी-फेब्रुवारी मध्ये बघाल तर त्या झाडाला फुलं अर्थात मोहोर आलेला असतो. त्या झाडाची फांदी, मूळ, फुल गोङ लागत नाहीतर, मात्र मार्चपासून मे पर्यंत तेच झाड कैऱ्यांनी लगडलेले दिसते आणि त्या कैऱ्या काहीकाळाने मधुर रस देणारे आंबे बनून तयार होतात. या तयारीच्या खुणा आधी दिसत नाहीत मात्र झाडात दिसत नसलेला गोडवा फळात उतरतो. तीच प्रक्रिया गुरु शिष्यांच्या बाबतीत घडत असते. गुरु आपल्या शिष्याला घडवत असतात. तो यशस्वी होईपर्यंत लागणारा काळ हा गुरूंसाठी तपश्चर्येचा काळ असतो. शिष्य यशस्वी झाल्यावर गुरूंना ते फळ मिळते. मग त्याची परतफेड कशी करावी?

गुरूंच्या ऋणातून कोणताही शिष्य उतराई होऊ शकत नाही आणि त्याने होऊही नये असे सद्गुरू सांगतात.  ते म्हणतात शिष्यांनी गुरूंना काही देण्यापेक्षा त्यांच्याकडून कायम घेत राहावे. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे गुरूंकडून जे घेतलेले आहे ते वापरून फेकून देऊ नये किंवा विसरून जाऊ नये. गुरूंकडून घेतलेले ज्ञान पुढे हस्तान्तरीत करावे मात्र ते वाया जाऊ देऊ नये. गुरूंना शिष्याकडून मिळालेली ही भेटच सर्वात जास्त प्रिय ठरू शकते. म्हणून गुरूंनी कायम देत (ज्ञान) राहावे आणि शिष्यांनी कायम गुरूंकडून ज्ञान घेत राहावे असे सद्गुरू सांगतात. 

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा