शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Guru Purnima 2023: परमेश्वर असूनसुद्धा, गुरु का असायला हवा? हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर वाचा 'हे' उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 17:50 IST

Guru Purnima 2023: गुरुंचे आपल्या आयुष्यातील स्थान काय, महत्त्व काय, त्यांना नेमके शोधायचे कसे आणि कुठे ते जाणून घ्या!

>> मकरंद करंदीकर

बऱ्यापैकी शिक्षण झालेली चार हिंदू माणसे (अन्य धर्मातील माणसे त्यांच्या त्यांच्या धर्माची कधीही अशी टिंगल उडवत नाहीत) एकत्र जमली की अनेकदा एक मुद्दा चर्चेला येतो तो म्हणजे - आपल्या   देवता प्रचंड शक्तिमान आहेत तर मग मनुष्यरूपातील अमुकस्वामी आणि तमुकस्वामी हवेतच कशाला ? वरकरणी हा प्रश्न अगदी बिनतोड आणि बुद्धिनिष्ठ वाटतो. पण अनेकजण खूप शिक्षण घेऊनही आपल्या धार्मिक माहितीबद्दल, परंपरांबद्दल अनभिज्ञ असतात. जर अगदी पाहिल्यापासून आपण धार्मिक शिक्षण अनिवार्य केले तर असे प्रश्न पडणार नाहीत. आपल्या देशातील अन्य धर्मीय, त्यांच्या शाळांमधून त्यांचे धार्मिक शिक्षण देण्याचा हक्क बजावतात ! या देशात हिंदूंना मात्र धार्मिक शिक्षण घेण्यात सर्वधर्मसमभाव आडवा येतो. त्यातूनच आमचे अर्धवट धर्मज्ञानी निर्माण होतात आणि आपल्याच धर्माची टिंगल करतात. पण त्यामुळे धर्मावर निष्ठा असणाऱ्यांचा मात्र गोंधळ उडतो.म्हणूनच आपण गुरु श्रेष्ठत्वाचे कारण समजण्यासाठी खालील मुद्दे समजून घेऊया...

१ ) मुळातच भारतात हजारो वर्षे, मौखिक परंपरेने ज्ञान दिले जात असे. त्या तुलनेने पुस्तके किंवा लिखाण फारच कमी असायचे ! तरी त्यातूनही निर्माण झालेले हजारो ज्ञानग्रंथ, हस्तलिखिते, पोथ्या इत्यादी ज्ञानसाहित्य मुघल, ब्रिटिश, पोर्तुगीज आक्रमकांनी जाळून नष्ट केले. त्यामुळे समाजामधील जी दशग्रंथी व्यक्ती १० / १० ग्रंथ तोंडपाठ करून, जतन करून ते पुढच्या पिढीकडे देत असे , समजावून सांगत असे , शिकवत असे त्या व्यक्तीचे स्थान आपोआपच गुरु म्हणून खूप मोठे ठरत असे.

२ ) आणखी एक अत्यंत महत्वाचे कारण आहे ! परमेश्वर हा खूप शक्तीवान आहेच. ब्रह्मांडातील सर्व शक्ती त्याच्याचकडे आहेत असे आपण मानतो. मग गुरु कशासाठी ? हे समजण्यासाठी आपण आणखी काही उदाहरणे पाहू या....

आपल्या घराजवळ जरी २५००० व्होल्टस इतक्या उच्च दाबाचा विजेचा जनरेटर असेल तरी आपण त्याला आपल्या घरातील वायरिंग थेट जोडू शकत नाही. कारण इतकी प्रचंड शक्ती धारण करण्याची कुवत आपल्या घरातील वायरिंगमध्ये नसते. म्हणून त्यासाठी ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था केलेली असते. मेडिकल स्टोअर्समध्ये सगळी औषधे खच्चून भरलेली असतात. तरीही आपली प्रकृती बरी नसेल तर आपण तेथे जाऊन मनाला येतील ती औषधे आणून ती घेऊ शकत नाही. त्यासाठी डॉक्टर आणि फार्मासिस्ट / केमिस्ट लागतात. पाण्याचा प्रचंड मोठा धबधबा जरी समोर असेल तरी त्याखाली बाटली किंवा भांडे धरून पाणी घेता येत नाही. साधा प्रखर सूर्यप्रकाश आपल्याला सहन होत नाही म्हणून आपण आडोसा किंवा सावलीचा आधार घेतो, आपल्याला झेपेल इतकाच प्रकाश घरात येऊ देतो.

त्याचप्रमाणे सर्वशक्तिमान परमेश्वराची, पंचमहाभूतांची शक्ती इतकी प्रचंड आहे की बहुसंख्य सामान्य माणसे ती शक्ती, त्यांची कृपा थेट प्राप्त करून घेऊ शकत नाहीत. म्हणूनच गुरु हा एक मानवी रूपातील ट्रान्सफार्मर ( Human step down transformer ) अत्यावश्यक आहे. तो तुमचे कर्म, तुमची क्षमता, तुमची गरज पाहून तुम्हाला ही शक्ती किती, कधी आणि कशी द्यायची हे ठरवितो. तुम्ही या शक्तीचा गैरवापर करणार नाही याची खात्री पटल्यावर गुरु तुम्हाला आणखीही भरभरून देतो. हजारो लोकांचे अनुभव असे आहेत की जे गुरु आज हयात नाहीत, त्यांची मनापासून प्रार्थना केल्यावर ते सुद्धा तुम्हाला मदत करतात. कारण देह धारण केलेला असो वा नसो, हल्लीच्या भाषेत बोलायचे तर माणसासाठी compatible असलेली ती शक्ती अस्तित्वात असतेच.

३ ) अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की स्वतःला गुरु म्हणवून घेणारे, अब्जाधीश असलेले, भक्त पकडण्यासाठी प्रचंड यंत्रणा असलेले, मोठमोठी देवस्थाने स्थापून किंवा बळकावून अपार संपत्ती उपभोगणारे हे खरे गुरु नाहीतच ! त्याचप्रमाणे ज्यांनी एखाद दुसऱ्या वस्त्राशिवाय काही वापरले नाही, जे आज हयातही नाहीत अशा दिवंगत संतांना, चांदीचे देव्हारे, सोन्याचे मुकुट, चेन - अंगठ्या - दागिने- हिरे - माणके, विदेशी चलन, मण मण सोन्याची आसने अशा वस्तू अर्पण करणारे तरी खरे भक्त आहेत का, असा प्रश्न पडतो. गुरुदक्षिणा म्हणजे गुरूला विकत घ्यायची किंमत नव्हे !

४ ) अनेकदा आपण आपल्या आजूबाजूला एखादी साधी व्यक्ती, अत्यंत निरपेक्षपणे लोकांना मदत करताना, अचूक सल्ला देताना, सेवा करतांना पाहतो. कुणी मोबदला दिला तरी ते घेत नाहीत. अशा लोकांना समाज अनेकदा गुरुस्थानी मानतो. मात्र श्रीमंतीची भगवी वस्त्रे मिरविणाऱ्या, उत्तम मेकअप असलेल्या, सेलिब्रेटींच्या गराड्यात असणाऱ्या प्रचार गुरूंच्या मागे न लागणेच चांगले !

५ ) जर गुरु केलाच नाही तर ? तरीही तुम्हाला परमेश्वर देणारच असतो. त्याच्याकडे दुजाभाव नाही. समजा तुम्ही कुणीही गुरु न करता स्वत:च गाणे शिकायचे ठरविले तर अमाप मेहनत, रियाज करून ते शिकता येते. पण गुरुपाशी शिकलात तर तितक्याच वेळेत ते अधिक आणि सुयोग्यपणे प्राप्त करता येते. तुमच्या गळ्याची जात, स्वरांची समज, मेहेनतीची दिशा या गोष्टी गुरु अधिक जाणतो त्यामुळे तुम्हाला यश लवकर मिळते. एक फार महत्वाची गोष्ट म्हणजे गुरु न मिळाल्यास तुमची प्रगती कदाचित संथपणे होईल. पण जर चुकीचा, दांभिक गुरु निवडलात तर मात्र यश मिळतंय असे वाटत राहील पण प्रत्यक्षात मात्र लुबाडणुकीशिवाय काही होणार नाही.

६ ) गुरुपौर्णिमा ही फक्त अध्यात्मिक, धार्मिक गुरूंना वंदना नसून या निमित्ताने शिक्षण, लेखन, चित्रकला, मूर्तिकला, गायन, वादन, अभिनय, विविध क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्र इत्यादी सर्व क्षेत्रातील गुरुंबद्दल कृतज्ञता असते. गुरूचरित्र, गुरुगीता, गुरू ग्रंथसाहेब, गुरूपर्ब अशा गोष्टी ही खास हिंदुधर्माची देन आहे. प्राचीन काळापासून हिंदू धर्मात साजरा होणारा हा टीचर्स डे आहे.

ज्यांनी आपल्या आयुष्यभर एखाद दुसऱ्या वस्त्राशिवाय काहीही बाळगले नाही, जात पात किंवा गरीब श्रीमंत असे कधी पाहिले नाही, भिक्षा मागून निर्वाह केला, अत्यंत नि:संग आयुष्य जगले आणि लोकांना सदैव मदत करीत राहिले अशा श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह स्वामी, स्वामी समर्थ, गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, साईबाबा अशा अनेक संतांना गुरु मानून त्यांची मनोभावे भक्ती करणारी लाखो लोकं पाहायला मिळतात. आज कलीयुगातही त्यांच्या आशीर्वादामुळे भले झाल्याचा स्वानुभव अनेक भक्त सांगतात.

अशा समस्त सद्गुरुंना गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र वंदन !

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा