शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

Gudi Padwa 2025: हिंदू नववर्षापासून ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचा संकल्प करा; आयुष्य बदलून जाईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 15:43 IST

Gudi Padwa 2025: ब्राह्ममुहूर्तावर उठल्याचे नऊ फायदे कळल्यावर तुम्ही उशिरापर्यंत झोपणारच नाही, वाचा आणि गुढी पाडव्यापासून सुरुवात करा.

सर्वप्रथम आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहीजे जर की ब्रह्ममुहूर्त असा शब्द नसून ब्राह्ममुहूर्त असा योग्य शब्द आहे. ब्राह्ममुहूर्तावर (Benefits of wake up on Brahma Muhrta) उठल्याने अनेक शारीरिक, मानसिक लाभ होतात. ज्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आपली प्रगती होतेच शिवाय आध्यात्मिक उन्नती साध्य होते. ३० मार्च २०२५ रोजी गुढीपाडवा (Gudi Padwa 2025) अर्थात हिंदू नववर्ष दिन आहे. यानिमित्ताने ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचा संकल्प केला तर आयुष्य पुर्णपणे बदलून जाईल. कसे ते पहा. 

हा पहाटे ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन तासाचा असतो. याला रात्रीचा चौथा प्रहर अथवा उत्तररात्र असेही म्हणतात. याकाळात अनेक गोष्टी अशा ‌घडत असतात ज्या दिवसभराच्या कामासाठी लागणारी ऊर्जा देत असतात. या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी नऊ फायदे मिळतात.

१) पहीला फायदा म्हणजे या काळात ओझोन हा वायू पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात खालच्या थरात जास्त प्रमाणात आलेला असतो. या ओझोन मध्ये मानवास श्वसनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू (आॅक्सिजन) मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे या काळात उठून उजवी नाकपुडी चालू करून दीर्घ श्वसन केले असता रक्तशुद्धी होते. रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने हिमोग्लोबिन सुधारते. त्यामुळे ९० टक्के रोगांपासून मुक्ती मिळते.

२) दुसरा फायदा असा कि याकाळात मंद प्रकाश असतो. डोळे उघडल्यावर एकदम लख्ख प्रकाश डोळ्यावर पडला तर काही काळ आपणास काहीच दिसत नाही. असे वारंवार होत राहीले तर डोळ्यांचे विकार जडतात व दृष्टी क्षीण होऊ शकते. तसे होऊ नये यासाठी तारका असेपर्यंत उठावे.

३) तिसरा फायदा म्हणजे या काळात पंचतत्वापॆकी वायूतत्व जास्त प्रमाणात कार्यरत असते व मानवी शरीरातील अपानवायू हा कार्यरत असतो. हा अपानवायू मलनिःसारण व शरीरशुद्धीचे कार्य करतो. हा वायू कार्यरत असताना मलबाहेर टाकण्याचे कार्य कोणताही जोर न लावता सहजतेने होऊ शकते. जोर लावावा लागल्यास हळूहळू मूळव्याध होण्याची शक्यता असते. त्यामुळे मूळव्याध होऊ नये व उत्तम शरीरशुद्धी व्हावी यासाठी याच काळात मलनिःसारण करावे. तसेच जैविक घड्याळाप्रमाणे याकाळात मोठ्या आतड्यामध्ये आपली ऊर्जा कार्यरत असते.

४) चौथा फायदा म्हणजे आपल्या शरीरात , दिवसभरात जमा झालेली घाण नऊ ठिकाणाहून बाहेर पडत असते. या नऊ ठिकाणांना नवद्वार म्हणतात.ती नऊ द्वारे पुढीलप्रमाणे : दोन डोळे, दोन नाकपुड्या, दोन कान, एक तोंड, एक शिश्नद्वार व एक गुदद्वार. या नऊ ठिकाणी रात्री शरीरातील घाण जमा होते. त्या घाणीत अनेक जीवाणू विषाणू असतात जे रोग उत्पन्न करू शकतात. या जीवाणू विषाणूंना सूर्यप्रकाश मिळाल्यास त्यांची फार मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते व आपण रोगास बळी पडू शकतो.  हे होऊ नये यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठून ही घाण शरीराबाहेर काढून टाकली पाहिजे.

५) पाचवा फायदा म्हणजे सूर्योदयाच्या आधी ब्राह्ममुहूर्तावर स्नान केल्यास त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्यामुळे शुद्ध हवा आत शोषली जाऊन सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळाल्याने संपूर्ण शरिर दिवसभराच्या कामासाठी ताजेतवाने होते. दिवसभर काम केले तरी आपण एकदम फ्रेश राहतो.

६) सहावा फायदा म्हणजे याकाळात मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र व इतर केंद्रे असतात ती जागृत असतात. याकाळात विद्याध्ययन केल्यास इतर वेळेपेक्षा जास्त काळ स्मरणात राहते. तसेच याकाळात ॐकार जप केल्यास मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र तसेच इतर शक्ती केंद्रे जागृत होतात.

७) सातवा फायदा म्हणजे सूर्योदयावेळी अनेक प्रकारच्या आरोग्यदायी लहरी वातावरणात सूर्यकिरणांद्वारे येत असतात. त्या आपल्या त्वचेद्वारे शोषल्या जातात पण त्वचेची रंध्रे मोकळी असतील तर ते शोषले जातात. त्यासाठी ब्राह्ममुहुर्तावर उठून शरीर शुद्धी केली पाहिजे.

८) या काळात आपण ॐ मंत्र जप साधना केल्यास सप्तचक्र जागृत होतात, कारण या मुहूर्तावर वातावरण शुद्ध असल्याने जास्त प्रमाणात कंपने निर्माण होतात व या कंपनांद्वारे कुंडलिनी जागृती होते.

९) नववा फायदा म्हणजे या मुहूर्तावर अनेक पुण्यात्मे,  सिद्धात्मे हे परलोकातून पृथ्वीतलावर आलेले असतात.  या पुण्यात्म्यांना, सिद्धात्म्यांना आपण साधनेद्वारे भेटू शकतो व उत्तम मार्गदर्शन मिळवू शकतो.

असे एकूण नऊ फायदे आपण एकाच वेळेस ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नानादी कर्मे केल्याने मिळवू शकतो.

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाHealth Tipsहेल्थ टिप्स