शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

पेढा आणि रामनाम यातले साम्य दाखवले गोंदवलेकर महाराजांनी; पुण्यतिथीविशेष सद्विचार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 07:00 IST

आज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची १११ वी पुण्यतिथी, त्यानिमित्त त्यांनी छोट्याशा उदाहरणातून केलेला मोठा आध्यात्मिक बोध जाणून घेऊ.

देव आमच्या हाकेला कधीच धावून येत नाही. देव आमचे कधीच ऐकत नाही. देवाला आमची काळजीच नाही. अशा कितीतरी गोष्टींनी आपण देवाला बोल लावत असतो. परंतु, ज्यांच्या मदतीला देव धावून गेला, त्यांनी देवाला जशी आर्त साद घातली होती, तशी आपण आर्त हाक मारतो का? तर नाही. देवाचा आपल्याला आठव होतो, आपण आर्त हाकही मारतो, पण कधी? तर आपल्या संकटकाळी. ही स्वार्थी वृत्ती झाली. संत सांगतात, गरज पडल्यावर कोणीही गयावया करेल, परंतु गरज नसतानाही जो आर्त साद घालतो, त्याला खरे प्रेम म्हणावे आणि ते प्रेम जडण्याचे माध्यम आहे, हरीनाम! आज २५ डिसेंबर रोजी गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त जाणून घेऊया राम नामाचे महत्त्व!

ते कसे घ्यावे, असाही आपल्याला प्रश्न पडतो. याबाबत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात, 'नाम कसे घेऊ हे विचारणे, म्हणजे पेढा कसा खाऊ असे विचारण्यासारखे आहे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो. तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच करते. पेढा ज्याने खाल्ला आहे, तो पेढा कसा काऊ म्हणून जसे विचारत नाही, तसे नाम घेणारा माणूस नाम कसे घ्यावे हे विचारत नाही. बी शेतात पडते तेव्हा तिचे तोंड वरच्या बाजूला आहे की खाली, हे पाहत नाही. तो आपले काम करत राहतो. अंकुर आपला मार्ग स्वत: काढतो आणि आपली दिशा आपण ठरवतो.'

जितक्या सहजतेने आपण श्वसन करतो, तितक्या सहजतेने नाम घेतले पाहिजे. दमा झालेली व्यक्ती श्वास घेण्यासाठी कोणती दिशा योग्य हे विचारत नाही, तर आपल्यासाठी श्वसनाचा अनुकूल मार्ग शोधते. नाम घेणारी व्यक्तीदेखील श्वासागणिक नामाशी जोडली जाते आणि जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा नाम घेत राहते. 

नामस्मरण करण्यासाठी ठराविक मुद्रा हवीच असेही नाही. गोंदवलेकर महाराज सांगतात, 'समजा, तुम्ही पद्मासन घालून नामस्मरणाला बसलात आणि काही वेळाने पाठीला रग लागली, तर नामाकडे कमी आणि देहाला होणाऱ्या यातनांकडे तुमचे लक्ष जाईल. नाम असे घ्यावे, जिथे देहाचा विसर पडेल.'

नाम कधी घ्यावे, कधी नाही, याबाबत बंधने आहेत का? तर नाही. कोणत्याही परिस्थितीत जितक्या सुलभतेने श्वसन सुरू असते, तितक्याच सुलभतेने नाम घेत राहावे. विटाळ देहाला असतो, मनाला नाही. सोहेर-सुतक देहाला असते, मनाला नाही. रोग-आजार देहाला असतात, मनाला नाही आणि नाम हे मनाने घ्यायचे आहे, देहाने नाही. मन हे आत्म्याशी जोडलेले असते, बुद्धी नाही. म्हणून आत्म्याचा आणि परमात्म्याचा संबंध जोडायचा असेल, तर नामरूपी पेढा खाताना विचार करू नका, त्याची गोडी चाखत राहा.