शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
2
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
3
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
4
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
5
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
6
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
7
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
8
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
9
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
10
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
11
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी!
12
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
13
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
14
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
15
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
16
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
17
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
18
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
19
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
20
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट

जोडीदारावर जीव ओवाळून टाकतात 'या' राशीच्या मुली; तुमची जोडीदार कोणत्या राशीची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 14:19 IST

प्रेम, ममत्त्व, वात्स्यल्य, दया इ. गोष्टी स्त्रियांना जन्मतः मिळालेल्या असतात. तरीदेखील पुढील राशीच्या मुली जोडीदारांवर विशेष प्रेमाचा वर्षाव करतात असे ज्योतिष शास्त्र सांगते. 

आजच्या आधुनिक युगात मुला-मुलींचे एकमेकांकडे आकर्षित होणे आणि प्रेमात पडणे हे सामान्य झाले आहे. काही परिस्थितींमध्ये, प्रकरण इथपर्यंत पोहोचते की लोक एकमेकांसाठी जीव द्यायला तयार होतात. अर्थात ते प्रेम म्हणावे की क्षणिक आकर्षण, हा निरिक्षणाचा विषय आहे. कारण ब्रेक अप, पॅच अप नाहीतर अन्य रिलेशनशिप या गोष्टींचा अगदी खेळखंडोबा झाला आहे. अशा स्थितीत प्रत्येकाला गरज असते खऱ्या आणि निस्सीम प्रेम करणाऱ्या जोडीदाराची.  ज्योतिषशास्त्रात काही राशींचाउल्लेख आहे, त्या राशी आपल्या जोडीदारावर मनापासून प्रेम करतात असे अभ्यासकांचे मत आहे. यावर तुमचा अनुभव काय, ते अवश्य सांगा. तूर्तास ज्योतिष शास्त्राचे भाकीत काय सांगते ते पाहू. 

मिथुन :  ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीच्या मुली प्रेमाच्या बाबतीत स्वतःला झोकून देतात. ज्याच्याशी एकदा नाते जुळले, त्याच्यी आयुष्यभर साथ देतात. आपण जेवढे प्रेम करतो तेवढेच जोडीदाराने आपल्यावर प्रेम करावे अशी त्यांची  अपेक्षा असते आणि त्यासाठी त्या जोडीदाराचे मन रिझवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्यांना आपल्या छोट्या मोठ्या गोष्टींचे शेअरिंग करायला आवडते आणि तेवढीच पारदर्शकता जोडीदाराकडूनही अपेक्षित असते. 

सिंह : सिंह राशीच्या स्वभावाने कडक पण जोडीदाराच्या बाबतीत झुकते माप घेतात. आपाल्या आवडी निवडी सांगून त्या जोडीदाराकडून सगळ्या इच्छांची पूर्तता करून घेतात. त्यांना शिस्तबद्धता आवडते म्हणून काही वेळा त्या जोडीदाराशी कठोर शिक्षकासारख्या वागतात, पण त्यांच्या या स्वभावामुळे जोडीदाराला त्याच्या आयुष्यात विशेषतः करिअर मध्ये खूप लाभ होतो. जोडीदाराशी त्यांचे अतूट नाते असते. त्या आपल्या नवऱ्याला मुठीत ठेवतात आणि मिठीतही!

धनु : या राशीच्या मुली मनाने पारदर्शक असतात. त्या प्रेमाच्या बाबतीत अगदी स्पष्ट असतात. कोणत्याही प्रकारची फसवणूक करत नाहीत व करून घेतही नाहीत. ज्योतिष शास्त्रानुसार जो मुलगा या मुलींच्या प्रेमात पडतो तो खूप भाग्यवान असतो. त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा, समाधान मानण्याचा, करिअरचा सर्वच बाबतीत दृष्टिकोन स्पष्ट असतो. त्यामुळे त्यांची स्थिर वृत्ती जोडीदाराला सुख दुःखात साथ आणि धीर देणारी ठरते. त्या आपल्या जोडीदाराच्या छोट्या छोट्या आवडी निवडीची काळजी घेतात. त्यांना संसार सुख चांगले मिळते. 

मकर : मकर राशीच्या मुली आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक लहान-मोठ्या आनंदाची, आवडी-निवडीची चांगली काळजी घेतात. प्रेम मिळवण्यासाठी आणि नात्यात ताजेपणा टिकवण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या ठायी समर्पणाची भावना तीव्र असते. अनेक गोष्टी उशिरा मिळाल्याने त्यांच्या ठायी प्रचंड संयम बघायला मिळतो आणि हीच बाब त्यांना संसार सुखी करण्याचे बळ देतो. या राशीची जोडीदार तुमच्या वाट्याला आली असेल तर तुम्हीदेखील स्वतःला भाग्यवान समजायला हरकत नाही. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष