शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Geeta Jayanti 2024: आज गीता जयंती तथा मोक्षदा एकादशी; श्रीकृष्णाचे 'हे' मंत्र देतील सर्व त्रासातून मुक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 09:38 IST

Mokshada Ekadashi 2024: श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली तो आजचाच दिवस; त्यानिमित्त आज कृष्ण मंत्राचा जप आवर्जून करा आणि तणावमुक्त व्हा!

आज ११ डिसेंबर गीता जयंती (Geeta Jayanti 2024) अर्थात कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली तो दिवस आणि आजच आहे मोक्षदा एकादशी (Mokshda Ekadashi 2024)!  मनुष्याला मोक्ष मरणोत्तर मिळतो, पण जिवंतपणी ज्या नरक यातना भोगाव्या लागतात, त्यातून मोक्ष अर्थात मुक्ती मिळण्यासाठी काही श्रीकृष्ण मंत्र दिले आहेत. 

मनापासून हाक मारली, तर देवही धावून येतो, अशी आपली देवाप्रती श्रद्धा आणि अतूट विश्वास आहे. अशात भगवान कृष्णाने तर गीतेत वचन दिले आहे,'संभवामि युगे युगे!' म्हणजेच भक्त अडचणीत असेल, तर भगवंत त्याच्या मदतीला धावून जातात. श्रीकृष्णाचा मनापासून आठव केला, तर आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात. सद्यस्थितीत सर्वत्र साथीचा रोग आणि नकारात्मकता पसरलेली आहे. अशा परिस्थितीशी सामना करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचे या मंत्रांचे जप केल्यास तुमचे मन शांत होईलच, शिवाय त्रास व संकटेही दूर होतील.

हे कृष्ण द्वारकावासिन् क्वासि यादवनन्दन।आपद्भिः परिभूतां मां त्रायस्वाशु जनार्दन।।

जीवनात एखादी मोठी आपत्ती किंवा संकट येत असेल तर किमान १०८ वेळा या मंत्रजप करावा. परंतु लक्षात ठेवा की मंत्र जप करणे प्रामाणिक मनाने आणि पूर्ण निष्ठा आणि श्रद्धेने केले पाहिजे. असा विश्वास आहे की या मंत्राचा जप केल्याने श्रीकृष्णाची कृपा नक्कीच प्राप्त होते.

ॐ नमो भगवते तस्मै कृष्णाया कुण्ठमेधसे। सर्वव्याधि विनाशाय प्रभो माममृतं कृधि।।

श्री कृष्णाचा हा गूढमंत्र आहे, ज्यामुळे सर्व प्रकारचे भय, संकट आणि रोग दूर होण्यास मदत होते. जीवनातले अडथळे दूर करण्यासाठीही हा मंत्र प्रभावी आहे. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर कुणाशीही न बोलता या मंत्राचा रोज तीन वेळा जप केल्याने आजार बरे होतात आणि वाईट गोष्टींचा अंत होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

'ॐ नमो भगवते श्री गोविन्दाय'

असे मानले जाते, की जो कोणी श्रीकृष्णाच्या या मंत्राचा जप करतो त्याला सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते.

कृं कृष्णाय नमः

हा भगवान श्रीकृष्णाचा मूळ मंत्र आहे आणि असा विश्वास आहे की या मंत्राचा जप करून व्यक्तीची संपत्ती अडकली असेल तर ती मिळू शकते. तसेच या मंत्राचा जप केल्याने कुटुंबात सुख-शांती राहते.