शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 13:31 IST

Ganesh Chaturthi 2025 Pran Pratishtha Sampurna Puja Vidhi In Marathi: अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी मंत्रोच्चारासह पार्थिव गणपती पूजन कसे करावे याबाबत जाणून घ्या...

Ganpati Pran Pratishtha Sampurna Puja Vidhi In Marathi: सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः । लम्बोदरश्च विकटो विघन्नाशो विनायकः ॥ १४ विद्या, ६४ कलांचा अधिपती गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा हा देव आहे. कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात प्रथमेश असलेल्या सुखकर्ता, विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या पूजनाने केली जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला भारतातील कोट्यवधी घरात गणपती बाप्पाची पार्थिव मूर्ती आणून पूजन केले जाते. प्राचीन काळापासून ही परंपरा अव्याहतपणे अखंडितपणे सुरू आहे. यंदा बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. या दिवशी पार्थिव गणपती पूजन केले जाते.  

गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?

प्रत्यक्ष पार्थिव गणपती पूजनाच्या दिवशी अनेक समस्या, अडचणी येत असतात. पार्थिव गणपती पूजा करण्यासाठी अनेकदा गुरुची मिळत नाहीत. गुरुजींनी येतो, असे सांगितले असले, तरी अनेकदा त्यांना यायला उशीर होतो. गणपती पूजनाचा कालावधी उलटून जात असतो. अशावेळी गणपती बाप्पाची पूजा कशी करावी, असा प्रश्न उपस्थित होते. परंतु, काळजी करू नये. अतिशय सोप्या पद्धतीने मंत्रोच्चारासह पार्थिव गणपती पूजन कसे करावे याबाबत माहिती देत आहोत. श्रीगणेश चतुर्थी बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी समाप्ती दुपारी ०३ वाजून ४३ मिनिटांनी होणार आहे. ११.२५ ते दुपारी १.५४पर्यंत मध्यान्हकाल आहे. तर, १२ वाजता ते दुपारी १ वाजून ३० मिनिटे आहे. गणेश चतुर्थी २०२५ अनेकार्थाने महत्त्वाची मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक दुर्मिळ शुभ योगात या गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. यावेळी गणेश चतुर्थीला दुर्लभ योग जुळून येत आहेत. यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, प्रीति योग, इंद्र योग आणि ब्रह्म योग यांचा समावेश आहे. तसेच महालक्ष्मी योग, महाभाग्य योग, लक्ष्मी नारायण योगही जुळून येत आहेत. घरच्या घरी सोप्या पद्धतीने मंत्रोच्चारासह पार्थिव गणेश पूजा पूजन विधी जाणून घेऊया...

५ राशींवर गणपती बाप्पाची कायम कृपा, अपार बुद्धी, कालातीत लाभ; भरघोस भरभराट, भाग्योदय होतो!

पार्थिव गणपती (Pran Pratishtha) पूजनासाठी साहित्य काय घ्यावे? पूर्वतयारी कशी कराल? 

- गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ , आंब्यांचे डहाळी , सुपाऱ्या. पाण्याने भरलेला तांब्या, पळी , पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी.

- गणेश मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ करून त्यावर रंगीत पाट मांडून, अक्षता पसराव्यात. यानंतर त्यावर मूर्ती स्थापन करावी व शूचिर्भूतपणे आसनावर बसवून द्विराचमन, प्राणायाम आदी केल्यावर 'श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ पाथिर्वगणपतिपूजनमहं करिष्ये' असा संकल्प म्हणून पाणी सोडावं. कलश, शंख, घंटा व दीप यांचे पूजन करून गंध, अक्षता, पुष्प अर्पण करावं. गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करावा व मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे पुढील मंत्र म्हणावेत.

८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!

पार्थिव गणपती पूजन प्राणप्रतिष्ठा मंत्र

अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा: क्षरन्तु च।अस्यै देवत्वम् आचार्यै मामहेति च कश्चन।।रक्तांभीधिस्थ पोतोल्ल सदरुण सरोजाधि रुढाकराब्जै:।पाशम् कोदंड भिक्षूद्भवमथ गुणमप्यम् कुशम् पंचबाणान्।।बिभ्राण असृक्कपालम् त्रिनयन लसिता पीनवक्ष ऊरुहाढ्या।देवी बालार्क वर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ती: परा न:।।

- अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा केल्यावर श्रीगणेशांना नमस्कार करावा आणि...

एकदंतम् शूर्पकर्णम् गजवक्त्रम् चतुर्भुजम्।पाशांकुशधरम् देवम् ध्यायेत सिद्धिविनायकम्।।ध्यायेत देवम् महाकायम् तप्तकांचन संनिभम्।चतुर्भुजम् महाकायम् सर्वाभरणभूषितम्।।दंताक्षमाला परशुपूर्ण मोदक हस्तकम्।मोदकासक्त शुंडाग्रम् एकदंतम् विनायकम्।।

- असे श्लोक म्हणत असताना अंत:करणात श्रीगणेश मूर्तीचे ध्यान, स्मरण करावे.

आवाहन मंत्र

आवाहयामि विघ्नेश सुरराज आचिर्तेश्वर।अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थ गणनायक।।श्रीसिद्धिविनायकाय नम:। आवाहयामि।।

- असे म्हणून मूर्तीला आवाहन सूचक अक्षता अर्पण कराव्यात.

विचित्र रत्नरचितम् दिव्यास्तरण संयुतम्।स्वर्णसिंहासनम् चारु गृहाण सुरपूजित।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। आसनार्थे अक्षताम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेश मूर्तीला आसनासाठी अक्षता अर्पण कराव्यात.

सर्वतीर्थ समानीतम् पाद्यम् गंधादि संयुतम्।विघ्नराज गृहाणेदम् भगवन् भक्तवत्सल।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पादयो: पाद्यम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेशांच्या पायांवर फुलाने पाणी अर्पण करावे.

अर्घ्य मंत्र

अर्घ्यम् च फलसंयुक्तम् गंधपुष्प आक्षतैर्युतम्।गणाध्यक्ष नमस्तेस्तु गृहाण करुणानिधे।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। अर्घ्यम् समर्पयामि।।

- असे म्हणून पळीभर पाण्यात गंध, अक्षता, पुष्प व सुपारी ठेवून त्यातले पाणी फुलाने, अर्घ्य म्हणून श्रीगणेशांना अर्पण करावे.

आचमन मंत्र

विनायकम् नमस्तुभ्यम् त्रिदशैरभि वंदित।गंगाहृतेन तोयेन शीघ्रम आचमनम् कुरु।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। आचमनियम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेशांच्या हातावर फुलाने आचमनासाठी पाणी अर्पण करावे.

गंगादि सर्वतीथेर्भ्य आनीतम् तोयमुत्तम्।भक्त्या समपिर्तम् तुभ्यम् स्नानाय आभिष्टदायक।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। स्नानम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेशांवर फुलाने पाणी अर्पण करावे.

पंचामृत स्नान मंत्र

पयो दधि घृतम् चैव मधुशर्करया युतम्।पंचामृतेन स्नपनम् प्रियताम् परमेश्वर।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पंचामृत स्नानम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेशांना फुलाने पंचामृत (पंचामृत म्हणजे दूध, दही, तुप, साखर आणि मध) अर्पण करावे. नंतर शुद्ध पाणी अर्पण करावे. या वेळी सुगंधी अत्तर, गरम पाणी अर्पण करावे.

पंचामृत अर्पण केल्यानंतर त्याचा नैवेद्य दाखवावा. यानंतर सुरुवातीला वाहिलेली फुले, अक्षता म्हणजेच निर्माल्य उत्तर दिशेला विसर्जित करावे. यानंतर अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करावा. गणपती अथर्वशीर्ष पठण शक्य नसेल तर गणपती स्तोत्र म्हणावे. अभिषेक करून झाल्यानंतर...

‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!

वस्त्र मंत्र

रक्तवस्त्रयुगम् देव दिव्यम् कांचनसंभवम्।सर्वप्रदम् गृहाणेदम् लंबोदर हरात्मज।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। वस्त्रम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेशांना वस्त्र अर्पण करावे.

यज्ञोपवीत मंत्र

राजतम् ब्रह्मासूत्रम् च कांचनम् चोत्तरीयकम्।गृहाण चारु सर्वज्ञ भक्तानाम् वरदो भव।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। यज्ञोपवितम् समर्पयामि।।

- जानवे श्रीगणेशांना डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली अर्पण करावे.

चंदन मंत्र

कस्तुरीरोचना चंदकुंकुमैश्च समन्वितम्।विलेपनम् सुरश्रेष्ठ चंदनम् प्रतिगृह्यताम्।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। चंदनम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेशांच्या मस्तकाला चंदन लावावे.

अक्षता मंत्र

रक्ताक्षतांश्च देवेश गृहाण द्विरदानन।ललाटपटले चंदस्तस्योपरि विधार्यताम्।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। अक्षताम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेशांना अक्षता अर्पण कराव्यात.

पुष्प मंत्र

माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो।मयाहृतानि पूजार्थम् पुष्पाणि प्रतिगृह्यताम्।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पुष्पाणि समर्पयामि।।

- असे म्हणून अनेक प्रकारची फुले , दुर्वा , शमी व अन्य पत्री श्रीगणेशांना अर्पण कराव्यात.

धूप मंत्र

दशांगम् गुग्गुलम् धूपम् सुगंधम् च मनोहरम्।गृहाण सर्वदेवेश उमापुत्रम् नमोस्तुते।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। धूपम् समर्पयामि।।

- असे म्हणून डाव्या हाताने घंटा वाजवून व उजव्या हाताने अगरबत्तीने श्रीगणेशांना ओवाळावे.

दीप मंत्र

सर्वज्ञ सर्वलोकेश त्रैलोक्य तिमिरापह।गृहाण मंगलम् दीपम् रुद्रप्रिय नमोस्तुते।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। दीपम् समर्पयामि।।

- असे म्हणून निरांजनाने श्रीगणेशांना ओवाळावे.

नैवेद्य मंत्र

नैवेद्यम् गृह्यताम् देव भक्तिम् मेह्यचलाम् कुरु।ईप्सितम् मे वरम् देहि परत्र च पराम् गतिम्।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। नैवेद्यम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेशांना नैवेद्य दाखवावा. यामध्ये दुपारचा भोजन नैवेद्य नंतर दाखवला तरी चालेल. परंतु, यावेळेस बाप्पाचे आवडचे लाडू, मोदक, पेढे यांचा नैवेद्य दाखवावा.

विडा मंत्र

पूगीफलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतम्‌ ।कर्पूरैलासमायुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यताम्‌ ।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पूगीफल तांबुलम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेशांना विडा अर्पण करावा. म्हणजे गणपती बाप्पासमोर ठेवलेल्या विड्यावर उजव्या हाताने पळीभर पाणी सोडावे.

दुर्वा मंत्र

गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्राघनाशन।एकदंते भवक्त्रेति तथा मूषकवाहन।।विनायकेश पुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक।कुमारगुरवे नित्यम् पूजनीया: प्रयत्नत:।।

- हे मंत्र म्हणून २१ दुर्वा श्रीगणेशांना अर्पण कराव्यात. 

यानंतर गणपतीची आरती करावी.

नमस्कार मंत्र

नम: सर्वहितार्थाय जगदाधार हेतवे।साष्टांगोयम् प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृत:।।

- असा मंत्र म्हणून श्रीगणेशांसमोर साष्टांग नमस्कार घालावा.

प्रदक्षिणा मंत्र

यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च।तानि तानि विनश्यंति प्रदक्षिण पदे पदे।।

- असा मंत्र म्हणून स्वत:भोवती ३ प्रदक्षिणा घालाव्या.

मंत्रपुष्प

विनायकेशपुत्र त्वम् गणराज सुरोत्तम।देहि मे सकलान् कामान् वंदे सिद्धिविनायक।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। मंत्रपुष्पम् समर्पयामि।।

- असे म्हणून श्रीगणेशांना फुले अर्पण करावी व हात जोडून पुढील प्रार्थना करावी.

पार्थना मंत्र

यन्मया चरितम् देव व्रतमेतत् सुदुर्लभम्।गणेश त्वम् प्रसन्न: सन् सफलम् कुरु सर्वदा।।

विनायक गणेशान् सर्वदेव नमस्कृत।पार्वतीप्रि य विघ्नेश मम विघ्नान् निवारय।।

आवाहनम् न जानामि न जानामि तवार्चनम्।पूजाम् चैव न जानामि क्षम्यताम् परमेश्वर।।

मंत्रहीनम् क्रियाहीनम् भक्तितहीनम् सुरेश्वर।यत्पूजितम् मया देव परिपूर्णम् तदस्तु मे।।

अन्यथा शरणम् नास्ति त्वमेव शरणम् मम।तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर।। 

अशी श्रीगणेशांची प्रार्थना करावी.

।। इति पूजाविधी ।।

।। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ।।

टॅग्स :Ganesh Chaturthiगणेश चतुर्थीPuja Vidhiपूजा विधीGanesh Mahotsavगणेशोत्सव 2025Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीganpatiगणपती 2025Ganpati Festivalगणपती उत्सव २०२५spiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मास