शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Ganesh Chaturthi 2024: बाप्पांच्या प्रतिष्ठापनेचे उद्या केवळ तीनच योग्य मुहूर्त; डेकोरेशनपूर्वी ही वेळ पहा, बाप्पांचे आगमन झालेच असेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 17:13 IST

Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीला सूर्यास्तापूर्वी प्राणप्रतिष्ठा व्हावी असे शास्त्र सांगते, त्यासाठी शुभ परिणामकारक तीन मुहूर्त जाणून घ्या. 

७ सप्टेंबर रोजी भाद्रपद गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2024)आहे. या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाईल. यासाठी दिवसभरात ३ शुभ मुहूर्त सांगितले आहेत. सूर्यास्तापूर्वी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे. गणेश पुराणानुसार, गणपतीचा जन्म चतुर्थी तिथी आणि चित्रा नक्षत्राच्या मध्यरात्री म्हणजेच दिवसाच्या उत्तरार्धात झाला होता. हा शुभ काळ सकाळी ११.२० पासून सुरू होणार आहे. 

यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी सुमुख नावाचा शुभ योग तयार होत आहे. सुमुख हेदेखील गणपतीचे एक नाव आहे. तसेच पारिजात, बुधादित्य आणि सर्वार्थसिद्धी योग तयार होत आहे. या संयोगाने गणपती स्थापनेचे शुभ परिणाम आणखी वाढणार असल्याचे चिन्ह आहे, असे मत ज्योतिष तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

शास्त्रानुसार गणेशाची अनेक रूपे आहेत, परंतु भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीला सिद्धी विनायकाच्या रूपात गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. या गणेशमूर्तीमध्ये उजवा दात तुटलेला असून डावा दात संपूर्ण आहे. बाप्पाने यज्ञोपवित धारण केले आहे आणि सर्पाचा मेखला बांधला आहे. बाप्पा सुखासनात बसलेला आहे. एक हात आशीर्वादाचा, दुसऱ्या हातात अंकुश (शस्त्र) असते. तिसऱ्या हातात मोदक आणि चैथ्या हातात रुद्राक्षाची जपमाळ. बसलेली मूर्ती लाल रंगाची असून तिच्या डोक्यावर मुकुट आणि गळ्यात हार आहे. हा गणेश सुख-समृद्धी देतो. प्रत्येक शुभ कार्यापूर्वी त्याची पूजा केली जाते. जो प्रत्येक कामाचे शुभ फल वाढवतो. म्हणूनच त्यांना सिद्धी विनायक म्हणतात. 

गणेशपूजेत कोणती फुले व पाने वापरावीत : जाटी, मल्लिका, कणेर, कमळ, गुलाब, चंपा, झेंडू, मौलश्री (बकुळ) पाने : दुर्वा, शमी, धतुरा, कणेर, केळी, बेर, मंदार आणि बिल्वपत्र

गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त : सकाळी ८ ते ९.३०, दुपारी ११.२० ते १. ४०, संध्याकाळी २ ते ५.३० असा आहे.

गणेश पुराणानुसार गणेश पूजेची पद्धत  : तुपाचा दिवा लावा, दूध आणि पंचामृताने स्नान घाला आणि अष्टगंध व लाल चंदनाने गणेशाला टिळा  लावा. हार फुले आणि पाने तसेच मोदकाचा नैवेद्य दाखवा. जेवून झाल्यावं विडा म्हणून लवंग, वेलची, केशर, कापूर, सुपारी आणि काचू असलेली सुपारीची पाने अर्पण करा. आरती करून स्वतःभोवती प्रदक्षिणा घाला आणि देवाला मनोभावे नमस्कार करा. 

गणेशजींचे मंत्र आणि त्यांचा अर्थ

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। 

विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रिमाय । लम्बोदराय सकलाम जगद्विताम ।। नागाननाथ श्रुतियज्ञविभूषिताय । गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते ॥

अमेय च हेरंब परशुधरके ते । मशाका वाहनमैव विश्वेशाय नमो नमः । 

गणेशपूजेच्या वेळी या गोष्टी लक्षात ठेवा :  पूजेमध्ये निळ्या, काळ्या रंगाचे कपडे घालू नका. दुर्वा आणि मोदकाशिवाय पूजा अपूर्ण राहते. एकदा प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती हलवू नका, विसर्जनाच्या वेळीच निरोप द्या. बाप्पाच्या मूर्तीचे अवयव नाजूक असल्याने सांभाळून हाताळा. 

Ganesh Chaturthi 2024: दीड दिवसात गणपती विसर्जन करण्यामागे काय आहे शास्त्रार्थ? वाचा!

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३