शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

गणेश चतुर्थी: ५ हजार वर्षांपासून पार्थिव गणपती पूजन; कशी सुरु झाली परंपरा? वाचा, काही तथ्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 07:34 IST

Ganesh Chaturthi 2023: पार्थिव गणपती पूजनाबाबत पुराणात काही संदर्भ आढळून येतात, असे म्हटले जाते. वाचा, पौराणिक कथा...

Ganesh Chaturthi 2023: भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते. एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला होता. असे काही दाखले पुराणांमध्ये आढळतात. मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी अंगारक योगात गणेश चतुर्थी आहे. यापुढे १० दिवस गणेशोत्सव साजरा केला जाईल. प्राचीन काळापासूनची पार्थिव गणपती पूजनाची परंपरा कशी सुरू झाली? जाणून घेऊया...

एका पौराणिक कथेनुसार, महाभारताची रचना महर्षी व्यासांनी केली. हे महाभारत महर्षी व्यासांनी महादेव आणि पार्वती देवीचे पुत्र गणपतीकडून लिहून घेतले. घराघरात पार्थिव पूजनाची सुरुवात तेव्हापासून झाली, असे म्हटले जाते. महाभारताची रचना करताना महर्षी व्यास आणि गणपती यांनी एकमेकांना काही अटी घातल्या होत्या. गणपतीला आपल्या लेखनाच्या गतीबाबत आत्मविश्वास होता. गणपती महर्षी व्यासांना म्हणाले की, तुम्ही महाभारत कथा हळूहळू सांगणार असाल, तर मला कंटाळा येईल. त्यामुळे तुम्ही न थांबता सलग गोष्ट सांगावी. ही अट आपणास मान्य असेल, तर आणि तरच लेखनाची जबाबदारी मान्य करेन, अशी अट गणपतीने घातली.

...आणि लेखनाचा श्रीणेशा झाला

व्यास महर्षी होते. गणपतीच्या अटीवर त्यांनी केवळ स्मित हास्य केले. महर्षी व्यास गणपतीला म्हणाले की, आपली अट मला मान्य आहे. मात्र, मी सांगितलेल्या वाक्याचा अर्थ समजला, उमगला, तरच ते वाक्य लिहून पूर्ण करायचे. अन्यथा अर्थ समजेपर्यंत थांबायचे, अशी अट महर्षी व्यासांनी ठेवली. गणपती तयार झाले आणि लेखनाचा श्रीगणेशा केला. महर्षी व्यास नेमके काय सांगताहेत हे समजून घ्यायला अनेकदा गणपतीला विलंब व्हायला लागला. संपूर्ण महाभारत कथा समजून लिहून घेण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लोटला, असे सांगितले जाते.

गणपतीच्या सर्वांगावर मातीचा लेप लावण्यात आला

महाभारत कथा पूर्ण होण्यात मोठा कालावधी लोटला. कित्येक दिवस एकाच ठिकाणी बसल्यामुळे गणपतीचे शरीर आखडून गेले. गणपतीच्या शरीरातील उष्णताही वाढायला लागली. वाढत जाणाऱ्या उष्णतेवर उपाय म्हणून गणपतीच्या सर्वांगावर मातीचा लेप लावण्यात आला. हा लेप लावून लावून जाडसर झाला. त्याला टणकपणा येऊन त्याने गणरायाच्या मूर्तीचा आकार घेतला. महाभारताची कथा लिहून पूर्ण झाल्यानंतर ही माती झटकून विसर्जित करण्यात आली. तेव्हापासून गणपतीचा सन्मान करण्यासाठी गणपतीची मातीची मूर्ती घडवून तिचे पूजन करण्याची परंपरा सुरू झाली, अशी एक कथा सांगितली जाते.

​पेशवे काळ आणि घरगुती गणेशोत्सव

सवाई माधवरावांनी घरगुती गणेश पूजनाला उत्सवाचे मोठे रूप दिले. हा उत्सव भव्य स्वरूपात शनिवारवाड्यातील गणेश महालात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते दशमीपर्यंत साजरा केला जाऊ लागला, असे म्हटले जाते. दरबारातील अन्य मानकऱ्यांनीसुद्धा या कल्पनेचे स्वागत केले. शनिवारवाड्यातून फुला-पानांनी सजवलेल्या पालखीतून गणेशमूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येऊ लागली. शनिवारवाड्याजवळच उत्तरेच्या दिशेला असणाऱ्या नदीप्रवाहात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येऊ लागले. सुरुवातीला दीड दिवस, पाच दिवस, दहा दिवस असा उत्सव होता. आजच्या काळातही ही वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. लोकमान्य टिळकांच्या देशकार्यात गणपतीला देशा-परदेशात महत्त्व प्राप्त झाले. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपतीMahabharatमहाभारत