शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Ganesh Chaturthi 2021: श्रीगणेश चतुर्थी: गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेची मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 09:06 IST

Ganesh Chaturthi 2021: पाहा, सोप्या पद्धतीने श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना अशी करावी...

कोणत्याही शुभ किंवा मंगलकार्याची सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजेच श्रीगणपतीची पूजा व आराधना करण्याची परंपरा आहे. शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. श्रीगणेशाची प्रतिष्ठापना शुक्रवार, १० सप्टेंबर रोजी सकाळी सूर्योदयापासून दुपारपर्यंत करावी, असे सांगितले जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ०६ वाजून २५ मिनिटांनी सूर्योदय आहे.  यंदाही कोरोना संकटाचे सावट गणेशोत्सवावर आहे. गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अगदी घरच्या घरी राहून आपण गणपती पूजन करू शकता. आपल्यासाठी संपूर्ण श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा (मंत्रोच्चारासहित) घेऊन आलो आहोत. पाहा, सोप्या पद्धतीने श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना अशी करावी...

पूजेची पूर्वतयारी : -

गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ , आंब्यांचे डहाळी , सुपाऱ्या. पाण्याने भरलेला तांब्या, पळी , पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी.

गणेश चतुर्थी दिनी प्रात:स्नान-संध्या पूजादी नित्यविधी करावेत. मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ करून त्यावर रंगीत पाट मांडून, अक्षता पसराव्यात. यानंतर त्यावर मूर्ती स्थापन करावी व शूचिर्भूतपणे आसनावर बसवून द्विराचमन, प्राणायाम आदी केल्यावर 'श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ पाथिर्वगणपतिपूजनमहं करिष्ये' असा संकल्प म्हणून पाणी सोडावं. कलश, शंख, घंटा व दीप यांचे पूजन करून गंध, अक्षता, पुष्प अर्पण करावं. गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करावा व मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे पुढील मंत्र म्हणावेत.

- प्राणप्रतिष्ठेचा मंत्र

अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा: क्षरन्तु च।अस्यै देवत्वम् आचार्यै मामहेति च कश्चन।।रक्तांभीधिस्थ पोतोल्ल सदरुण सरोजाधि रुढाकराब्जै:।पाशम् कोदंड भिक्षूद्भवमथ गुणमप्यम् कुशम् पंचबाणान्।।बिभ्राण असृक्कपालम् त्रिनयन लसिता पीनवक्ष ऊरुहाढ्या।देवी बालार्क वर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ती: परा न:।।

अशी प्राणप्रतिष्ठा झाल्यावर श्रीगणेशांना नमस्कार करून...

एकदंतम् शूर्पकर्णम् गजवक्त्रम् चतुर्भुजम्।पाशांकुशधरम् देवम् ध्यायेत सिद्धिविनायकम्।।ध्यायेत देवम् महाकायम् तप्तकांचन संनिभम्।चतुर्भुजम् महाकायम् सर्वाभरणभूषितम्।।दंताक्षमाला परशुपूर्ण मोदक हस्तकम्।मोदकासक्त शुंडाग्रम् एकदंतम् विनायकम्।।

हे श्लोक म्हणत असताना अंत:करणात श्रीगणेश मूर्तीचे ध्यान करावे.

- आवाहन मंत्र

आवाहयामि विघ्नेश सुरराज आचिर्तेश्वर।अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थ गणनायक।।श्रीसिद्धिविनायकाय नम:। आवाहयामि।।

असे म्हणून मूर्तीला आवाहन सूचक अक्षता अर्पण कराव्यात.

विचित्र रत्नरचितम् दिव्यास्तरण संयुतम्।स्वर्णसिंहासनम् चारु गृहाण सुरपूजित।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। आसनार्थे अक्षताम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेश मूर्तीला आसनासाठी अक्षता अर्पण कराव्यात.

सर्वतीर्थ समानीतम् पाद्यम् गंधादि संयुतम्।विघ्नराज गृहाणेदम् भगवन् भक्तवत्सल।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पादयो: पाद्यम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांच्या पायांवर फुलाने पाणी अर्पण करावे.

- अर्घ्य मंत्र

अर्घ्यम् च फलसंयुक्तम् गंधपुष्प आक्षतैर्युतम्।गणाध्यक्ष नमस्तेस्तु गृहाण करुणानिधे।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। अर्घ्यम् समर्पयामि।।

असे म्हणून पळीभर पाण्यात गंध, अक्षता, पुष्प व सुपारी ठेवून त्यातले पाणी फुलाने, अर्घ्य म्हणून श्रीगणेशांना अर्पण करावे.

- आचमन मंत्र

विनायकम् नमस्तुभ्यम् त्रिदशैरभि वंदित।

गंगाहृतेन तोयेन शीघ्रम आचमनम् कुरु।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। आचमनियम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांच्या हातावर फुलाने आचमनासाठी पाणी अर्पण करावे.

गंगादि सर्वतीथेर्भ्य आनीतम् तोयमुत्तम्।भक्त्या समपिर्तम् तुभ्यम् स्नानाय आभिष्टदायक।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। स्नानम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांवर फुलाने पाणी अर्पण करावे.

- पंचामृत स्नान मंत्र

पयो दधि घृतम् चैव मधुशर्करया युतम्।पंचामृतेन स्नपनम् प्रियताम् परमेश्वर।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पंचामृत स्नानम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांना फुलाने पंचामृत (पंचामृत म्हणजे दूध, दही, तुप, साखर आणि मध) अर्पण करावे. नंतर शुद्ध पाणी अर्पण करावे. या वेळी सुगंधी अत्तर, गरम पाणी अर्पण करावे.

पंचामृत अर्पण केल्यानंतर त्याचा नैवेद्य दाखवावा. यानंतर सुरुवातीला वाहिलेली फुले, अक्षता म्हणजेच निर्माल्य उत्तर दिशेला विसर्जित करावे. यानंतर अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करावा. अभिषेक करून झाल्यानंतर...

- वस्त्र मंत्र

रक्तवस्त्रयुगम् देव दिव्यम् कांचनसंभवम्।सर्वप्रदम् गृहाणेदम् लंबोदर हरात्मज।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। वस्त्रम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांना वस्त्र अर्पण करावे.

- यज्ञोपवीत मंत्र

राजतम् ब्रह्मासूत्रम् च कांचनम् चोत्तरीयकम्।गृहाण चारु सर्वज्ञ भक्तानाम् वरदो भव।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। यज्ञोपवितम् समर्पयामि।।

जानवे श्रीगणेशांना डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली अर्पण करावे.

- चंदन मंत्र

कस्तुरीरोचना चंदकुंकुमैश्च समन्वितम्।विलेपनम् सुरश्रेष्ठ चंदनम् प्रतिगृह्यताम्।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। चंदनम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांच्या मस्तकाला चंदन लावावे.

- अक्षता मंत्र

रक्ताक्षतांश्च देवेश गृहाण द्विरदानन।ललाटपटले चंदस्तस्योपरि विधार्यताम्।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। अक्षताम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांना अक्षता अर्पण कराव्यात.

- पुष्प मंत्र

माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो।मयाहृतानि पूजार्थम् पुष्पाणि प्रतिगृह्यताम्।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पुष्पाणि समर्पयामि।।

असे म्हणून अनेक प्रकारची फुले , दुर्वा , शमी व अन्य पत्री श्रीगणेशांना अर्पण कराव्यात.

- धूप मंत्र

दशांगम् गुग्गुलम् धूपम् सुगंधम् च मनोहरम्।गृहाण सर्वदेवेश उमापुत्रम् नमोस्तुते।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। धूपम् समर्पयामि।।

असे म्हणून डाव्या हाताने घंटा वाजवून व उजव्या हाताने अगरबत्तीने श्रीगणेशांना ओवाळावे.

- दीप मंत्र

सर्वज्ञ सर्वलोकेश त्रैलोक्य तिमिरापह।गृहाण मंगलम् दीपम् रुद्रप्रिय नमोस्तुते।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। दीपम् समर्पयामि।।

असे म्हणून निरांजनाने श्रीगणेशांना ओवाळावे.

- नैवेद्य मंत्र

नैवेद्यम् गृह्यताम् देव भक्तिम् मेह्यचलाम् कुरु।ईप्सितम् मे वरम् देहि परत्र च पराम् गतिम्।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। नैवेद्यम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांना नैवेद्य दाखवावा.

- विडा मंत्र

पूगीफलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतम्‌ ।कर्पूरैलासमायुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यताम्‌ ।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। पूगीफल तांबुलम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांना विडा अर्पण करावा.

- दुर्वा मंत्र

गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्राघनाशन।एकदंते भवक्त्रेति तथा मूषकवाहन।।विनायकेश पुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक।कुमारगुरवे नित्यम् पूजनीया: प्रयत्नत:।।

हे मंत्र म्हणून २१ दुर्वा श्रीगणेशांना अर्पण कराव्यात.

यानंतर गणपतीची आरती करावी.

- नमस्कार मंत्र

नम: सर्वहितार्थाय जगदाधार हेतवे।साष्टांगोयम् प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृत:।।

असा मंत्र म्हणून श्रीगणेशांसमोर साष्टांग नमस्कार घालावा.

- प्रदक्षिणा मंत्र

यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च।तानि तानि विनश्यंति प्रदक्षिण पदे पदे।।

असा मंत्र म्हणून स्वत:भोवती ३ प्रदक्षिणा घालाव्या.

- मंत्रपुष्प

विनायकेशपुत्र त्वम् गणराज सुरोत्तम।देहि मे सकलान् कामान् वंदे सिद्धिविनायक।।

श्रीसिद्धिविनायकाय नम:। मंत्रपुष्पम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांना फुले अर्पण करावी व हात जोडून पुढील प्रार्थना करावी...

- पार्थना मंत्र

यन्मया चरितम् देव व्रतमेतत् सुदुर्लभम्।गणेश त्वम् प्रसन्न: सन् सफलम् कुरु सर्वदा।।

विनायक गणेशान् सर्वदेव नमस्कृत।पार्वतीप्रि य विघ्नेश मम विघ्नान् निवारय।।

आवाहनम् न जानामि न जानामि तवार्चनम्।पूजाम् चैव न जानामि क्षम्यताम् परमेश्वर।।

मंत्रहीनम् क्रियाहीनम् भक्तितहीनम् सुरेश्वर।यत्पूजितम् मया देव परिपूर्णम् तदस्तु मे।।

अन्यथा शरणम् नास्ति त्वमेव शरणम् मम।तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर।। 

अशी श्रीगणेशांची प्रार्थना करावी.

।। इति पूजाविधी ।। 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपती