शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Ganesh Chaturthi 2020: समर्थांनी रचलेली संपूर्ण 'सुखकर्ता दुःखहर्ता' आरती; प्रत्येक ओळीत बाप्पाची कीर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 15:32 IST

Ganesh Chaturthi 2020: रामदास स्वामींनी रचलेल्या सात कडव्यांच्या आरतीमध्ये गणरायाचं यथार्थ वर्णन आहे. यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पांची ही पूर्ण आरती म्हणून पाहा.

आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने करतो. त्यामुळेच तर कार्याचा श्रीगणेशा केला, असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आरतीची सुरुवातही 'सुखकर्ता दु:खहर्ता' या आरतीनंच होते. आयुष्यात सुख आणणारा आणि दु:ख दूर करणारा असं यथार्थ वर्णन समर्थ रामदास स्वामींनी आरतीमधून केलेलं आहे. याशिवाय गणरायाच्या रुपाचं, त्याच्या गुणांचंही रामदास स्वामींनी अतिशय सुंदरपणे केलं आहे. रामदास स्वामींनी रचलेली मूळ आरती सात कडव्यांची आहे. पण बहुतेक ठिकाणी तीन कडव्यांचीच आरती म्हटली जाते. यंदा गणेशोत्सवात बाप्पासमोर पूर्ण आरती म्हणून बघा.. तुम्हाला नक्कीच एक वेगळी प्रसन्नता अनुभवता येईल. 

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥ 

सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥ 

जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥ 

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥ हिरेजडीत मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥ 

माथा मुकुट मणी कानी कुंडले । सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।। नागबंद सोंड-दोंद मिराविले । विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥ 

चतुर्भुज गणराज बाही बाहुटे । खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।। सुवर्णाचे ताटी शर्करा घृत । अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥ 

छत्रे चामरे तुजला मिरविती । उंदीराचे वाहन तुजला गणपती ।। ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी । आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥ 

ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती । ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।। ताल मृदंग वीणा घोर उमटती । त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥ 

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना । संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना ॥ जय ० ॥ ७ ॥ 

जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥ 

!!गणपती बाप्पा मोरया!!

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव