शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

बेडकाची 'ही' गोष्ट कदाचित तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून टाकेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 15:52 IST

यश मिळवण्यात नशीबाची साथ वीस टक्के आणि आपल्या श्रमांची साथ ८० टक्के असावी लागते. हे गुणोत्तर आपल्याला साधता आले, तर आपण लढाई जिंकलीच म्हणून समजा!

आपल्याकडे काय आहे, त्यापेक्षा आपल्याकडे काय नाही, हे पाहण्यात आपला बराच वेळ खर्च होतो. वरून दुसऱ्याकडे असलेले सुख माझ्याकडे का नाही, या विचारात दैवाला, नशिबाला दोष देण्यात आपली बरीचशी ऊर्जा वाया जाते. वरून नैराश्य येते ते वेगळे! 

परंतु यात दोष दैवाचा नसून आपला आहे, हे लक्षात घ्या. आपण जे आहोत, जसे आहोत, आपली जी परिस्थिती आहे, त्याला आपण जबाबदार आहोत, हे आधी लक्षात घेतले पाहिजे. कारण यश मिळवण्यात नशीबाची साथ वीस टक्के आणि आपल्या श्रमांची साथ ८० टक्के असावी लागते. हे गुणोत्तर आपल्याला साधता आले, तर आपण लढाई जिंकलीच म्हणून समजा! त्यासाठी पुढे दिलेली गोष्ट लक्षपूर्वक वाचा. 

एक विज्ञानाचे शिक्षक असतात. बऱ्याच वर्षांनी त्यांना त्यांचा जुना विद्यार्थी भेटतो. ते त्याला आग्रहाने घरी घेऊन येतात. त्याची चौकशी करतात. विद्यार्थी नन्नाचा पाढा सुरू करतो. मला संधी मिळाली नाही, दैवाने मला साथ दिली नाही, जे मिळाले त्यात गुजराण करावी लागली, त्यामुळे माझी परिस्थती आज साधारण मनुष्यासारखी आहे.

शिक्षक आपल्या भूमिकेत गेले आणि म्हणाले, 'चल तुला आज एक प्रयोग दाखवतो!'विद्यार्थी शिक्षकांपाठोपाठ त्यांच्या स्वयंपाकघरात गेला. शिक्षकांनी एक पातेले घेतले आणि त्यात एक बेडूक पकडून टाकला. बेडून मस्त पाण्यात खेळत होता. शिक्षकांनी ते पातेले गॅसवर ठेवले आणि आच सुरू केली. पाणी हळू हळू गरम होऊ लागले. बेडूक अस्वस्थ होऊ लागले. पाणी उकळू लागले आणि त्या गरम पाण्यात बेडूक हकनाक मेले. 

विद्यार्थी ओरडला. `सर हे काय करताय? हा कसला प्रयोग करताय. तुमच्यामुळे तो बेडूक अकारण जिवानीशी मेला. का मारले तुम्ही त्याला?'शिक्षक म्हणाले, `त्याला मी नाही मारला, तो त्याच्या कर्माने मेला. पाण्याचे तपमान वाढू लागल्यावर पाण्याबाहेर उडी मारायची सोडून तो मदतीची वाट पाहत राहीला. याऐवजी सगळे बळ एकवटून त्याने पाण्याबाहेर उडी घेतली असती, तर तो वाचला असता. पण दैवावर विसंबून राहिला आणि मेला...!'

विद्यार्थ्याचे डोळे खाडकन उघडले. त्याने शिक्षकांचे पाय धरले आणि म्हणाला, `सर माझं बेडूक होण्याआधी मला पाण्याबाहेर उडी मारायला शिकवलेत त्याबद्दल आयुष्यभर ऋणी राहिन!'

या शिकवणुकीपायी एका बेडकाचा जीव गेला, हे या गोष्टीचे तात्पर्य नाही. या कथेकडे रुपक कथेच्या नजरेतून बघा आणि पाणी नाकातोंडाशी येण्याआधी उडी मारून नैराश्यातून, अपयशाच्या गर्तेतून बाहेर निघा! कारण तुम्हीच तुमचे भाग्य घडवू शकता, अन्य कोणीही नाही!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी