शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

दिवस होईल शुभ जर घरातून निघताना खिशात ठेवली खास फुलं, वास्तूशास्त्रज्ञांनी दिल्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 17:30 IST

शुभ कार्याला जाण्यापूर्वी काही खास फुले खिशात ठेवली तर आपण ठरवलेले कार्य नक्कीच पूर्ण होईल.

ज्योतिषशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याद्वारे व्यक्तीला त्याच्या जीवनात यश आणि सुख-समृद्धी मिळू शकते. यापैकी एक म्हणजे शुभकार्यासाठी फुले खिशात ठेवण्याचा प्रकार. वास्तुशास्त्र सांगते की, फुलांमध्ये आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची ताकद असते, तसेच फुलांपासून सकारात्मक ऊर्जाही वाढते. शुभ कार्याला जाण्यापूर्वी काही खास फुले खिशात ठेवली तर आपण ठरवलेले कार्य नक्कीच पूर्ण होईल. इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा यांनी News 18 हिंदीला दिलेल्या माहितीनुसार आपण कोणते फूल खिशात ठेवू शकतो, त्याविषयी जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्रानुसार रविवार हा सूर्य देवाला समर्पित असतो. ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की, जर तुम्ही रविवारी काही शुभ कामासाठी घराबाहेर जात असाल तर आकचे फूल खिशात ठेवू शकता. हे फूल तुमचे नशीब चमकवू शकते आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळवून देते.

ज्योतिषशास्त्रात सोमवार हा चंद्र देवाला समर्पित आहे. असे मानले जाते की चंद्राचा संबंध एखाद्या व्यक्तीच्या हृदयाशी किंवा मनाशी असतो. सोमवारी, आपण आपल्या खिशात लव्हेंडरचे फूल ठेवू शकता. आपल्या विविध समस्या दूर करण्यासाठी हे फूल उपयुक्त ठरू शकते.

मंगळवारचा दिवस बजरंगबली हनुमानाशी आणि मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. मंगळ हा लाल ग्रह म्हणूनही आपण ओळखतो. मंगळवारी तुम्ही एखाद्या शुभ कामासाठी घरातून बाहेर पडत असाल तर लाल रंगाचे गुलाब सोबत ठेवू शकता.

बुधवार बुध ग्रहाशी संबंधित आहे. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धीची देवता म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर त्या व्यक्तीला वाचन-लिखाण आवडत नाही आणि त्याची मानसिक स्थितीही चांगली नसते. अशा स्थितीत बुधवारी कुमुद म्हणजे कमळाचे फूल खिशात ठेवू शकता.

गुरुवार हा देवांचा गुरु ग्रहाचा दिवस मानला जातो. असे मानले जाते की पृथ्वीवरील प्रत्येक शुभ कार्यात गुरुची उपस्थिती असणे आवश्यक आहे. जर तुम्ही या दिवशी काही कामासाठी घरातून निघत असाल तर खिशात कमळाचे फूल ठेवू शकता.

शुक्रवारचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह सुखाचा स्वामी मानला जातो. शुक्रवारी, आपण खिशात पाकिटात रंगीत फूल ठेवू शकता.

-शनिवारचा दिवस शनिदेवाशी संबंधित मानला जातो. शनिदेव ही न्यायाची देवता आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवाला गडद निळा आणि काळा रंग खूप आवडतात. या दिवशी जर तुम्ही खिशात निळी लाजवंतीची फुले ठेवली तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते

 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र