शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बेडरुममध्ये चुकूनही ठेवू नका 'या' गोष्टी; वास्तूशी निगडीत ५ चुकांचे होतात वाईट परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 20:02 IST

वास्तूनुसार घराची दिशा आणि त्याची रचना यामध्ये काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचं आहे. घर बांधताना वास्तुशास्त्राकडे दुर्लक्ष केल्यास वाईट परिणामांना सामोरं जावं लागू शकतं

वास्तूनुसार घराची दिशा आणि त्याची रचना यामध्ये काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचं आहे. घर बांधताना वास्तुशास्त्राकडे दुर्लक्ष केल्यास वाईट परिणामांना सामोरं जावं लागू शकतं, असे ज्योतिषी सांगतात. त्यामुळे स्वयंपाकघर, बाथरूमपासून मुख्य दरवाजापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी वास्तूचे नियम लक्षात घेणं अत्यंत आवश्यक मानलं जातं. 

काळ्या रंगाची नेमप्लेट लावू नयेघराच्या मुख्य दरवाजातून घरात सुख आणि समस्या दोन्ही येतात. त्याची योग्य व्यवस्था केली तरच घरात सुख-समृद्धी येऊ शकते. त्यामुळे दरवाजा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका ठेवा. येथे पुरेशी प्रकाश व्यवस्था करा. नेम प्लेट जरूर लावा. नेमप्लेटचा रंग काळा नसावा. शनिवारी मुख्य गेटवर दिवा लावणे विशेषतः शुभ असते.

चप्पल ठेवू नकाघरातील बेडरुम हे स्थान कनेक्शन आणि आनंदाशी संबंधित आहे. यात सुधारणा करून जीवनातील नैराश्य आणि तणाव दूर होऊ शकतो. इथं थोडीशी सुगंधाची व्यवस्था असावी. भरपूर फुलं किंवा फुलांची चित्रं लावू शकता. शूज आणि चप्पल बेडरुममध्ये ठेवू नयेत.

पसारा नकोघरातील लोकांचं आरोग्य घरातील वातावरणाशी संबंधित असतं. स्वयंपाकघरात सूर्यप्रकाश आला तर ते खूप चांगलं होईल. स्वयंपाकघरात गोष्टी व्यवस्थित ठेवा. तसेच पूजा केल्यानंतर स्वयंपाकघरातही उदबत्त्या अवश्य दाखवाव्यात.

बेडरूममध्ये या गोष्टी ठेवू नकाबेडरुमचं स्थान सुख आणि समृद्धीशी संबंधित आहे. बेडरूमच्या भिंतींचा रंग हलका असावा. फिकट हिरवा किंवा गुलाबी रंग सर्वोत्तम असेल. बेडरूममध्ये टीव्ही लावू नका. इच्छा असल्यास आपण हलक्या आवाजातील संगीत व्यवस्था करू शकता. शक्यतो बेडरुममध्ये अन्न खाणं टाळावं. सूर्यप्रकाश आणि हवेची व्यवस्था असेल तर ते खूप चांगलं होईल.

बाथरुममध्ये थेंब थेंब पाणी टपकत ठेवू नकाजीवनातील समस्या या ठिकाणाहून नियंत्रित केल्या जातात. बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवा. या ठिकाणी पाणी वाया घालवू नका. बाथरूममध्ये निळा किंवा जांभळा रंग वापरणे खूप फायदेशीर आहे. बाथरूममध्ये हलका सुगंध येत राहिला तर चांगलं होईल. बेडरूममध्ये नदी, तलाव, धबधबा, युद्ध किंवा कोणत्याही धोकादायक प्राण्याचं चित्र अजिबात लावू नका.

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रspiritualअध्यात्मिक