शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या ऋषीमुनींनी गंगा स्नानाला एवढे महत्त्व का दिले आहे, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 08:00 IST

गंगा आणि यमुना ही आपल्याकडे अत्यंत प्राचीन तीर्थे आहेत. या तीर्थांचा प्रभाव असा आहे की रोज जरी संध्येच्या पळीभर त्याचे पाणी प्यायलात तरी तुमच्या मनाच्या ठिकाणी असलेले दोष आपोआप नाहीसे होतात. 

भगवंतांनी गीतेमध्ये 'स्थावराणां हिमालय:' असे म्हटले आहे. याचा अर्थ असा, माझे स्थावर रूप जर तुम्हाला पहायचे असेल तर हिमालयाकडे पहा. या एका शब्दावर ऋषीमुनींनी या ठिकाणी भगवंताचा वास आहे, हे शोधण्यास सुरुवात केली आणि शोधता शोधता जेथे गंगामुख सापडले, तेथे शिवाचा वास आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्या पूर्वीच्या ऋषीमुनींना प्रत्यक्ष दर्शन झाले आणि तो गंगेचा प्रवाह आजमितीपर्यंत वाहात आहे. 

या गंगा नदीच्या स्नानाचे महत्त्व काय असेल, तर ती अनेक खाणीतून बाहेर पडलेली आहे. विज्ञानाच्या दृष्टीकोनातून जर तिचा विचार केला तर मनुष्य जन्माला येताना अनेक आवरणे घेऊन येतो आणि त्या आवरणांचे लक्षण जर पहायचे असेल तर आपल्या देहाला वारंवार इच्छा होतात किंवा मनाच्या ठिकाणी अस्वस्थता येते. 

मन हे शरीरामध्ये वास करत असताना अशा प्रकारचा अनुभव का येतो याचा ऋषीमुनींनी शोध घेतला आणि त्यांनी आवर्जून या हिंदू लोकांना आवाहन केले की आयुष्यात एकदा तरी येऊन या गंगा नदीत तुम्ही स्नान करा, या गंगेचा लाभ घ्या. म्हणजे तुमच्या मनाच्या ठिकाणी असेलेले दोष आपोआप जातील.

गंगा आणि यमुना ही आपल्याकडे अत्यंत प्राचीन तीर्थे आहेत. या तीर्थांचा प्रभाव असा आहे की रोज जरी संध्येच्या पळीभर त्याचे पाणी प्यायलात तरी तुमच्या मनाच्या ठिकाणी असलेले दोष आपोआप नाहीसे होतात. 

हे सगळं करत असताना याला मोठ्या भक्तीभावाची जरूरी असते. मात्र गंगाकाठी, गंगातीरी राहणारे लोक पाणी म्हणून तर पीत असतील तर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही. पण पाणी पिताना मी गंगातीर्थ पितो असा भाव मनात असेल तर मनाचे दोष नक्की जातील. आपल्याला रोज गंगास्नान घडणे शक्य नाही. गंगातीर्थ मिळणे नाही. अशा वेळी भक्तीभावाने केलेले स्मरण गंगेचे पावनत्व साध्या पाण्यातही उतरवते.

गंगेपुढे मन शांत होते. गंगा हे परमेश्वराचे चिन्ह आहे. गंगास्नानाने पापक्षालन होते. परंतु त्यासाठी आपला भाव चांगला असावा लागतो. या गंगास्नानाचे दुसरे महत्त्व असे की, आपल्या पाठीमागे कायम ग्रहपीडा असते. कोणाला शनीपीडा, कोणाला मंगळ पीडा असते, या सर्व पीडा गंगेच्या पाण्याने कमी होत जातात. हिमालयात गंगेचा उगम होतो, त्या ठिकाणाला गंगोत्री म्हणतात. तेथूनच ती हृषिकेश व हरिद्वारला येते. जेव्हा संधी मिळेल तेव्हा तिथे अवश्य जाऊन या. तोवर आपल्या हाती असलेले पाणी गंगेचे पुण्य स्मरण करून तीर्थ समजून प्या व पाण्याची नासाडी न होता ते जपून वापरा.