शनी अमावस्या कधी आहे आणि त्यादिवशी कोणती मोठी खगोलीय घटना घडणार आहे  जाणून घ्या! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 12:38 PM2021-11-26T12:38:41+5:302021-11-26T12:39:19+5:30

शनी देवाची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून सगळेच जण त्यांची पूजा करतात. या दृष्टीने शनी अमावस्या कधी आहे ते जाणून घेऊ. 

Find out when Shani Amavasya is and what big astronomical event will happen on that day! | शनी अमावस्या कधी आहे आणि त्यादिवशी कोणती मोठी खगोलीय घटना घडणार आहे  जाणून घ्या! 

शनी अमावस्या कधी आहे आणि त्यादिवशी कोणती मोठी खगोलीय घटना घडणार आहे  जाणून घ्या! 

Next

शनिवार, ४ डिसेंबर २०२१, शनिदेवाच्या उपासनेसाठी खूप चांगला दिवस आहे. या अमावास्येच्या तिथीला शनि अमावस्या किंवा शनिश्चरी अमावस्या असेही म्हणतात. या अमावस्येला एक मोठी खगोलीय घटनाही घडणार आहे, ते म्हणजे खग्रास सूर्यग्रहण!

खग्रास सूर्यग्रहण २०२१
४ डिसेंबर २०२१, शनिवारी सूर्यग्रहण देखील होणार आहे. जे २०२१ सालातील शेवटचे सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की जेव्हा ग्रहण होते तेव्हा त्याचा परिणाम मेष ते मीन राशीच्या लोकांवर होतो. शनि अमावस्येची तिथी शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यग्रहणही आहे. शास्त्रानुसार सूर्य आणि शनिमध्ये पिता आणि पुत्राचे नाते आहे. शनीची दृष्टी आणि दशा शुभ मानली जात नाही. जर कुंडलीत शनि अशुभ असेल तर शनि दशेत त्रास देतो. शनीची साडेसाती या कारणास्तव वेदनादायक असल्याचे सांगितले जाते. सध्या मिथुन, तूळ, धनु, मकर आणि कुंभ राशीवर शनीची विशेष दृष्टी आहे. मिथुन आणि तुला राशीत शनीचा प्रभाव आहे आणि धनु, मकर आणि कुंभ राशीत शनीची साडेसाती चालू आहे.

शनिपूजेचे फळ 
ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला न्यायाची देवता देखील म्हटले आहे. यासोबतच त्यांचे वर्णन कर्म दाता आणि दंडाधिकारी म्हणूनही करण्यात आले आहे. यासोबतच शनिदेवालाही मेहनतीचा कारक मानण्यात आला आहे. ज्योतिषीय गणनेनुसार शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो, शनीची हालचाल अतिशय मंद असल्याचे सांगितले जाते.यामुळेच शनिदेवाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. शनिदेवाची अवकृपा टाळण्यासाठी शनिवारी शनिदेवाशी संबंधित वस्तूंचे दान करावे. शनि मंदिरात पूजा करून मोहरीचे तेल अर्पण करावे. यासोबतच शनि चालिसाचे पठण करावे.

शनी अमावस्या शुभ मुहूर्त
पंचांगानुसार ३ डिसेंबरला दुपारी ४.५६ वाजता अमावस्या सुरू होईल. व ४ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १.१३ मिनिटांनी अमावस्या संपेल. परंतु अमावस्या ही तिथी ४ तारखेचा सूर्योदय पाहणार असल्याने ४ तारखेला अमावस्या गृहीत धरली जाईल. 

शनि अमावस्या आणि सूर्य ग्रहण या दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने या दिवसाचे औचित्य साधून शक्य तेवढा दानधर्म करून पुण्य पदरात पाडून घेणे श्रेयस्कर ठरेल. शनि अमावस्येला शनि चालीसा आणि शनि मंत्रासोबत शनि आरतीचे पठण करणे शुभ मानले जाते.

Web Title: Find out when Shani Amavasya is and what big astronomical event will happen on that day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.