शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

देवघरात नेमके कोणते आणि किती देव ठेवावेत, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 02:30 IST

देवघरात ठेवलेल्या मूर्तीची किंवा तसबिरीची आपल्या सोयीने उचलबांगडी करणे योग्य नाही. म्हणून ठेवण्याआधीच ती विचारपूर्वक ठेवली पाहिजे.

हिंदू दैवतांची संख्या मोठी असली आणि प्रत्येकाचे उपास्य दैवत वेगवेगळे असले, तरी देवघरात देवांची संख्या मर्यादित असावी, असे शास्त्र सांगते. पुष्कळ लोक कुठल्याही यात्रेला गेल्यावर तेथून त्या ठिकाणच्या देवाच्या मूर्ती वा तसबिरी आणतात व नंतर पूजेत ठेवतात. यामागची त्यांची भावना कितीही चांगली असली, तरी कालांतराने देवघरात देवांची संख्या इतकी वाढते, की त्या सर्वांची रोज पूजा करणेही कठीण होऊन जाते. हे टाळण्यासाठी देवघरात उगाच मूर्ती किंवा तसबिरींची संख्या वाढवू नये. 

देवघरात ठेवलेल्या मूर्तीची किंवा तसबिरीची आपल्या सोयीने उचलबांगडी करणे योग्य नाही. म्हणून ठेवण्याआधीच ती विचारपूर्वक ठेवली पाहिजे. देवघरात मोजकेच देव ठेवले पाहिजेत. ते देव कोणते ते जाणून घेऊया. 

प्रत्येक घरात माहेरून येणारी गृहलक्ष्मी आपल्याबरोबर अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण आणते. सून आल्यावर तिच्या माहेरचीही अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण देवघरात विसावते. त्यांचे स्थान अढळ आहे. याशिवाय कुलदेवतांचे फोटो व मूर्ती आणि त्यांच्या जोडीला आपल्या इष्ट देवतेची किंवा एखाद्या संत पुरुषाची तसबीर वा मूर्ती ठेवावी. गणपतीची मूर्ती मात्र अवश्य असावी. याउपर मूर्तींची किंवा तसबिरींची संख्या वाढवू नये.