शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

Falgun Amavasya 2023: फाल्गुन अमावास्येला करा पितरांची पूजा, आजारपण, नैराश्य, वास्तूदोषातून मिळवा सुटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 07:00 IST

Falgun Amavasya 2023: फाल्गुन अमावास्येला पितरांचे पूजन करा आणि त्यांच्या आशीर्वादाने करा हिंदू नववर्षाचे स्वागत करा!

२१ मार्च रोजी फाल्गुन अमावस्या आहे. दुसऱ्या दिवशी अर्थात २२ मार्च रोजी गुढी पाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच हिंदूंचे नववर्ष सुरू होत आहे. तत्पूर्वी दर्श अमावस्येला आपल्या पितरांचे स्मरण आणि पूजन करून नववर्षाचे स्वागत करूया आणि अनेक लाभ मिळवूया.  

आपल्याला जन्म दिला, ज्यांच्या कुळात आपण वाढलो, ज्यांची परंपरा आणि नाव आपण पुढे नेत आहोत अशा आपल्या कुळातील दिवंगत व्यक्तींचा अर्थात पितरांचा सदैव आदर करावा. शक्य तेवढी सेवा करावी आणि दर अमावस्येला त्यांच्या नावे पूजन करावे, स्मरण करावे आणि मनोमन त्यांना वंदन करावे. त्यांच्यानावे दानधर्म केल्यास पुण्य लाभते आणि त्यांचा आशीर्वाद पुढच्या पिढ्यांनाही लाभतो.

धर्मशास्त्राने माता-पिता, गुरुजन, आप्तस्वकीय यांना मान द्यावा हा संस्कार तर घातला आहेच, परंतु त्यांच्या मृत्यूपश्चात आत्म्याला सद्गती मिळावी आणि त्यांचे ऋणात कायम कृतज्ञ राहावे, या भावनेने पितरांची सेवा सांगितली आहे. तसेच पितरांची सेवा करण्यामागे अनेक कारणेही दिली आहेत.

  • पितरांची सेवा केल्याने त्यांचे पितृलोकात गमन होते आणि सेवा करणाऱ्या मनुष्याचे जीवन सुखी आणि समृद्ध होऊन ज्यांना संतान नाही त्यांना संतान प्राप्ती होते. 
  • घरात नेहमी वातावरण तंग राहत असल्यास, घरात सतत भांडण, तंटा, कटकटी होत असल्यास यापैकी कोणत्याही कारणाने  घरातील सदस्याचे मन अस्वस्थ, बेचैन होत असल्यास पितरांची सेवा केल्याने घरातील वातावरण सुधारून प्रसन्न वाटते.
  • मुलांचे आईवडिलांशी वारंवार खटके उडत असल्यास, पती पत्नीमध्ये विकोपाची भांडणे होत असल्यास पितरांची सेवा केल्याने भांडणे वादविवाद कमी होतो व कुटुंबात सौख्य नांदते. 
  • घरात सतत आजारपण येत असेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने आर्थिक अडचणी निर्माण होत असल्या पितरांच्या सेवेने आरोग्य उत्तम लाभून आयुष्य वृद्धी वाढते.
  • पितरांच्या सेवेने समाजातील सर्व लोकांशी संबंध सुधारतात. कोणाकडून फसवणूक होत नाही. शेती, व्यवसाय, नोकरी संबंधित व्यक्तींशी संबंध सुधारून प्रगतीतील अडथळे दूर होतात. 
  • पितरांच्या सेवेने स्थावर मालमत्ता, संपत्ती यांचा लाभ होऊन कुटुंबास मनस्वास्थ्य लाभते व आत्मविश्वास वाढतो. 
  • बाहेरील बाधांचा, हितशत्रूंचा उपद्रव होत नाही. अकाली मृत्यू टळतो. 
  • थोडक्यात काय, तर आत्मा संतुष्ट तर परमात्मा आणि अंतरात्माही समाधान पावतो. वरील मुद्दे लक्षात घेता आपल्या पितरांच्या सेवेची संधी दवडू नका तसेच केवळ दिवंगत पितरांचीच नाही, तर जिवंत माता पित्यांच्या सेवेत कोणत्याही प्रकारची उणीव ठेवू नका.