शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

खीर सगळ्यांना आवडते, पण देवाने खास ती आपल्यासाठी पाठवली असेल तर? वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 10:05 IST

जो देवाकडे मागतो त्याची झोळी कधीच रिकामी राहत नाही; हा अनुभव देणारी सुंदर गोष्ट!

एक राजा होता. तो रोज मंदिरात जात असे. त्याच्याबरोबर त्याचे सुरक्षारक्षकही असत. मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर राजा काही क्षण मंदिराच्या पायरीवर बसत असे. त्यावेळेस त्या मंदिराच्या पायरीवर दोन्ही बाजूला भिकारी बसलेले असत. त्यातला एक भिकारी म्हणत, `राजा, तुला देवाने बरेच काही दिले आहे, तर तू त्यातले थोडे मला दे...'त्याचवेळेस दुसरा भिकारी म्हणत, `देवा तू राजाला बरेच काही दिले आहेस, तर तू मलाही थोडे दे.'

म्हणजेच एक भिकारी राजाकडे मागणे मागत असे, तर दुसरा देवाकडे मागणे मागत असे. राजाकडे मागणे मागणारा भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणत, `राजाच आपला देव आहे, तो असताना तू देवाकडे का मागतोस? देव काही देत नसतो, राजाच आपला पोशिंदा आहे, तोच आपल्याला देईल.' त्यावर देवाकडे मागणे मागणारा भिकारी म्हणाला, `राजा आपला पोशिंदा आहे हे खरे असले तरी सगळ्या सृष्टीचा पोशिंदा देव आहे, म्हणून काही मागायचे असेल तर मी देवाकडेच मागतो!'

भिकाऱ्याचे रोजचे मागणे ऐकून राजाने एकदा त्याला गुप्तदान करायचे ठरवले. एक मोठे पातेले भरून खीर पाठवली. ती मिळाल्यावर भिकारी आनंदून गेला. तो दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणाला, `बघ, राजाकडे मागितल्याचा फायदा, त्याने माझे मागणे पूर्ण केले, नाहीतर तुझा देव, तुझे ऐकतही नाही!' असे म्हणत पहिला भिकारी पोटभर खीर खातो आणि आपले पोट भरल्यावर तो उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्याला देत म्हणतो, `तू पण थोडी खीर घे आणि राजाचे आभार मान.' असे म्हणत खीरीचे पातेले दुसऱ्या भिकाऱ्याला देऊन टाकतो.

उरलेली खीर प्यायल्यावर पातेल्याच्या तळाशी सुवर्ण मुद्रा होत्या. ते पाहून भिकारी आनंदून गेला. त्याने लगेच देवाचे आभार मानले. त्याला खीर मिळाली आणि गुप्तधनही!

राजा नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी मंदिरात आला. त्याला वाटले नेहमी आपल्याकडे भीक मागणारा भिकारी आज तिथे नसेल. त्याचे आयुष्य बदलून गेले असेल. पण तिथे जाऊन पाहतो, तर झाले उलटच. राजाने त्या भिकाऱ्याला विचारले, `तुला खीर मिळाली नाही का?' भिकारी म्हणाला, `मिळाली राजेसाहेब, तुमचे आभार मानावे तेवढे थोडे. मी माझ्यातली उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्यालाही दिली आणि सांगितले, देव आपले ऐकत नसला, तरी आपला राजा आपले गाऱ्हाणे ऐकतो. तोच आपले भले करतो. त्याला राग आला की काय कुणास ठाऊक, तो आज आलाच नाही. गेला असेल देवाकडे मागायला!'

हे ऐकून राजा मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, `देवाकडे जो मागतो, त्याला कसलीही उणीव भासत नाही आणि जो मानवाकडे मागतो, तो कायम रिकामाच राहतो.'

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी